Posts

Showing posts from January, 2024

जगातील सर्वात घाणेरडा माणूस-अमो हाजीचा आंघोळ केल्याने मृत्यू -

Image
  #IntrestingStory #worldsdirtiestman #Iran सध्या थंडीचे दिवस आहेत आणि फेसबुकवर अनेकदा अनेकजण आंघोळ न करण्यावरून जोक करताना दिसतात. म्हणजे या दिवसात रोज रोज आंघोळ केली नाही तरी फार फरक पडत नाही अशी जवळ जवळ मान्यता असल्यासारखे लोक बोलतात. कुणी गमतीने म्हणतात आज आंघोळीची गोळी घेतलीय. कुणी म्हणतात अंगावर चार थेम्ब शिंपडून घ्यावे. बर्‍याच लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ देखील अनुभवली असेल जेव्हा आंघोळ करणे हे सर्वोच्च प्राधान्य नव्हते. त्याहून महत्वाची कामे होती, आजारपण वगैरे. आंघो ळीशिवाय काही दिवस चालूही शकत असेल पण जेव्हा तुम्हाला एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आंघो ळीशिवाय होतो तेव्हा गोष्टी थोड्या चिंताजनक आणि दुर्गंधीयुक्त होऊ लागतात, आणि अश्यात एखाद्याने वर्षभर आंघोळ केली नाही तर काय होईल ? अनेक वर्ष ? किंवा अगदी 67 संपूर्ण वर्षे? #अमोहाजी या नावाने ओळखल्या जाणार्‍या इराणी माणसाची ही जीवनपद्धती होती, ज्याला “जगातील सर्वात घाणेरडा माणूस” म्हणूनही ओळखले जाते. अमो हाजी (20 ऑगस्ट, 1928 - 23 ऑक्टोबर, 2022) यांनी आपले संपूर्ण आयुष्य इराणमधील देझ गाह गावात व्यतीत केले. त्याचे...