Posts

Showing posts from February, 2018
Image
पाषाणागत उभी सावली  गर्द काजळी शून्य एकटी भग्न मनाच्या गुहेत दडली एक कहाणी घुसमटलेली अर्ध्या उघड्या दाराआडी कंकणांची होते किणकिण अगतिक अन उदास पोकळ भरल्या डोळी भकास मिणमिण आर्त कोवळी हाक अनावर थिजून आहे आत अधांतर वाट पाहता थकले लोचन स्वप्नांमधली वाटच धूसर आकाशवेदना उष्ण कवडसे अंगणभर बघ बसले पसरून तू जाता मग सारेच विझले आले वादळ उगाच उसळून  कितीक वळणे या वाटेवर अंधारलेली काळीकभीन्न कितीही येवो वादळवारा एक ज्योत जपलीय पेटवून. रश्मी मदनकर                                                                         २३.०२.18
#मराठीगझल शब्दासाठी शब्द उमटले, भाव कुठे हे दिसेल का मग मौनामध्ये भाव उमटता, वाचून तुजला कळेल का मग ! हुंदक्यामध्ये दडून बसले, दुःख निनावी आतच विरता गालामधल्या हसूत ओझर, डोकवतांना दिसेल का मग ! स्वप्नांमध्ये स्वप्न पेरूनी, उगवेल काही आर्जव करता पहाट प्रहरी स्वप्नच भंगता, नविन काही रूजेल का मग ! रूप देखणे वरवरचे ते, अंतरातला डोह उपसता शुभ्र मनाचे सुरेख कोंदण, मनात तुझीया भरेल का मग ! हातामध्ये हात घेऊनी, नजरेलाही नजर भिडवूनी प्रित तुझ्यावर जडली वेडे, हळूच तो हे म्हणेल का मग ! (C)रश्मी पदवाड मदनकर
Image
हे काय हवेत मिसळते ही कसली धुंदी चढते मृदगंध हवेत पसरता मी क्षणात अशी विरघळते  ही हाक कुणाची येते अन अंग अंग थरथरते मी सावरते देहाला पण वेडे मन तळमळते ही कसली कुजबूज कानी हे काय मनी सळसळते श्वासांत गंध उतरतो मी अखंड मग भिरभिरते. का चंदन होते काया गात्र गात्र मोहरते कान्हाचा पावा शोधत मन राधा राधा होते. हे पापण का ओलवते का कंठ दाटूनी येते काठाशी थेंब ओथंबता क्षणक्षण मन गहीवरते... रश्मी पदवाड मदनकर 11 feb 18

फुगे .. !

आज सकाळी आरव चक्क चोरी करतांना पकडला गेला. काही दिवसांच्या आरवच्या वागण्यानं शशांक वैतागला होता. आज त्यानं आरवला चांगलाच चोप दिला. त्याच्या गालावर पाठीवर वळ उमटून आले होते.. एरवी ६ वर्षाच्या त्याच्या लाडक्या लेकाला काही कमी पडू नये म्हणून राबणारा शशांक कालपासूनच जरा जास्तच चिडला होता. काल टीचर-पॅरेण्ट मीटिंग होती शाळेत. निकाल घसरला होताच शिवाय 'हल्ली आरवचं शाळेत अजिबात लक्ष नसतं, तो त्याच्याच तालात मग्न असतो' या  टिचरच्या शब्दावरूनही जरा वाईटच वाटलं त्याला. आपण कुठे कमी पडतोय का म्हणून त्यालाच गिल्ट यायला लागलं. असं गिल्ट आलं कि तो जास्तच चिडचिड करायचा. त्यात आज हा प्रताप आरवनं केला होता. आरवला खिशातून गुपचूप  पैसे काढतांना पाहून शशांकचा पारा पार बिघडला, तापला आणि आरवला त्याने नको तेवढे चोपले. मालतीचा जीव कळवळत होता, ती दोघांमध्ये बचावाला आली तर शशांक  संतापून ओरडला... '' थांब आई .. तुझ्याच  लाडानं शेफारलाय तो..आज ह्याला सरळच करायचंय, अजिबात जेवायला द्यायचं नाही त्याला आज. आणि काही गरज नाही त्याच्याशी बोलायची देखील ...ताकीद समज हवतर '' आरव रडत ...

६०३ !

Image
६०३  ! ३०३ चा दरवाजा उघडाच होता, मी जरा वाकून पाहिले, कुणी दिसलं नाही म्हणून हाक मारली 'कुणी आहे का घरात ? ' नॅपकिनला हात पुसत कुणावर तरी धुसफुसत बडबडतच मिसेस चौरे बाहेर आल्या. 'कोण ~~ ?.... बोला.. कोण पायजेल ?' हातातला घडी घातलेला टॉवेल पुढे करत, मी 'हा तुमचाय का ? आमच्या बाल्कनीत पडला होता ' त्यांनी डोळे फाकून खालून वरपर्यंत पाहीले अन नवलाचा खाक्या फेकत वरच्या पट्टीत  'तुम्ही ~~२०३ ला राहायला आलात त्या का ?' 'होय... म्हणजे आम्ही ना पुण्याहून ...' वाक्य अर्धच तोंडातच राहिलं, चौरे बाई त्याच पट्टीत परत बोलत्या झाल्या 'हम्म ..तरीच म्हणलं म्हाईत कसं नाही ' 'अं ! तुमचा नाही का टॉवेल ?' मी जमेल तितक्या नम्रतेने. तसेच डोळे फाकवुन मानेने इशारा करत  'ना~~ही, त्यावर नाव असेल बघा ' मी प्रश्नार्थक चेहेरा घेऊन त्यांच्या मुलखावेगळ्या हावभावपूर्ण चेहेऱ्याकडे बघत मक्ख उभी 'नाव असेल नाव, अहो... त्या टॉवेलच्या बॉर्डरवर नाव लिहिलंय का बघा...लिहिलंय का काय म्हणजे असेलच, आना हिकडं मीच बघते' एवढं बोलत त्यांनी हातातला ट...

धर्मा... तू का मेलास बाबा ??

  धर्मा पाटील यांचा मृत्यू ही संवेदनशील जीवाला चटका लावून जाणारी घटना आहे. पण समाजात अश्या घटनांनंतर माणसांची जी रुप पाहावयास मिळतात ती अधिक क्लेशकारक आहे. काहींच्या पोस्ट वाचल्या आणि मन फार उद्विग्न झालं. इतका काय स्वार्थी झालाय साधारण माणूस सुद्धा. राजकारणाचेही राजकारण करण्याइतका.. प्रत्येक घटनेचे भांडवल करून, आग लावून त्या निखाऱ्यांवर पोळी भाजून घेण्याइतका स्वार्थी. एवढाच काय तो आयुष्याचा उद्देश राहिलाय का ? किती मुखवटे घालायचे अजून  .. अंतर्मुख करायला लावणारी हि घटना आहे... विचार करायला हवा. ********************************************************* धर्मा तू का मेलास बाबा.. दुनिया अशीच आहे .. हे ठावूक नव्हतं का तुला ? तुझ्या जगण्यात ज्यांना तीळमात्र रस नव्हता ते तुझ्या मरणाचं आता भांडवल करत सुटतील तुझ्या माती झालेल्या जिवावर हे स्वतःची चांदी करतील. तुझ्या जगण्याच्या संघर्षात वाऱ्यालाही न येणारे तुझ्या मरणाला हवा देत राहतील.. निखारा पेटता राहो म्हणून फुंकर घालतील .. हे ठावूक नव्हतं का तुला ? तुझ्या भुकेची काळजी दाखवून शब्द शब्द पेरतील तुझ्या फाटक्या संसाराची गत पाहणार नाही...