स्त्री-स्वातंत्र्याचा लढा कि तिढा ..
बाई, बुब्स आणि ब्रा' या आशयाची खळबळ माजवून देणारी, चर्चेला ऊत आणणारी आणि नेटकरांसाठी चर्वित चर्वणाला खाद्य पुरवणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिची एक फेसबुक पोस्ट अत्यंत वायरल झाली आणि पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर येऊन उभा राहिला. तिच्या एका व्हिडीओवरून सुरु झालेला हा वाद आता स्त्रीस्वातंत्र्याच्या विषयापर्यंत येऊन चिघळला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. ''स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,'' असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. सोशल मीडिया हा आ...