Posts

Showing posts from 2016

२०१६ वर महिलांची मोहोर

Image
चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा, बघता बघता हे वर्षही सरले. दरवर्षी नेमाने येणारा क्षण पुन्हा जवळ आलाय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. सरत्या वर्षात काय गमावले, काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. नव्या वर्षात पदार्पण करताना भूतकाळाची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते. सरते वर्ष अनेक घडामोडींनी भरलेले राहिले अनेक मार्गाने उल्लेखनीय ठरले. कुठे सामाजिक बदलांची नांदी कानी आली तर कुठे भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं वाचनात आलीत. जातीय आरक्षणासाठी पुकारले गेलेले आंदोलन, नोटा बंदीने पिडला गेलेला सामान्य नागरिक, सत्तापक्ष-विरोधी पक्षाचे अटीतटीचे राजकारण आणि त्यात ढवळून निघालेला देश. अश्या अनेक घटनांच्या खुणा गोंदल्या जात असतांना वर्षभर महिलांच्या संबंधित देश-विदेशातून चांगल्या वाईट बातम्यांची धूळही उडत राहिली. कुठे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्न झाले. नेतृत्व गुणांना वाव मिळाला, मोठ्या पदांवर ती आरूढ झाली तर कुठे बलात्कार, अत्याचाराच्या घटनाही गाजत राहिल्या. अश्याच काही मुख्य घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटा प्रयत्न. ...

शब्द

शब्द सुचत नाहीत सुचावे तेव्हा अन पंक्तीतही बसत नाही बसवावे तेव्हा  मनमानी करून घेतात  वाटेल तिथे जाउन येतात  हळूच जागल्या रात्री मग  उशाशी येउन विसावतात    शब्द येत  नाहीत बोलवावे तेव्हा  स्वरातही खुलत नाही खुलवावे तेव्हा भावूक होऊन हिरमुसतात मुसमुसतात धुस्फुसतात हळूच ओल्या रात्री मग कंठाशी येउन गुणगुणतात शब्द शब्दाला जागतातही शहाण्यासारखे वागतातही शब्दांचा तोरा बदलला तर मग मौनात  जाऊन बसतातही शब्दांचे ऐकावे, शब्दांना सांगावे शब्दांचे चित्र शब्दांनीच रंगावे शब्दांशी भांडावे, शब्दांनीच मनवावे शब्द शब्द गोंजारून कवितेत मांडावे .... रश्मी मदनकर ११/१२/२०१६

मोगरा फुलला ...

Image
माझं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर लागलेलं. काहीतरी छान वाचत होती. तंद्री लागलेली, गालातल्या गालात हसणं सुरु होतं. तेवढ्यात काच वाजली. ती काचेबाहेरून काहीतरी बोलत होती. हातवारे करत होती. तिशीतली असेल, नाकीडोळी नीटशी पण जरा मळलेली. रापलेला चेहेरा. ठिगळ लागलेली साडी. विस्कटलेले केस. फारसे लक्ष न देता सिग्नल सुटायची वाट बघत मी पुन्हा मान खाली करत नजर फोनमध्ये घातली. तिने पुन्हा काच वाजवली, आवाज डोक्यात गेला ..रागच आला जरा. काच खाली ओढत ठणकावलेच मी. ''क्या है, दो मिनिट का सिग्नल लगा नही कि आ जाते हो भीक मांगने..शरम नही आती, निकलो यहांसे'' ''नाही ताई भीक नग, गजरा हाये.. घ्या कि दहाला तीन लावते.. छान दिसेन तुमास्नी' ' ती मी बघत राहिले तिच्याकडे .. तेवढ्यात सिग्नल सुटले. ड्रायवरने गाडी पुढे घेतली. मागे वळून पहिले. ती धावत होती शेजारी लाल झालेल्या दिव्यात थांबलेल्या  गाड्यांच्या दिशेने, कुठल्याश्या गाडीचा काच खणखणत ' छान दिसेन तुमास्नी' म्हणत होती.  तिचे शब्द कानात घोळत राहिले... माझे मलाच गिल्ट आले. घराच्या प्रशस्थ खोलीत किंवा एअरकंडिशन ऑफिसात बसू...

केमिकल लोचा (स्वगत)

तो एमबीबीएसचा मुन्नाभाई 'केमिकल लोचा' आहे असं म्हणाला होता तेव्हा ती गम्मत वाटली होती. पण केमिकल लोचा काय असतो ते कळायला लागण्याआत आपल्या डोक्यातच केमिकल लोचा झाला हे लक्षात आले. . गम्मतच वाटते कधीकधी ...  कधीकधी कशाला 'मैं हू हि नही इस दुनिया कि' असे कायमच वाटू लागलंय हल्ली.. आता प्रश्न सतावतो तो हा कि आपल्यालाच हे असं होत का? मनाच्या कोपऱ्यात शिरलेले पण बुद्धीत अडकून पडलेले अडगळीतले असे कित्तेक जुने विचार त्याचा गुंता अजून सुटत नसतांना नव्या विचारांच्या धाग्यावर गाठी सोडवण्याचा प्रयत्न करत बसतो आपण. हे काही विचार पुसता आले तर किती बरे ? कोरी कारकरकरीत पाटी कळीकभीन्न असली तरी मिळावी ना पुन्हा एकदा.... पुन्हा रेघोट्या ओढता याव्यात आपल्या मनासारख्या. हव्या त्या आकारात-रंगात .. पण असे होते कुठे? मानवशरीरातला हा 'बुद्धी' नावाचा प्रकार फार त्रासदायक असतो खरतर. 'अज्ञानात सुख' आहे असं म्हणतात ते उगाच नाही .... बुद्धीचा संबंध वयाशी असतो का?? कि ज्ञानाशी ...नाही नाही तो अनुभवाशी असावा. माहिती नाही पण फार बुद्धीचा वापर व्हायला लागला कि समाजाला किंवा संबंधित लो...

हम में है दम !

Image
बॉ लिवूड अभिनेत्रींचे सौन्दर्य नेहेमीच जगात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरही चाहत्यांबरोबरच समीक्षकांचीही करडी नजर असते. हॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या आणि तिथेही 'ब्युटी विद ब्रेन'ची प्रचिती घडवून आणणाऱ्या तीन बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवास दिपवणारा दिसत असला तरी त्यामागे किती संघर्ष आहे हे देखील जगजाहीर आहे. अश्‍याच गाजलेल्या या तीन घटना, याच वर्षी कान फिल्म फेस्टिवलला 'लॉरिएल' ची प्रतिनिधी म्हणून रेड कार्पेटवर आलेल्या ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक नेटिझन्सच्या टीकेचा विषय ठरला होता. प्रियंकाने व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामांबरोबर घेतलेले डिनर आणि हल्लीच हि सर्व चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याचे कारण म्हणजे 'एमटीव्ही एमा' अवॉर्डसाठी आलेल्या दीपिकाच्या ड्रेससिंग स्टाइलवरून पुन्हा एकदा जगभर तिच्यावर टीकेची लाट उठली आहे. असं म्हणतात कलेला कोणतेही गाव नसते, देश, जाती धर्म, पंथ अशी कुठलीही चौकट त्यांना अडकवू शकत नाही. 'कला' हा कलाकाराचा एकच धर्म असतो, तीच त्याची जात आणि तो त्यात किती माहीर आहे त्यावरच त्याची श्रीमंतीही गणल...

*“ब्राह्मण हरवला आहे...!!!”*

_*स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.*_ *कांबळे*: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो. *जोशी*: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरचं !! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का? *कांबळे*: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले. *जोशी*: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झाले नाहीत? *कांबळे*: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे? *जोशी*: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्य...
Image
 हे महाशय माधव कारेगावकर पोलिस खात्यातून पोलीस निरीक्षकच्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. वयवर्ष 64 .. अमरावतीच्या रस्त्यावर भेटले. तरूण सैनिक सिमेवर जीव गमावताय त्याचं प्रचंड दुःख बाळगून आहेत. वय वृद्धत्वाकडे झुकणारे असले तरी विचाराने अगदी तरुण असणाऱ्या, बोलण्यात प्रचंड उत्साह आणि काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्याशी बोलतांना सहज जाणवते. ''आमच्यासारख्या साठीच्या माणसांना रिकामपण असतं...अर्ध जगणं झालेलं असतं. मरणाची वाट पाहत बसण्यापेक्षा, सरकारनं आम्हाला सीमेवर पाठवावं आणि देशसेवेची संधी द्यावी'' अशी मागणी पंतप्रधान मोदींपर्यंत पोचवायला ते देशभर एकटेच फिरताहेत .. अश्या माणसांना अन त्यांच्या विचारांनाही सलाम!

एक खूबसूरत दर्द 'शरबत गुल'

Image
अ फगाणिस्थान युद्धाच्या वेळी तिथून जीव वाचवून पळून आलेल्या हजारो कुुुटूूंबाात एक कुुुुटुंब हिचंही होतं. त्यावेळी अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियन आणि मुजाहिदींन यांनी युध्‍दभूमीच साकारली होती. अनेक परिवार पाकिस्तानमधल्या निर्वासित छावणीत वास्तवास आले होते. आपली घरे-दारे सोडून देशोधडीला लागलेल्या,अफगाण युद्धाच्या झळा सोसणाऱ्या शरणार्थींची बातमी करतांना 1984 साली छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्यूरीने निर्वासित छावणीत एका किशोरीचे छायाचित्र कॅमे-यात कैद केले होते. नॅशनल जिओग्राफ‍िक मास‍िकात ते प्रसिद्ध झाले आणि छायाचित्रकारालाही अपेक्षा नव्हती तेवढे ते प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले, हिरव्या रंगाच्या डोळ्याची 'अफगाण गर्ल' सर्वत्र चर्चेचा विषय झाली. त्यावेळी तिचे नाव कुणालाही माहिती नव्हते. 'अफगाणी मोनालिसा' अश्याच नावाने तिला ओळखले जाऊ लागले. छायाचित्रकाराच्याही करिअरचा तो टर्निंग पॉईंट ठरला. हळूहळू युद्धाचे वारे निवळले, तो काळ लोटला आणि ती हिरव्या डोळ्यांची निर्वासित मुलगी विस्मरणात गेली. पण ज्या चित्राने त्याला प्रकाशझोतात आणले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवले अशी ती चित्रातील हिरव्य...

मिसाल-ए-हिम्मत - नादिया मुराद

Image
  ब्रि टनने इराकवर युद्ध लादले तेव्हा 'ती' केवळ 8 वर्षांची होती. देशावर संकट कोसळलंय पण आपल्यासाठी पुढे आणखी काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही तेव्हा तिला आला नसावा. 2014 - दिवसेंदिवस अस्थिर होत कोलमडून पडलेल्या इराकी शासन व्यवस्थेचा सोयीस्कर गैरफायदा घेत धर्माच्या भ्रामक कल्पनेवर जगणाऱ्या 'इसिस' सारख्या खुंखार आतंकवादी संघटनेने तेथे आपले पाय पसारायला सुरुवात केली. हळूहळू कित्तेक भागावर जोम बसवला, तेथील दुर्बल घटकांवर विशेषतः गैरमुस्लिम याझिदी वंशाच्या लोकांवर अत्याचार होऊ लागले. अनेक यजिदी देशोधडीला लागले, अनेकांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. अजूनही इराकमध्ये रक्ताचे पाट वाहतच  आहेत. ज्या लोकांनी जीव वाचवून पळ काढला ती नशीबवान ठरली, पण जी माणसं त्यांच्या तावडीत सापडली  ती एकतर जीवे गेली किंवा या अतिरेक्यांच्या क्रौर्याचे शिकार झाले. २०१४ मध्ये पाच हजार याझिदी महिलांना आयसिसने लैंगिक गुलामगिरीत ढकलले. अश्याच इसिसच्या तावडीत सापडलेल्या आणि नरकयातना भोगून परत आलेल्या एका 23 वर्षांच्या साहसी तरुणीची नादिया मुरादची हि चित्तथरारक कथा! ती ऐकतांना कुठल्याही पापभिरू...
काही नाण्यांची खणखण अन काही नोटांची फडफड खिशात होत राहावी म्हणून अक्ख आयुष्य वनवन करतो माणूस सगळं जग भटकून अखेर हातात उरतं काय ... तर निव्वळ ओंजळभर रान  

शब्द ..

मनाशी मनाचं बोलत राहतात शब्द इकडे तिकडे डोलवावेत तसे डोलत राहतात ..... गच्चं रानात आढळावी एखादी अनवट पायवाट आणि वाटेचे शेवटचे टोक शोधत अंधारात चाचपटत चालत जावे सरळ,  तसे चालत राहतात विचार रात्रभर बरसत राहतात, अनंत जुने संदर्भ आठवणीच्या सरींनी भिजून पाझरत राहतात आत बाहेर थेंब थेंबाने ओथंबून वाहू लागतात दूर कुठेतरी क्षितिजावर शुक्रतारा चमकत राहतो तसा मग एखादाच विचार गहिवरून येतो स्मृतीपटलावर तरंग उठवतो मनाच्या तळ्यात अन अखंड लुकलुकत राहतो तेथेच रात्रभर …. डोळे टक्क उघडे नजर छताकडे ध्यान शून्यात …. अपरिहार्य …. अटळ हा विचारांचा डोलारा…. मनभर रात्र सरते ... हळूच मग विचारांना पंख फुटतात,  अन भिरभिरतात ... शब्द मनाशी मनाचं बोलत राहतात इकडे तिकडे डोलवावेत तसे डोलत राहतात …शब्द !!

|| एका वडिलांचं मुलाला पत्र ||

बघ, वाच, ठरव ! माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय, त्याची कारणं तीन. 01) जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या ब-या. 02) मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार. 03) मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय. वाचून ठरव, जमल्यास लक्षात ठेव, आयुष्यभर! 04) माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी काय...

Rj Shubham We will miss u ..

Image
'हाय नागपूर' अशी हाक मारणारा शुभम अकस्मात नाहीसा झालाय, त्याचा आवाज गहाळ झालाय आता तो कधीच ऐकायला येणार नाही हि बातमी सर्वच नागपूरकरांसाठी धक्कादायक आहे. सकाळी सकाळी 7 वाजता  ‘रेडिओ मिरची ९८.३’ ट्यून केले कि नागपुरी लहेजा असणारा एक बिंदास आवाज ऐकायला यायचा हा आवाज म्हणजे कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि सवयीचा भाग झाला होता. हा आवाज होता आरजे शुभमचा. 'लाईफ में हो झोलझाल तो शुभम को बोल डाल' असं ठणकावून सांगणारा 24 वर्षांचा शुभम, . रोज नागपूरकरांच्या हृदयाचे स्पंदने वाढविणारा शुभम इतक्या कमी वयात हृदयआघाताने जाईल अशी कल्पनाही करवत नाही. Shubham We will miss u .. शुभमच्या दुःखातून सावरण्याची ताकद त्याच्या परिवाराला दे प्रभू. इतकेच मागणे

महाश्वेतादेवी कि कविता

Beautiful lines by Mahadevi verma !           आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..! जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..! बाहर किलोलते बच्चों से, थोड़ी शरारत माँग लाना..! वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है.. तोड़ कर पहन आना..! लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो.. तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..! देखो, शाम बिछाई है मैंने, सूरज क्षितिज पर बाँधा है, लाली छिड़की है नभ पर..! प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है, घूँट घूँट पीना..! सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

सोंग

जगण्याचाच शाप झालाय मृत्यू पावलय सगळंच संवेदनेचा मृत्यू सहिष्णुतेचा मृत्यू जगण्यासाठी लागणाऱ्या संभावनेचा मृत्यू मृत्यू पावलाय माणूस माणसातलं माणूसपण मरण पावलंय जगणं जगण्यातलं मीपण विचार मेलेत, आचार मेलेत मेलेत सगळे संस्कार मेलीय ओळख, मेलाय संवाद उरलाय केवळ अंधार मेली मैत्री मेलंय प्रेम नातीही मृत्यू पावली मेला जिव्हाळा नि मेली माया उरलीय केवळ काया आता जगतायेत अर्थहीन सुरावटी रंगरंगोटी चढवलेला मुखवटा आयुष्य सरकत राहते  जिवंतपणाची खून शोधत उंची गाठता गाठता हरवलेली खोली शोधत उडण्याचे स्वप्न पाहत मरण्याआधीची कन्हती आत्मा त्याच त्याच वर्तुळात भटकत राहते वांझोट्या अपेक्षांचे बोचके कोंबत प्राणहीन शरीर सोंग वठवत राहते Rashmi  / 19/10/2016

कहो - अमृता प्रितम

वह कहता था, वह सुनती थी, जारी था एक खेल कहने-सुनने का। खेल में थी दो पर्चियाँ। एक में लिखा था *‘कहो’*, एक में लिखा था *‘सुनो’*। अब यह नियति थी या महज़ संयोग? उसके हाथ लगती रही वही पर्ची जिस पर लिखा था *‘सुनो’*। वह सुनती रही। उसने सुने आदेश। उसने सुने उपदेश। बन्दिशें उसके लिए थीं। उसके लिए थीं वर्जनाएँ। वह जानती थी, 'कहना-सुनना' नहीं हैं केवल क्रियाएं। राजा ने कहा, 'ज़हर पियो' *वह मीरा हो गई।* ऋषि ने कहा, 'पत्थर बनो' *वह अहिल्या हो गई।* प्रभु ने कहा, 'निकल जाओ' *वह सीता हो गई।* चिता से निकली चीख, किन्हीं कानों ने नहीं सुनी। *वह सती हो गई।* घुटती रही उसकी फरियाद, अटके रहे शब्द, सिले रहे होंठ, रुन्धा रहा गला। उसके हाथ *कभी नहीं लगी वह पर्ची,* जिस पर लिखा था, *‘कहो'*। -Amrita Pritam

स्मिताच्या स्मृतीने दरवळणारा पुरस्कार

Image
उत्कृष्ट अभिनयाचं कौशल्य हे नुसतेच सुंदर दिसण्यावर कसे भारी पडू शकते ह्याचे सर्वात जिवंत उदाहरण कायम केले ते स्मिता पाटील हिने. हिरोईन व्हायचं असेल तर गोरं चामडं आणि रूपवती असलंच पाहिजे हे भारतीय चित्रपटांचं शतकात चोख बसलेलं सूत्रच बदलवून टाकणारी मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणारी हि गुणी लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील.  या अभिनेत्रीने हिंदी- मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटील यांना जाऊन आज 30 वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव अग्रगण्य ठरते. तिच्या नंतरही कित्तेक हिरोईन आल्या अन गेल्या पण भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवलेली स्मिता कधीच सिनेरसिकांच्या विस्मरणात जाऊ शकली नाही. दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या स्मिता पाटीलची आत्ता इतकी ठळक आठवण येण्याचे कारण म्हणजे हल्लीच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिला 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार सोहळ्याने सन्म...

हाक - बलुचिस्थानची

Image
  ब लुचिस्थान मधील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष करीमा बलोच हिने नुकतंच एका विडिओद्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भावुक करणारा संदेश पाठविला होता. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ संदेश मोदींपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करीमाने केला त्यात तिने म्हंटले होते कि, 'बलुचिस्थान मधल्या महिला तुम्हाला भाऊ मानतात, पाकिस्तानच्या चांगुल मधून स्वतंत्र करण्यास आपण पुढे येऊन आमची मदत करावी.' मोदींना भाऊ संबोधून बलूचमध्ये सध्या सुरु असलेल्या नरसंहार, अपराधीक घटना, अत्याचार विरुद्ध त्यांच्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर मदतीची मागणी करावी. त्यांच्या पाठी उभे राहावे असे आवाहन तिने केले होते. नरेंद्र मोदी दर महिन्याला देत असणारा संदेश 'मन कि बात' चे प्रसारण आता बलुचिस्तानात बलूच भाषेतही होणार यासाठी केंद्र सरकारने आता परवानगीही दिली आहे.  भा रताने पाकिस्तानसाठी नीतीत अचानक काही बदल घडवून आणले आणि पाकिस्तानात खळबळ माजली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्या भाषणातून पाकिस्तानमधील अधिकृत काश्मीर आणि बलुचिस्थान मधील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आ...

वैनगंगा ..

Image
भंडाऱ्या जिल्ह्यातील लाखनी वरून परतीच्या रस्त्यावर, धावत्या गाडीतून सूर्यास्ताच्यावेळी घेतलेले हे वैनगंगा नदीचे  चित्र 

माजघरातले रुदन ..

Image
अतिशय कर्तृत्ववान, हुशार, देखणी असलेली स्वकर्तृत्वाच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवून सांस्कृतिक क्षेत्राची लाडकी झालेली. करिअरच्या उत्तुंग शिखरावर असतांना आयुष्यात घेतलेल्या एका चुकीच्या वळणाने आयुष्यच श्राप बनून बसलेली डॉली. गुणी निवेदिका म्हणून नागपूरकरांच्या घराघरात पोहचलेला एक सुंदर चेहरा तिच्या चाहत्यांच्या आणि एकंदरीतच समाजासमोर मोठा प्रश्नचिन्ह सोडून आज ब्रेनडेड होऊन निपचित पडलेली आहे. तिची हि करून कहाणी.    ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण आयुष्यच समर्पित केले अश्या माणसाने फसवणूक केली. सात महिन्याआधी सप्तपदी चालून ज्याच्या उंबरठ्या आत पाऊल ठेवले त्या नवऱ्यानेच दगा दिला. पैशांसाठी, हुंड्यासाठी पिळवणूक केली. शारीरिक मानसिक अत्याचार केले. म्हणून वाढदिवसालाच फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉलीला तिच्या माहेरच्या माणसांनी ताबडतोब उपचारार्थ भरती केले परंतु तोपर्यंत डॉली कोमात गेली होती आणि आता नागपूरच्याच कुठल्याश्या रुग्णालयात अति दक्षता विभागात मरणासन्न अवस्थेत मृत्यूशी झुंझ देते आहे.  हल्लीच दिल्लीत आप या राजकीय पार्टीचे मोठे नाव असलेला नेता...

स्क्रिझोफ्रेनिया

Image
आपल्या अवतीभवती अनेक प्रकारची माणसे आपण रोज पाहत असतो. जितकी माणसे, तितकेच निरनिराळे स्वभाव. "जितक्‍या व्यक्ती तितक्‍या प्रवृत्ती', अशी म्हणच आहे. या सगळ्यात आपण सामावून गेलो असतो. त्या सगळ्यांना स्वीकारले असते. स्वतःलाही त्यांच्यात सामावून घेतले असते. पण, कधीतरी विचित्र वागणारी माणसे दिसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात समन्वय नसतो. सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळ्याच हालचाली ते करीत असतात. असंबंध बडबडत असतात. त्यांना आपण विक्षिप्त किंवा पागल ठरवून मोकळे होतो. पण, त्यांना असे का झाले असावे, त्यामागची कारणे काय, त्यावर उपाययोजना काय, याचा विचारही आपण करत नाही. अनेकदा अशी लोक स्क्रिझोफ्रेनियाचे रोगी असू शकतात. काय आहे हे स्क्रिझोफ्रेनिया प्रकरण? स्क्रिझोफ्रेनिया हा रुग्णाच्या विचार, भावना व वर्तणुकीवर परिणाम करणारा मानसिक आजार आहे. हा विकार दीर्घ काळ चालणारा, गंभीर व मानसिक संतुलन बिघडविणारा आजार आहे. या आजारात रुग्ण जीवनातल्या वास्तविकतेपासून दूर होत जातो. त्याला वास्तविकता व भ्रम यात फरक समजून येत नाही. बऱ्याचदा तो काल्पनिक जीवनात रममाण होतो आणि तसेच वर्तन कर...

सुंदर दिसण्याचा रामबाण उपाय

Image
"डॉ .हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना" त्या तरूणीची आई सांगत होती. "ग्लो येण्यासाठी म्हणजे ?" माझा प्रतिप्रश्न "चेहरा उजळण्यासाठी !...चेहरा कसा ना, असा चमकला पाहिजे." "मग कानाजवळ दोन छोटे छोटे एल ई डी  बल्ब लावा की, सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल." "डॉक्टर , तुम्ही चेष्टा करताय हं !" "नाही, मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे " "तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत. तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ; पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय.  एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा  तेज यायला पाहिजे " डॉक्टर हसले "का हसलात?" तिनं विचारलं. "तू आधी काय वापरत होतीस?". "फेअर अँड लव्हली ,फेअरएवर ,फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही !पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ?काडीचाही फरक नाही." ती.  "बरोबर आहे ...

न्यायमूर्ती डॉ मंजुला चेल्लुर

Image
http://epaper4.esakal.com/31Aug2016/Enlarge/Nagpur/NagpurToday/page12.htm

माणुसकीचा बोन्साय ...

Image
जन्म नेमका कशासाठी घ्यायचा, कशासाठी जगायचे आणि काय नेमके काय करून मरायचे हे बरेचदा अनेकांना सतावणारे प्रश्न असतील. जगतांना येणाऱ्या सगळ्या संकटांना सगळ्या कसोटींना तोंड द्यायला तयार असणारा माणूस, कष्ट करत दुःख भोगत जगणारा माणूस, एकमेव शाश्वत सत्य असणाऱ्या 'मृत्यूला' मात्र घाबरतो,. खरतर आयुष्यच  माणसाला जन्मभर छळत असतं. आयुष्य नावाच्या यातनांतून सुटका हवी असेल तर एकमेव मार्ग ...  मृत्यू. कवी सुरेश भटांच्या ओळी आठवतात  'इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते'  ... पण ज्यांनी जीवनही वेदना हृदयाशी कवटाळून गोधडीच्या चरचर झालेल्या चिंध्यासारखे निष्प्रभपणे जगले, सुखाच्या सावलीचाही स्पर्श ज्यांच्या वाट्याला कधीच आला नाही अश्या अभाग्यांना मृत्यूनंतरही सुटका मिळू नये? मृतदेहाचीही विटंबना व्हावी... स्मशानापर्यंतचा प्रवास आयुष्याहून अधिक खडतर व्हावा हि कसली नियती? सरणापर्यंत पोचायलाही यातनांचा पूल पार करावा लागावा अन मृतदेहालाही ठेचकाळत, डुचमळत जावे लागावे.  वैकुंठापर्यंतचा प्रवासही असा पीडादायी असावा.  गरिबीच्या झळा माणसाला कुठवर ...

अल्झायमर - एक गंभीर समस्या

Image
अल्झायमर - एक गंभीर समस्या काही मानसिक आजारांवर आपल्या देशात फारशी चर्चा होत नाही. खरतर मानसिक आजारात वेगवेगळे आजार असतात आणि योग्य उपचाराने ते बरेही होतात.  याचेच मुळी ज्ञान आम्हाला कमी आहे. मानसिक आजार म्हंटले कि ती व्यक्ती ठार वेडी असते या एकाच निष्कर्षाप्रत आम्ही पोचतो. म्हणजेच ठार वेडे होणे या टोकापर्यंत पोचेपर्यंत मधल्या काळात रुग्णाला होणार त्रास किंवा त्याच्यातले बदल टिपले सुद्धा जात नाही. मग पुढे त्याचा गांभीर्याने विचार होणे किंवा उपचार करवून घेणे, त्याची सहृदयाने काळजी घेणे या अपेक्षा गौणच राहतात. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होण्याचे कारण फक्त समाज, नातलग किंवा लोकच करतात असे नाही तर मानसिक आजारांवर हवे ते उपाय करता यावे म्हणून संशोधन घडवून आणून नवनवी उपचार पद्धती विकसित करणे किंवा तसे तंत्रज्ञान उपलब्ध करवून देणे यातही फारसे गांभीर्य दाखवले जात नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे 'अल्झायमर' सारखा आजार. काही वर्षाआधी अल्झायमर रोगाचा प्रादुर्भाव फार नव्हता. पण आज 40 लाख लोकांना अल्झायमर सारखा मानसिक आजार असल्याचे आकडे सांगतात. आणि आकडे असेही सांगतात कि आज वाढतोय त्य...

भय इथले संपत नाही ...

Image
मंगला जेधे नावाच्या महिलेच्या खुनाच्या आरोपावरून संतोष पोळ नावाच्या बनावट डॉक्टरला अटक होते आणि एक दोन नाही तर तब्बल 6 खून त्याने केले असल्याचे तपासात उघडकीस येते. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे प्रत्यक्षात उतरलेले प्रकरण, हाहा म्हणता राज्यभरात चर्चेचा विषय ठरते आणि पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेची संतापजनक प्रतिक्रिया सगळीकडे उमटू लागते. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मागल्याच आठवड्यात हा सारा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेसोबत एकंदरीतच प्रशासनावर प्रश्न उभे राहिले. हि बातमी वाचली आणि नकळत डोळ्यासमोरून भूतकाळ सरकू लागला. मला आठवतं मी लहान असतांना अमरावतीला आजोळी गेले होते. दर उन्हाळ्यात सुट्ट्यात जायचो. एरवी सतत भटकंती करायला हौसून असणारे मामा-मावशी त्या उन्हाळ्यात मात्र कमालीचे धास्तीत होते. तरुण मुलींनी घरातून बाहेर पडायचे बंद केले होते.1991-92 सालातील ही घटना असावी. रस्त्याने जाणाऱ्या मुलींच्या घोळक्यातल्या बरोबर डाव्या बाजूच्या मुलीवर सायकलने येऊन चाकूने हल्ला करणाऱ्या सीरिअल किलरच्या दहशतीत संपूर्ण अमरावती शहर वावरत होते. पु...