सोशल मिडीया आणि आमच्या अस्मिता !!
प्रत्येक तंत्रज्ञानाचा शोध हा गरजेतून लावला जातो. जगणे सोपे व्हावे हा खरा उद्देश. उर्जेची बचत, वेळेची बचत आणि कमी श्रमात अधिक कार्य या गरजा लक्षात घेता त्यासाठी लागणारी सोय म्हणून नवनवीन शोध लावले जातात आणि त्यानुसार नवनवीन तंत्रज्ञान आमच्या दिमतीला तयार होत असतात. आजचे युग म्हणजे 'सोशल मिडिया'चे युग. आजची पिढी या स्वप्नील विश्वात पुरती डुंबून गेली आहे. इलेक्ट्रॉनिक जगातली हि एक नवीच कम्युनिटी तयार झाली आहे. इथेंच सगळं जग आणि हेच आमचं जगणं असं काहीसं होऊन बसलं आहे. सोशल मीडियाच्या भिंतीत गाडून घेतोय आपण सर्व स्वतःला, न दिसणारा पिंजराच पण इतकं गुरफटले जातोय कि आपण कुठेतरी चुकीच्या मार्गाने वाहवत जातोय ह्याचं भानही उरलेलं नाही. मागल्या काही दिवसात जे काही घडलं, घडतंय ते पाहता खरतर काळजीपोटी भीतीच वाटू लागली आहे. तळागाळाला गेलेलं राजकारण, दुषित होत चाललेलं समाजकारण आणि विकृत ध्येयानं वखवखलेला अन त्यासाठी कुठल्याही स्तराला जायला तयार असणारा, वैचारिक घाणीनं माखलेला एक विशिष्ट समाज. सोशल मीडियावर आपल्या वागण्याची, भाबड्या भावना, बिनबुडाच्या अस्मिता अश्या मूर्खपणाच्य...