Book Review - सुरेश आकोटकर
सुरेश आकोटकर यांची प्रतिक्रिया आणि केलेल्या काही सुचना. माझ्या शिकण्याच्या प्रवासात या अनुभवी आणि जाणकार माणसांचे शब्द खुप महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. मन:पुर्वक धन्यवाद सर ! 🙏🙏 Suresh Akotkar रश्मी, नमस्कार . बीट्स अँड बाईट्स वाचलं .द्वादशीवार दादांनी थोडक्यात एकूणच लेखांच्या संदर्भात छान प्रस्तावना लिहिली .आपल्या मनोगतातूनही आपण या लेखांबद्दलची आपली भूमिका मांडली .जगभरातल्या स्त्रियांच्या शोषणाच्या कथा आणि व्यथा आपण अतिशय तळमळीने मांडल्या आहेत .बहुतेक अनुभव मन विषण्ण आणि विदीर्ण करणारे आहेत .आणि हे शोषण थांबावे असे बहुतेक लेखांच्या शेवटी आपण इच्छा व्यक्त केली आहे .परंतु कितीही निर्मळ मनाने आपण या प्रार्थना केल्या तरी पुढील काळात असे घडेल याची शाश्वती नाही .हजारो वर्षापासून हे घडते आहे .आपण अनेक देशातले संहारकतेचे हिंस्र स्वरूप अनेक लेखातून दाखवले आहे , ते आणखी कोणते आणि कसे संहार घडवून आणतील हे सांगणे अशक्य आहे .वाघासारखे हिंस्र पशू पोटासाठी बळी घेतात पण माणूस नावाच्या जातीला लागलेली ही माणसाच्याच हत्येची भयावह भूक कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही .कितीही कायदे आले आणि आजच्या युगात...