Posts

Showing posts with the label पुस्तक परीक्षण

कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे

Image
“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असून समाजमान्य नसलेल्या किन्नर समूहाच्या यातना यात वास्तववादी पद्धतीने उलगडल्या आहेत. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे; स्वतः आंचल वर्माने लेखिकेशी संवाद साधत तिची जीवनगाथा सांगितली आहे. “कायांतर” हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक असून, मुखपृष्ठही स्त्री-पुरुषांतील द्वंद अधोरेखित करत विषयाला पूरक ठरते. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख सरमिसळ या कादंबरीत अत्यंत लयबद्धपणे घडताना दिसते. कादंबरीचा सूर आणि ताल एकरूपतेने पुढे सरकत राहतो, त्यामुळे वाचकाची उत्सुकता प्रत्येक पानागणिक वाढत जाते. आंचलच्या यशापासून सुरू होणारा प्रवास हळूहळू तिच्या बालपणात शिरतो आणि अश्विनच्या रूपात, पुरुषी देहात स्त्रीत्वासाठी चाललेली आतली धडपड लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटली आहे. दुःखातून भोगाकडे आणि पुढे यशाकडे वाटचाल करणारी आंचल आणि बालपणीचा अश्विन ही एकच व्यक्ती नव्हे तर जणू दोन वेगवेगळी रूपं वाटतात, तरी ती एकाच अस्तित्वाच्या दोन...

प्रगल्भ जाणिवांचा अविष्कारी संग्रह 'उन्हात घर माझे'

Image
नितीन भट यांना मी प्रत्यक्ष व्यासपिठावरून ऐकलंय. त्यांच्या गझलांतील आशय अर्थात गझलियत, त्यातील अंतर्भाव आणि त्यांचे आकर्षक सादरीकरण सगळंच प्रगल्भ जाणिवांतून अवगत झालेले असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. एकाच माध्यमांचे प्रवासी असल्याने पुढे वाढत गेलेल्या ओळखीतून त्यांचे संवेदनशील असलेले माणुसपण देखील पुढ्यात येत राहीले. अश्या जाणून असलेल्या कवीमित्राचा अत्यंत देखणा आणि वाचनीय असा 'उन्हात घर माझे' नावाचा गझल-कविता संग्रह हातात आला तेव्हा आनंद होणं सहाजीकच होतं. पुस्तकाचे ओढ लावणारे आकर्षक शिर्षक, साधेच पण देखणे मुखपृष्ठ, त्यावर लिहिलेली कोरीव सुंदर शब्दरचना आणि कवीची आत्ममग्न छबी. बघताक्षणीच एक सुंदर वाचनमेजवानी आपल्याला मिळणार आहे हे लक्षात आले. हातात आॅलरेडी दोन पुस्तकं वाचायची असल्याने 'उन्हात घर माझे' वाचायला जरा उशीर झाला पण वाचायला हातात घेतला तेव्हा अधाशासारखे एका बैठकीत वाचून काढला. त्यानंतर आजारपण आल्यानं लिहायचं मात्र राहीलंच, पण हा संग्रह स्वस्थ बसू देत नव्हता यावर लिहायचंय ही अस्वस्थता सतत छळत राहीली.   पुस्तकातल्या लक्ष वेधून घेणाऱ्या बाबी म्हणजे पुस्तक...

पुस्तक परीक्षण

Image
दोन पुस्तकं 'शेवटाचा आरंभ' आणि 'हँगमन' लेखिका - ज्योती पुजारी कल्पनेच्या भराऱ्या घेऊन लिहीलेल्या अनेक कथा कादंबऱ्या आपण वाचत असतो. एखादे कथाबीज घेऊन केवळ कल्पनेच्या धाग्यांवर एखादं तलम वस्त्र विणावं तश्या कादंबऱ्या तयार होतात.. पण सामाजिक विषयांवर, परिश्रम पुर्वक, प्रत्यक्ष भेटी घेऊन, संशोधन करून अभ्यासपूर्ण मांडणीतून वास्तववादी लिखाण करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतकी कमी आहे. अश्या पुस्तकांच्या वाचकांची संख्या तुलनेने कमी असली तरी, हे वाचक वेगळ्या आवडी-निवडीचे, बुद्धिवादी किंवा विचारवंत असतात. अश्या वेगळ्या वाचनाची आवड असणाऱ्या मास पेक्षा क्लास वाचकांसाठी अशी मूठभर पुस्तकं म्हणजे पर्वणीच असते. अश्याच वेगळ्या धाटणीतलं लेखन करणाऱ्या लेखिका म्हणजे ज्योती पुजारी. टेबलखुर्चीवर बसून कल्पनेचे घोडे दौडवण्यापेक्षा, भोवतालचा खराखुरा चेहेरा स्पष्ट करणारा, सत्यातला एखादा विषय निवडून, त्यावर अभ्यास करून, प्रत्यक्ष स्थळी जाऊन विषयाची उंची-खोली तपासत, पात्रांची भेट घेऊन त्यांचं आयुष्य समजून घेत.. सगळे बारकावे टिपत, त्यांची कथा-व्यथा साध्या सोप्या शब्दात वाचकांपर्यंत पोचवण्या...