Posts

Showing posts with the label आवडलेले लेख-कविता

माँ भारती

 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता.. वेदमंत्रों की ध्वनि में हूँ। उपनिषदों की वाणी में हूँ।। गीता का विश्वरूप मेरा तन है। पतंजलि का योग मेरा मन है।। भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ। षड् दर्शनों  के अमर श्रवण में हूँ।। पुराणों की मोहक कथाओं में हूँ। दुखी मानव की व्यथाओं में हूँ।। राम के धनुष का अमोघ वाण हूँ। कृष्ण का सुदर्शन चक्र महान हूँ।। लिच्छवी का गणतंत्र हूँ। राजा पौरुष यथा स्वतंत्र हूँ।। बुद्ध की करुणा हूँ। महावीर की धारणा हूँ।। नानक का संदेश हूँ। सूफ़ियों का देश हूँ।। गिरिजाघर की प्रार्थना हूँ। पारसियों की अग्नि याचना हूँ।। सर्वे भवन्तु सुखिनः का घोष हूँ। मानव सभ्यता का प्रदोष हूँ।। चरक का आयुर्वेद हूँ। कालिदास का रस संवेद हूँ।। भरत के नाट्य शास्त्र का संवाद हूँ। शंकर मंडन मिश्र का विवाद हूँ।। पाणिनि का व्याकरण हूँ। आर्यभट्ट का खगोल जागरण  हूँ।। शिवलिंग अनंत हूँ। माँ दुर्गा दिगंत हूँ।। शंकर के त्रिशूल का दुर्धर प्रहार हूँ। दुष्ट दानव राक्षसों का संहार हूँ।। उत्तर में हिम का अखंड विस्तार हूँ। दक्षिण में जलधि का संचार हूँ। अर्जुन का निष्काम कर्म हूँ...

न्यायाधीशांची अनोखी शिक्षा

Image
अमेरिकेत एक पंधरा वर्षाचा मुलगा होता, एका दुकानातून चोरी करताना पकडला गेला. त्याला पकडल्यावर त्याने रक्षकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुकानातील एक कपाटही तुटले. न्यायाधीशांनी गुन्हा ऐकला आणि मुलाला विचारले, "तू खरोखरच ब्रेड आणि चीजचे पॅकेट चोरले आहेस का?" मुलाने खाली पाहिले आणि उत्तर दिले - होय. न्यायाधीश :- का? मुलगा :- मला गरज होती. न्यायाधीश :- विकत घेतले असते. मुलगा :- पैसे नव्हते. न्यायाधीश :- घरच्यांकडून घ्यायला हवे होते. मुलगा :- घरात फक्त आई आहे. आजारी आणि बेरोजगार, तिच्यासाठीच ब्रेड आणि चीज चोरले होते. न्यायाधीश :- तू काही काम करत नाहीस? मुलगा :- कारवॉश मध्ये करायचो. मी माझ्या आईची काळजी घेण्यासाठी एक दिवस सुट्टी घेतली होती, म्हणून मला काढून टाकण्यात आले. न्यायाधीश :-  कोणाकडे मदत मागितली का? मुलगा :- सकाळपासून घर सोडले होते, जवळपास पन्नास लोकांकडे गेलो, शेवटी हे पाऊल उचलले. युक्तिवाद संपला, न्यायाधीश निर्णय सुनावू लागतात, चोरी आणि विशेषत: भाकरीची चोरी हा अत्यंत लज्जास्पद गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला आपण सगळेच जबाबदार आहोत. "कोर्टातील प्रत्येकजण... ...
हा लेख 2008 मध्ये मायबोली वरती प्रकाशित झालेला आहे !💐 लेखकाचे नाव :- चिनूक्स असे दर्शीवलेले आहे ..  ********************* १९९० सालची गोष्ट. मे महिन्यात, भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगळं लावलेलं लुगडं, रुपयाएवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी काहितरी काम होतं त्यांचं. या बाईंचं मोठ्या आवाजातलं बोलणं मला आत व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे ३-४ अनाथाश्रम होते, आणि तिथे राहणार्‍या मुलांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. बाबांचा कामानिमित्ताने अनेक धार्मिक संस्थानांशी संबंध होता, आणि या बाईंना तिथून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न बाबा करणार होते. मग जरा वेळाने बाबांनी मला बोलावलं. म्हणाले, 'या सिंधूताई. यांना घेऊन डॉ. XXXX यांच्या घरी जा.' बाहेर प्रचंड ऊन होतं. बाबांनी रिक्षेसाठी पैसे दिले आणि डोक्यावर रुमाल, खिशात कांदा असा जामानिमा करून मी निघालो. सिंधूताईंनी डोक्यावरून पदर घेतला फक्त. पायात चप्पल नव्हतीच. मे महिन्याच्या त्या भयंकर उन्हातही सिंधूताईंच्या पायांना चटके कसे बसत नाहीत, याचाच विचार मी बराच वेळ करत होतो. डॉक्टरकाकांचं घर तसं फार लांब न...

लेखकांच्या गोष्टी

Image
#लेखकांच्या_गोष्टी ''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.'' परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं....
Image
तसे रोजचेच तर असते जगणे  अंधारातही उजाडले अंगण बघणे  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा .. तेव्हा एक करावं  .. रोज थोडं थोडं चांदणं  मनातून काढून गोळा करावं  कुपीत घालून जपून ठेवावं ..  रात्र उलटेल .. दिवस पालटतील कधी सरकलीच पायाखालची उजेडाची जमीन .. आलाच अंधार दाटून, अन दडपला मनातला उजेड तर  कुपीतल्या चांदण्या द्याव्या उधळून,  पेराव्या, सिंचाव्या आणि उगवाव्या चांदण्या  उगवल्या की अलगद जागवाव्या चांदण्या .. मनात भरून घ्याव्या जागल्या चांदण्या  कारण  मनात चांदणं असतं फुललेलं तोवर  झाकोळला राहतो अंधार सारा ! - रश्मी पदवाड मदनकर
Image
 स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो तोवर   आरसा हवा हवा वाटत असला, तरी  प्रकाशाच्या सान्निध्यात आल्यावर   प्रतिबिंबित करणारा लखलख कवडसा  डोळ्यांना अडसर वाटू लागतो ..तसा  फिरवून घेतो आपण चेहेरा .. अगदी आहे तशीच दिसणारी माणसे  हवी हवी वाटतात..पण   इतरांच्या सान्निध्यात आल्यावर   प्रतिबिंबित काय करतात यावर ठरतात  त्यांचे हवे असणे नको असणे ..  रश्मी पदवाड मदनकर.
मध्यरात्रीच्या पलिकडे पहाट होण्याआधी अंधार उजेडाच्या चिंतेआड सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर नाश अविनाशाच्या मिती सोडून सुखा दुःखाच्या आशा खोडून जाणीव नेणीवेचे ठेवून भान गाडली असतीस माझी नाळ ... आई .. तर .. तर.. उदासीतमस्वी जरा आत्मघाती आयुष्याचा सुर्य उगवण्याआत पाचवीला पुजलेल्या करंट्या जिन्याची परिटघडी मोडून, वाढून ठेवलेल्या निग्रही प्रतारणा संभ्रमाच्या, अस्वस्थतेच्या फेसाळून येणा-या लाटा सटवाईच्या पदरी पुन्हा बांधून परतवून लावता आल्या असत्या मलाही रात्रीच्याच अंधारात सगळा अंधार उपसून ओतून देता आला असता ... आणि आणि मध्यरात्रीच्या पलिकडे पहाट होण्याआधी अंधार उजेडाच्या चिंतेआड सत्या असत्याच्या भ्रमाबाहेर नाश अविनाशाच्या मिती सोडून सुखा दुःखाच्या आशा खोडून जाणीव नेणीवेचे ठेवून भान नव्या जगण्याचा नवा उजेड पांघरून घेतला असता मी  ... आई .. ! पांघरून घेतला असता मी आई !! - रश्मी पदवाड मदनकर
मला वाटलं ... की तू मला आता माझी जात विचारशील. कुसवाआतली की कुसवाबाहेरची. वाडीतली की वाड्यातली. माणूस की बाईमाणूस. माझ्या नावाचं लेबलही तस निश्क्रीयचं. कुठल्याच चौकटीत न बसणारं. बसवताही न येणारं. मैला वहाणारी मी दैवपुजेत रमणारी. तुमच्या भातुकल्या दूरुनच बघणारी. तिन्ही सांजेला दिवा लावणारी. भुकेल्या कावळ्यांसाठी गिधडांना शमवणारी. डोई झाकल्या पदरात जट वाढवणारी, वीतभर कपड्यात पण रामायण वाचणारी. गळ्यातल्या धडुत्यात तान्हूल निजवणारी, पाळणाघराच्या पाय-यांवर नकळत थबकणारी. मी कालची, मी आजची. कधी गर्भात खुडलेली, कधी उमल्याआधी श्वापदांनी कुस्करलेली. मी रमा , मी आनंदी. मी जिजा, मी सावित्री . मी सिंधू , मी किरण, मी अहिल्या .मी अभया......             मी......मी......फक्त माणूस...                                  बाईमाणूस...... ...............डॉ भाग्यश्री यशवंत............
*उत्तर* वीज चमकते, जांभूळ प्रकाश पसरतो आणि मी डोळे मिटून घेतो.. ..मी डोळे मिटून घेतो आणि असला नसला पाऊस तरी घडत जातात अपेक्षितपणे अनपेक्षित गोष्टी मग रेंगेंचं 'सावित्री' पत्रांतील मचकूराला घडी न पाडता दुमडून ठेवतो कडेने, अगतिक पसरलेले पिकासोचे न्यूडही सरते नजरेआड आणि कुंडलिनीचे चवथे चक्र स्पर्षणारे किशोरीचे 'सहेला रे' देखील होते पॉज.. कॉफीचा मग बुद्धाच्या अनुयायासारखा शांत.. मी त्याच्या कानात अडकवलेले घट्ट बोटही सैल करतो. जाणीव होते क्षणभर अधांतरी टांगलेल्या शरीराची, तेव्हा खुर्चीवर उसासे रेलून सोडवून घेतो स्वतःला. डोळे असतात अजून मिटलेले; आणि मी भासत असतो अस्पर्शीत आणि निवांत.. अशातच अनोळखी दुरातून धडपडत येणारे आवाजी उत्तर सुचवून जाते; 'सावित्री'चे उलटे वाक्य 'न्यूड' मधला गर्भितार्थ आणि 'सहेला रे' चा मखमल ध्यास आता असतो बाहेर मी आणि जांभूळ प्रकाश आत.. खोल आत! -आदित्य दवणे
*मन अँप्यूट करता येईल का?* डॉक्टरांनी विचारलं , "काय होतंय?" हताश आवाजात मी उत्तरले, "श्वास कोंडतो.. डोळे वाहत रहातात... खूप भीती वाटते... हातपाय लुळे पडलेत असं वाटत रहातं.." "कधीपासून होतोय हा त्रास?" "सगळ्यात पहिल्यांदा, किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा त्रास जाणवला होता. तेव्हा काय करावं ?कुणाला सांगावं ?कळालं नाही. मग कधीतरी आपोआपच त्रास थांबला. आई म्हणायची खूप विचार नको करत जाऊ बाळा. नंतरही कोलंबिया कोसळलं तेव्हा कितीतरी वेळ देवासमोर रडत बसले होते. होस्टेलच्या रूममेट्स म्हणाल्या 'वेडी आहेस की काय तू? हे सगळं चालणारच. सोडून द्यायचं. त्यात काय?" नंतर वेळोवेळी कारणाकारणानं त्रास होत गेला. काही कारणं लोकांना पटली... काही नाही पटली.. मी रडत राहीले... रात्रीचे प्रहर टक्क डोळ्यांनी पिंजत राहिले.. फिल ह्यूज गेला.. माळीण घडलं... पाकीस्तानात कोवळी पोरं मारली गेली.. शुभम शहीद झाला... सगळेजण जाती,धर्म,सीमा ह्या गोष्टींच्या आड लपत *क्याल्क्युलेटेड* शोक करत राहिले. नवरा म्हणाला, " वेडाबाई कशाचाही त्...

मी आहे ना सांग?’

कुठेतरी  वाचलेली एक सुंदर कविता मी आहे ना सांग?’ मुग्धमानसी | ’आताच दमू नकोस फार जायचं आहे लांब’ म्हण एकदा तरी हात धरून मला ’थोडं थांब’ म्हण... माझं गुर्‍हाळ तक्रारिंचं कुरकुर करु लागलं की जवळ बसवून मला फक्त ’ऐकतो मी तू सांग’ म्हण... कधी चिडेन जगावरती कावून जाईन, त्रासून जाईन हसून माझी धग सोसून ’जगाच्या नानाची टांग’ म्हण... कधी माझ्या डोळ्यांमधून निसटून जाईल काहितरी तेही पकडून शिताफीनं ’याचा पत्ता सांग’ म्हण... मी हसताना उधाणलेले मी रडताना गहिवरलेले अश्रू माझे टिपून ठेव अन् ’जपून ठेवलंय वाण’ म्हण... मोठेपण सोसणार नाही पायांत त्राण उरणार नाही तेंव्हा कुशीत घेऊन मला ’बाळ माझी छान’ म्हण... फार काही मागत नाही माझी तहान भागत नाही हरलेच कधी मी तर हसून ’मी आहे ना सांग?’ म्हण...

महाश्वेतादेवी कि कविता

Beautiful lines by Mahadevi verma !           आ गए तुम? द्वार खुला है, अंदर आओ..! पर तनिक ठहरो.. ड्योढी पर पड़े पायदान पर, अपना अहं झाड़ आना..! मधुमालती लिपटी है मुंडेर से, अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना..! तुलसी के क्यारे में, मन की चटकन चढ़ा आना..! अपनी व्यस्ततायें, बाहर खूंटी पर ही टांग आना..! जूतों संग, हर नकारात्मकता उतार आना..! बाहर किलोलते बच्चों से, थोड़ी शरारत माँग लाना..! वो गुलाब के गमले में, मुस्कान लगी है.. तोड़ कर पहन आना..! लाओ, अपनी उलझनें मुझे थमा दो.. तुम्हारी थकान पर, मनुहारों का पँखा झुला दूँ..! देखो, शाम बिछाई है मैंने, सूरज क्षितिज पर बाँधा है, लाली छिड़की है नभ पर..! प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर, चाय चढ़ाई है, घूँट घूँट पीना..! सुनो, इतना मुश्किल भी नहीं हैं जीना..!!

कहो - अमृता प्रितम

वह कहता था, वह सुनती थी, जारी था एक खेल कहने-सुनने का। खेल में थी दो पर्चियाँ। एक में लिखा था *‘कहो’*, एक में लिखा था *‘सुनो’*। अब यह नियति थी या महज़ संयोग? उसके हाथ लगती रही वही पर्ची जिस पर लिखा था *‘सुनो’*। वह सुनती रही। उसने सुने आदेश। उसने सुने उपदेश। बन्दिशें उसके लिए थीं। उसके लिए थीं वर्जनाएँ। वह जानती थी, 'कहना-सुनना' नहीं हैं केवल क्रियाएं। राजा ने कहा, 'ज़हर पियो' *वह मीरा हो गई।* ऋषि ने कहा, 'पत्थर बनो' *वह अहिल्या हो गई।* प्रभु ने कहा, 'निकल जाओ' *वह सीता हो गई।* चिता से निकली चीख, किन्हीं कानों ने नहीं सुनी। *वह सती हो गई।* घुटती रही उसकी फरियाद, अटके रहे शब्द, सिले रहे होंठ, रुन्धा रहा गला। उसके हाथ *कभी नहीं लगी वह पर्ची,* जिस पर लिखा था, *‘कहो'*। -Amrita Pritam

जन्मदिन कि बधाई अमृताजी...

Image
अमृता प्रीतम उत्कृष्ट लेखिका पण त्याहून अधिक एक हळव्या मनाची स्त्री स्वप्न बघणारी आणि ते तसेच जगून दाखवणारी. स्त्री म्हणून तिच्यात असणाऱ्या प्रेम, ममता, जिव्हाळा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराची नुसतीच मैत्रीण म्हणून किंवा तिच्या मनात वसलेल्या पण कधीही तिचा न झालेल्या प्रियकराची प्रेयसी म्हणून या सगळ्या उत्कट भावनांतून अनुभवलेल्या जीवन घटना आणि त्यातून निर्माण झालेली हि संवेदनशील कवियित्री. तिचे सारेच रूप मला फार आकर्षित करतात अन प्रभावितही. आज तिच्या जन्मदिनी तिला आदरांजली म्हणून तिच्या मला अतिशय आवडणाऱ्या या दोन कविता. मैं तुझे फिर मिलूँगी कहाँ कैसे पता नहीं शायद तेरे कल्पनाओं की प्रेरणा बन तेरे केनवास पर उतरुँगी या तेरे केनवास पर एक रहस्यमयी लकीर बन ख़ामोश तुझे देखती रहूँगी मैं तुझे फिर मिलूँगी कहाँ कैसे पता नहीं या सूरज की लौ बन कर तेरे रंगो में घुलती रहूँगी या रंगो की बाँहों में बैठ कर तेरे केनवास पर बिछ जाऊँगी पता नहीं कहाँ किस तरह पर तुझे ज़रुर मिलूँगी या फिर एक चश्मा बनी जैसे झरने...