Posts

Showing posts from 2014

एक क्षण !!

आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला सुटला, आणि पुढ्यात येउन बसला म्हंटला … काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ?? तुही घे विश्रांती एकाच क्षणाची होऊन दे जरा शांती मनाची क्षण हा क्षणाने वाहून जाईल क्षणभर जरी विसावून जाईल दुसऱ्याच क्षणात शिरशील तू वेडे, मला विसरशील तू नव्याने पुन्हा जगायला शिक विसरून मला जगाला जिंक बघेन तुला याच धर्तीवर यशवान होतांना कीर्तीवर मी हळहळले, मुसमुसले हात धरून क्षणाला... म्हणाले क्षणा आयुष्य क्षणांनी जगतेय मी सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी क्षणात सारे विखरून जाईन तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे जगण्याचं गणित मांडणार आहे. आयुष्याचा क्षणही भागला तरी जगणंच माझं थांबणार आहे . (c) रश्मी / ५ जून २०१४ (प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !

Image
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न. या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते. ‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता, पण वाती भिजलेल्या नसतील, धुपारतीची वेळ होईल लवकर अन् माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’ असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्...

लव कि जिहाद ?

लव जिहाद - मागल्या काही महिन्यांपासून प्रचंड उहापोह होणारा विषय चावून चावून चोथा झालेला पण अजूनही चर्वित चर्वण सुरूच असलेला. चर्चा, वाद, संवाद आणि काय काय पण अजूनही विषयाला खरा संदर्भ न लाभलेला  गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात कथित ‘लव्ह जिहाद’वर चर्चा काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. ‘ऑल इंडिया पर्सनल लॉ’ बोर्डाचे उपाध्यक्ष आणि शिया धर्मगुरु कल्बे सादिक यांनी वाराणसीत बोलताना ‘जो मुस्लिम लव्ह जिहाद करत असेल त्याला ठार मारायला हवं’ असं वक्तव्य केलं आणि सर्व देशात जरथंड झालेल्या धार्मिक चर्चेला पुन्हा तोंड फुटलं. पण प्रश्न निर्माण होतो तो हा कि कुठून पेव फुटलं या विषयाला आणि किती सत्यता आहे त्यात ?  ब्रिटनमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आणि यात मुख्यत: मिड्लंडमध्ये - रोचडेल नंतर ऑक्सफर्ड व नुकतेच रोदरहम मध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी पुरुष आणि गट यात सामील असल्याचे निदर्शनात आले तसेच ब्रिटीश गोऱ्या मुली यांचे सॉफ्ट टार्गेट ठरतात . त्यांच्या जाळ्यात सहज फसतात. …. यामागे बरीच सामाजिक कारणे आहेत - पाकिस्ता...

सोशल मिडीया आणि आमच्या अस्मिता !!

Image
प्रत्येक तंत्रज्ञानाचा शोध हा गरजेतून लावला जातो. जगणे सोपे व्हावे हा खरा उद्देश. उर्जेची बचत, वेळेची बचत आणि कमी श्रमात अधिक कार्य या गरजा लक्षात घेता त्यासाठी लागणारी सोय म्हणून नवनवीन शोध लावले जातात आणि त्यानुसार नवनवीन तंत्रज्ञान आमच्या दिमतीला तयार होत असतात. आजचे युग म्हणजे 'सोशल मिडिया'चे युग. आजची पिढी या स्वप्नील विश्वात पुरती डुंबून गेली आहे. इलेक्ट्रॉनिक जगातली हि एक नवीच कम्युनिटी तयार झाली आहे. इथेंच सगळं जग आणि हेच आमचं जगणं असं काहीसं होऊन बसलं आहे. सोशल मीडियाच्या भिंतीत गाडून घेतोय आपण सर्व स्वतःला, न दिसणारा पिंजराच पण इतकं गुरफटले जातोय कि     आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने वाहवत जातोय ह्याचं भानही उरलेलं नाही. मागल्या काही दिवसात जे काही घडलं, घडतंय ते पाहता खरतर काळजीपोटी भीतीच वाटू लागली आहे. तळागाळाला गेलेलं राजकारण, दुषित होत चाललेलं समाजकारण आणि विकृत ध्येयानं वखवखलेला अन त्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार असणारा, वैचारिक घाणीनं माखलेला एक विशिष्ट समाज. सोशल मीडियावर आपल्या वागण्याची, भाबड्या भावना, बिनबुडाच्या अस्मिता अश्या मूर्खपणाच्य...

स्केटिंग वरून विश्वविक्रमी झेप !!

Image
" आज कुछ तुफानी करते है " किंवा मग "डर के आगे जीत है " तसे पाहिले तर नुसत्या जाहिराती; पण अगदी शब्दशः असे वागणारे आणि विक्रमी दौड मारणारे आपल्यातच कुठेतरी दडलेले असतात...गरज असते नजर उचलून बघण्याची....हल्लीच नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास पार पाडला....केवळ अकरा दिवसात हा प्रवास यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या चमूच्या विक्रमाची नोंद आता जागतिक स्तरावरील 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक' मध्ये करण्यात येणार आहे.... विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली हि मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते...त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दा...

आत्मपरीक्षण

Image
खरतर आता म्हणता येईल काळ खूप पुढे गेलाय.… पुढे??…. कि दूर? सामाजिक अडचणी समस्या कधी नव्हत्या हो? होत्याच ...पूर्वीही होत्या आजही आहेत, पण समस्येकडे पाहण्याचे दृष्टीकोन आणि समस्यांना तोंड देण्याच्या आपल्या पद्धती प्रचंड बदलल्यात. खरतर समस्यांची वर्गवारी करण्यातच आपण चुकतोय कुठेतरी. शिक्षणाची टक्केवारी भलेही वाढत जात असेल परंतु आमची बुद्धिवादी समजूतदारीची संकल्पना फारच संकुचित होत चालली आहे. जाणीव बोथट होत चाललेल्या आहेत. आपल्याला जगण्यासाठी काय महत्वाचे आहे हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. आम्हाला काय हवंय हे आम्हाला माहितीच नाही. पिढ्यान पिढ्या धर्म, जाती, श्रद्धा आणि त्यातून फोफावणारा विसंगतवाद या काही गोष्टी एका बोचक्यात बांधून बिंबवण्यात आल्या मनावर आणि आम्ही सुद्धा ते बोचकं आमच्या शेंड्याला बांधून घासत ओढत चालत आहोत. आमच्या आदल्या पिढीने ते आमच्या शेंड्याला बांधले आम्ही पुढच्या पिढीच्या शेंड्याला बांधू. पण आमच्या मागच्या पिढीचे अन आमच्या पिढीचे तरी काय बर भलं झालय यातून हे थांबून विचार करण्याची सद्सद विवेक बुद्धी ना आधी होती न आज अजून कुणाला सुचलेली आहे. 'धर्म' हा एकच ...

पाऊस मन ..

खरं सांगू पाऊस मला नको नको वाटतो तुझी आठवण होऊन पुन्हा डोळ्यामध्ये दाटतो पावसाचं हे असंच असतं तुझ्यासारखाच वागतो दिवसा स्वप्नी रमतो आणि रात्र रात्र जागतो..  पाऊस पाऊस होतं मन, झिरपत राहतो डोळ्यातून आतून भिजलं असलं तरी, चेहेऱ्यावरती कोवळं उन जुन्या काही सरी होत्या मनात आभाळ भरून वाहता वाहता वाहून गेल्या, गेले दिवस सरून पुन्हा फिरून उजाडतं डोळे होतात कोरडे ठाण ओल्या सुक्या वेलीवरचं गळतं पुन्हा एकच पान ओठातल्या शब्दांनाही मिळत नाही तुझे कान पाऊस पाऊस म्हणत म्हणत, सुकत जातं सारं रान खरं सांगू पाऊस मला आता भिजवत नाही चांदण ओले स्पर्श सुद्धा रात्री निजवत नाही गंध भरल्या फुलांनीही हृदय उमलत नाही पावसा तू नकोच येऊ, तुझं येण सोसवत नाही तुझं येणं सोसवत नाही !!!

नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...!!!

Image
स्त्रियांच्या अनुषंगाने पाहिले तर सध्या सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले दिसत आहे...नुसते बघत राहून बदलाची अपेक्षा करत बसने; परिस्थिती सध्या यापलीकडे वळसा घालून पोचलेली आहे. आता बदल अनिर्वार्य आहे यापुढे एकतर आपण आपल्या आवडीचा मार्ग बदल म्हणून निवडायचा आहे किंवा परिस्थिती तिच्या अनुषंगाने आपल्याला बदलायला भाग पाडेल.... अजूनही वेळ आहे, अजूनही जरुरी नाही परिस्थितीच्या ओघानेच वाहवत गेले पाहिजे. दुसरा कुठला तरी जास्त चांगला आणि सामाजिक परिस्थितीला पोषक असा ऑप्शन असेल तर कठीण आणि दूरचा असला तरी आवर्जून तो मार्ग निवडायला हवा. प्रत्येकवेळी आपल्या पुरता सोपा मार्ग तात्पुरता सोयीचा असू शकतो पण पुढे हीच सोय मोठ्या प्रमाणात गैरसोय घेऊन येईल आणि मग परत परिस्थितीचा पालट आपल्यालाच परवडणारा राहणार नाही..... मला अजूनही आठवतं ....वर्षभरापूर्वी मुंबईला लोकल ने प्रवास करतांना एक गोड चिमुकली तिच्या आई कडे गजरा हवा म्हणून हट्ट करत होती. तसे तिच्या आईने डोळे वटारले. पुढे पैंजण,ब्रेसलेट विकणारी आली तशी चीमुक्लीची वळवळ परत सुरु झाली हे सर्व बघून मी जरा हसले तशी तिची आई सांगू लागली ...पहा ना कॉन्वेंट मधे म...

स्त्री प्रवास .... एक अनुत्तरीत प्रश्न !!

 स्त्री प्रवास … कुठून सुरु झाला हा प्रवास? माझंच जगणं मला जगू द्या, ते असे ओरबाडून संपवू नका, यासाठी तळमळीने मागणी करण्याचा प्रवास? कधी ठासून, कधी रडून, कधी ओरडून तर कधी मंचावर उभे राहून ताठ मानेने …तरीही मुसमुसतच विचारतेय ती.    स्त्री म्हणून होणारे अत्याचार माहिती आहे साऱ्यांना, दिसतंय ते पण कुठे संपेल, अंत आहे का ह्याचा … आणि शेवटी मिळेल का तिचं तिला हक्काचं जिनं ?… या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाचकडे नाही. …. ते वर्षानुवर्ष अनुत्तरीतच.  महाभारतातली पाच पांडवांची बायको द्रौपदी, रामायण मधल्या रामाची आई कौसल्या, बायको सीता, लक्ष्मणाची बायको उर्मिला, किंवा मग रावणाची बायको मंदोदरी  …. आई गांधारी किंवा कौरवांच्या बायका तरी सुखी होत्या का हो ? देवकी -यशोदा कि मग राधा…. मीरा तरी ?  हे सगळं पुराण समजून सोडून दिले तरी मग इतिहास तरी मागे आहे का ? सावित्री बाई फुले, अहिल्या होळकर …. आत्ताच्या सिंधुताई सपकाळ?  आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी तेअफगान ची मीना केश्वार कंवल , माया त्याग...

२४/७ ऑनलाईन

पिढी दर पिढी बदलत जाणारे विचार, वृत्ती, बुद्धीमत्ता ....कधी कधी अचंभित करणारे असतात . पूर्वी Generation gap मध्ये खरच Gap असायच. मग त्यातले बदल सुद्धा साहजिक आणि समजण्यासारखे होते ....पण हल्ली जस जशी टेक्नोलॉजी अपडेट होत जाते तस तशी आत्ताच येऊन गेलेली मागची टेक्नोलोजी मागच्या पिढी सारखी गणली जाते ....अगदी आत्ता आत्ता च आमच्या पिढीला कम्प्युटर पिढी म्हणून 'हुश्शार' असे काहीसे संबोधन मिळाले तेव्हा ऐकून अशी कॉलर वर यायची....पण आजच्या कोलेज मुलांना पाहून कम्प्युटर युग सुद्धा खूप मागे पडले असे वाटू लागले.....आजचे युग हे 'सोशल नेट्वर्किंग' चे. २४/७ एकमेकांशी जुळून राहण्याचे. खूप नशीबवान आहेत आजच्या पिढीतली मुलं खरतर . नुसते कम्प्युटर युग नाही तर आजच्या पिढीने तंत्रज्ञानातील अत्युच्च मजल गाठलेले सगळे टेक्निक्स डोळ्यासमोर पाहिलेत, बदल अनुभवलेत आणि प्रत्यक्षात त्या सर्वांचा उपयोग करून घेतला ......कोणतेही बदल हे चांगल्या उद्देशाने घडून आलेले असतात...सर्व प्रथम नजरेसमोर असते ती एकमेव मानव जात आणि तिची सोय. पूर्वी बदल सोयीसाठी व्हायचे. नवीन इंन्वेन्षण सुद्धा सोयीसाठी केले जायचे....

शाणु ....!!

'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय  …श्रावणी, हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज ' '…… हम्म   ' 'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस' श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला' बराच वेळ कॉट वर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली  … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली  तोंडावर उतरलेले केस मनगटाने मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.   तिने नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही.  डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले. भरलेल्या डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन उचलल्याचे लक्षात येताच ती आवा...

पटतंय का बघा ....

पर्वा पर्यंत प्रणव दवाखान्यात भरती होता...अवघ्या १०-१२ वर्षांचा असेल...सायकलीने घरी येत असतांना कुण्या तरुणीने भरधाव गाडीने सायकलीला कट लावला प्रणव रस्त्यावर पडला आणि पायावरून मागाहून येणाऱ्या कारचे चाक गेले ...'मल्टीपल फ़्रेक्चर' झाले आणि हा चिमुकला महिन्यांपर्यंत दुखणे सहन करत राहिला....काही महिन्यात प्लास्टर निघाले पण जन्माचे दुखणे मात्र पाठी लागून राहिले....श्वेता मुलाच्या शाळेतून 'पालक शिक्षक मिटिंग' करून परत येत होती , मेन रोड वरून शंभर एक पावलांच्या अंतराने आत तीच घर. पूर्ण घरापर्यंत ऑटो नेण्यापेक्षा इथेच उतरू म्हणजे तेवढच आपलं चालणं होत. म्हणून रोडवरच उतरली आणि घराच्या दिशेने चालू लागली. मागून येणाऱ्या भरधाव बाइक ने एवढ्या जोरात धडक दिली कि श्वेता उंच उडून कितीतरी दूर फेकली गेली...काय होतंय हे समजायच्या आत अंशतः शुध्द हरपली. जाग आली तेव्हा घोळका भोवती जमा होता. धडक कोणी आणि कशी दिली हे समजण्याची तिची मानसिकताच नव्हती....तिला दवाखान्यात नेले  तेव्हा तिच्या डोक्यात ब्लडक्लोट्स झाले होते आणि चेहेऱ्यापर्यंत रक्त उतरले होते..शरीराला प्रचंड मूक घाव होते...घरातल्या...

मोठ्ठ होण …. म्हणजे !!

शेजारच्या घरी गेले दोन दिवस तणाव दिसत होता…शुभम पण जरा फुगलेलाच होता रोज मजल्यावर खेळायचा तो कालपासून दिसलाच नाही … काय होतंय कळत नव्हते पण विचारणार कसे ?…. रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या घरात आवाज वाढला. शुभम च्या आईचा रडायचा आवाज येत होता आणि त्याच्या बाबांची त्याला आणि त्याच्या आईला उद्देशून बडबड सुरु होती…. असे कधीही यापूर्वी त्यांच्या घरी झाले नव्हते… माझा धीर सुटलाच  जेव्हा शुभम धाडकन दरवाजा आदळून घराबाहेर पडला आणि तंनतनत  एवढ्या रात्री घरातून चालता होऊ लागला … नेमकं काय होतंय हे विचारायला मी त्यांच्या दरवाजावर थाप देणारच होते तोच शुभम बाहेर पडतांना दिसला आणि त्याच्या मागाहून त्याची आई डोळ्यात अश्रू घेऊन…शुभम तनफनत निघून जाणार तोच मी त्याचा हात धरला आणि त्याच्या आईकडे प्रश्नार्थक नजर टाकली…. 'अग बघ न हा कस वागतोय आमच्याशी …. काल पासून जेवला सुद्धा नाहीये ' एवढच बोलून त्यांनी डोळ्याला ओढणी लावली…. मी नजेरेनेच वहिनींना शांत होण्यास सांगितले आणि शुभम चा हात धरून माझ्या घरात घेऊन आले …. आतून दार लावून घेतले…. शुभम अजूनही रागाने संन होता माझ्या इशाऱ्यावर तो बसला सोफ्यावर...

लग्न :- सर्वांग सुंदर सहप्रवास

लग्न म्हणजे दोन जीवांचा दोन मनांचा दोन परिवारांचा आनंद सोहळा. दोन संस्कृतींना एकत्र एका धाग्यात बांधू पाहणारी समाजाने निर्माण केलेली व्यवस्था. लग्न दोन भिन्न विचारधारांना सामंजस्याने एकाच वाटेवरून चालायला लावणारी आयुष्याची पायवाट. हिंदू संस्कृतीप्रमाणे सोळा संस्कारातील एक संस्कार.  स्त्रीपुरूषांमध्यें कायदेशीर प्रकारानें पतिपत्नीचें नातें निर्माण करून त्यांच्यामधील शारीरिक, धार्मिक व नैतिक संबंध निश्चित करणारी पध्दति म्हणजे विवाह होय. विवाहानंतर दोन लोकं एकत्र येतात एकत्र जगू लागतात त्यातून कुटुंब तयार होतं आणि समाजाचा प्रवाह अखंड रीतीनें वाहता राहण्यास मदत होते. पण म्हणून लग्न म्हणजे काही निव्वळ सामाजिक आणि शारीरक अनुबंध मात्र नाहीये. विवाह म्हणजे निव्वळ स्वप्नील, सुंदर,रम्य आयुष्य नाही प्रत्येक मनुष्यात उणीवा आहेत कुणीही परिपूर्ण नाही आणि या उणीवा समजून घेऊन एकमेकांच्या अपुर्णत्वाला आपल्या गुणांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हीच लग्नाची खरी सुंदरता.  विवाहानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या अनुषंगाने ग्रहण करावयाची समजदारी 'लग्नसंस्थेचा' हा मुख्य गाभा आहे. वरवरचं रंग...

मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे !

Image
मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे ! स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत….  तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि...