Posts

Showing posts from October, 2017

मुक्ती ..

Image
दु सरा वरीस उजाडला, यंदाच्या पारी दगा देणार न्हाई, कारल्याचा वेल लगलगून भरून येईन अन मागच्या वक्ताचं समदा गाऱ्हाना धुतला जाईन .. म्हणून मुक्तानं आस सोडली नोहोती .. गेल्या वक्ताले सोयाबीन कहाडला अन् बजार झाल्यावर माहेराहून धनधान धाडला, तवा माह्या बाबानं शेतातल्या माळावरच्या  कारल्याच्या जराश्याक बियाबी धाडल्या व्हत्या. पुरा ऐवज कपाटात कोंबून ठेवताले कारल्याच्या बियावरून 'भिक्कार माहेर' म्हनूनस्यान वाकडं तोंड दाखवू दाखवू सासूबाईन मले केवढाला दुषना लावला होता. मामंजींनंत बाप्पा, सप्पा बिया देल्त्या टाकून पडवीतल्या कोपऱ्यात....जाता जाता पच्च्चकन! पिचकारी मारली तंबाकूची टमरेटवर, आन खाकरत निंगून गेलते चकाट्या हाकाले ... तिच्या डोळ्यात भस्सकन पानीच आलन  ... पहासाठी व्हतच कोण ? गडी तं गेल्ता सहरात..नोकरीपाण्याचा बंदोबस्त कराले. अर्ध्या रातचाले तिनं जाऊन बिया वेचल्यान अन पदराले गाठ बांधून ठेवून देल्त्या. समदी रात्र इचाराचाच भूत सवार रायला तिच्या डोस्क्यावर. गावचा हिरवाकंच मळा, कारल्याचा चौफेर साजरा मांडव, घराचं मोकड-ढाकळं आंगण आन बिनमायच्या लेकीचा सुखाचा संसार पाहा...

झुंडीची झुंझ आणि जात-धर्माच्या अस्मिता !!

Image
धार्मिक अस्मितेची गोंदणं आम्ही आणखी किती वर्ष स्वतःच्या मेंदूवर गोंदून घेणार आहोत हा न सुटणार प्रश्न मला मागल्या काही आठवड्यापासून जरा जास्तच भेडसावू लागला आहे. शिक्षणानं माणसाच्या विचारांची कुंपण अधिक खुली व्हायला हवी, बऱ्या वाईटाचे धडे मिळाल्याने मन मोठी होऊन संवेदनेच्या जाणिवा जागृत व्हायला हव्या खरतर. पण होतंय काहीतरी विपरीतच. शिक्षणानं वैचारिक ब्लॉकेज खुलली नाहीच पण वेगवेगळ्या अस्मितेच्या नावाखाली आम्ही स्वतःला अधिकच जखडून घेतो आहोत, भोवतालची कुंपण शिथिल करायची सोडून ती अधिक करकचून बांधून घेतो आहोत आणि एवढे कमी कि काय त्याचा अभिमानही बाळगत हिंडतो आहोत. जातीच्या जाचातून बाहेर पडण्यासाठी 'लिबरल' हा शब्दप्रयोग बुद्धिवंतांमध्ये फेमस झाला होता. लिबरल म्हणजेच उदारमतवादी, पण आजच्या मतवाद्यांमध्ये खरंच तेवढं विचारांचं औदार्य आहे का हा संशोधनाचा वेगळाच विषय ठरेल. तर लिबरल होता होता आम्ही कधी संकुचित विचारधारेच्या विळख्यात अडकलो कळलेच नाही आणि त्याचे परिणाम बघून भोगुनही आम्ही आमच्यात बदल करून घ्यायला तयार नाही. मागल्या आठवड्यात समूहानं घडवून आणलेल्या धार्मिकतेच्या दांभिकतेचं...