रात और दिन -दिवानगी अन मदहोशी
वेगळ्या विषयांवरील चित्रपट :- सक्तीची विश्रांती चाललीये सध्या आठवडा पूर्ण विश्रांतीत गेलाय आणि आता बोर व्हायला लागलंय. हालचाल फार करता येत नाहीये त्यामुळे गपगुमान बसून राहायचंय.. ऑप्शन नाहीये पुस्तकं वाचतेय आणि जमेल तसे बघायची इच्छा राहून गेलेले चित्रपटही हुडकून काढते आहे. काल असंच टीव्ही समोर बसले असतांना 'मदहोशी' सिनेमा लागलेला बिपाशा बासूचा. तसा बिपाशाचा सिनेमा म्हंटलं कि फार काही बोलण्यासारखं असेल असं वाटत नाही पण मदहोशी चित्रपट वेगळा आहे. ११सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या आतंकवादी हल्ल्यात तिने बहिणीला गमावले असते त्याचा तिच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि ती स्क्रिझोफ्रेनियासारख्या भयाण रोगाने ग्रासली जाते. आणि ती तिच्याच मनानं तयार केलेल्या एका वेगळ्याच विश्वात जगू लागते.एका काल्पनिक आतंकवादी विरोधी दस्त्याच्या सैनिकाच्या प्रेमात पडते. तो, त्याचं घर, त्याच्या सवयी सगळ्यावर जीव ओवाळून टाकू लागते. ती जे बघत असते ते इतर कुणालाही दिसत नाही .. हे सगळं लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो तोवर ती उपचारापलीकडे, पुरती वेडी होते. पुढे सिनेमाला चांगले वळण द्यायचे म्हण...