Posts

Showing posts from August, 2021
Image
  या आहेत त्या चारमधल्या दोघी - स्थळ - शताब्दी चौक, रिंग रोड विषय - #SaveChildBeggars वेळ - ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि हा जो फोटो टाकलाय त्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं एकतर झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या आणखी दोघी मुली आहेत. त्या स्वतःच चिमुकल्या असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्र्न विचारण्याआत भरभर भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग दोन-तीन दिवस गुडूप होतात. प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोकच्या भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ?? एका चौकात इतकी तर शहरात किती .. आणि राज्यात.. देशात ? ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं.. कु...

होऊन जाऊ दे ..

Image
परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली, पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं वाटलं आणि त्यातही स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच तिच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेली पुरणपोळी सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं. मन पुन्हा विचारांच्या हिंदोळ्यावर दोलायमान झाले.. आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्याचं निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे...

कोवळा स्नेह !

Image
आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या पॅसेंजर ट्रेनसारखं असतं.. आयुष्याच्या आरंभापासून आपण काही नात्यांच्या-मैत्रीच्या माणसांचा गोतावळा सोबत घेऊन निघतो. जसेजसे पुढे जात राहतो काही नाती घट्ट होतात, काही निखळतात मग पुढल्या थांब्यावर ही काही माणसं उतरतात, काही नवे चढतात. या चढलेल्या माणसांसोबत आपली गाडी पुन्हा कधी गतीने तर कधी संथपणे पुढे सरकत राहते. काही ठिकाणी गाडी जास्त वेळ रेंगाळते, काही थांबे सोडून पुढे पळत राहते. या थांब्यांवर चढणाऱ्या प्रवाश्यांना आपण वेगवेगळी नात्यांची लेबलं चिकटवत राहतो. कुठल्यातरी थांब्यावर माणसे उतरली कि ही लेबलं आपोआप गळून पडतात किंवा शिल्लक उरतात; पुन्हा काही माणसांना तीच ती चिकटवली जातात. नाती अनेक प्रकारची असतात. रक्ताची नाती, प्रेमाची नाती, मैत्रीची नाती, विचारांची नाती आणि काही तर गरजेची सुद्धा. या सगळ्यात सर्वात जास्त वाखाणलं जाणारं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर असणाऱ्या 'प्रेमातून प्रेमाकडे' या त्यांच्या पुस्तकात लिहिलेली अर्पण पत्रिका मला खूप भावली होती. त्या लिहितात.. ...