Posts

Showing posts from May, 2025

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

Image
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत. गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जिथं प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथंच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामा...

हायब्रिस्टोफिलिया समुदाय: गुन्हेगारांप्रती आकर्षण आणि नैतिक गुंतागुंत -

Image
याकुब मेनन 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असूनही, काही व्यक्तींनी आणि संघटनांनी त्याच्या शिक्षेविरोधात सहानुभूतीने युक्तिवाद केला. त्याच्या शिक्षेपूर्वी अनेक नागरिकांनी त्याला बुद्धिमान, प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरवले. त्याच्याबद्दलची सहवेदना, सहानुभूती, आणि गुन्ह्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न या गोष्टी स्टॉकहोम सिंड्रोम आणि हायब्रिस्टोफिलिया या दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या सामाजिक छटा दाखवतात. चार्ल्स शोभराज, ज्याला "द सर्पेंट" आणि "बिकिनी किलर" म्हणून ओळखले जाते, हा एक कुख्यात फ्रेंच-भारतीय व्हिएतनामी सिरियल किलर आहे. त्याने 1970 च्या दशकात आशियातील विविध देशांमध्ये अनेक पर्यटकांची हत्या केली, शोभराजच्या गुन्हेगारी कारकीर्दीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केल्यास, तो एक सायकोपॅथिक व्यक्तिमत्व होता, ज्याला इतरांच्या वेदनेत आनंद मिळत असे. त्याची आकर्षकता आणि चातुर्यामुळे तो लोकांना फसवण्यात यशस्वी होत असे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याला 'द सर्पेंट' हे टोपणनाव मिळाले, कारण तो आपल्या शिकारांभोवती जाळे विणत असे. चार्ल्स शोभराज हे हायब्रिस्टोफिल...

Operation Sindoor!

Image
तुम्हाला माहिती आहे का ? २०१७ पर्यंत भारतात महिलांना थेट युद्धावर जाण्याचा अधिकार नव्हता. युद्धसंबंधी निर्णय घेण्याची संधीही त्यांना दिली जात नव्हती. या विषमतेविरुद्ध त्यांचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू होता. तेव्हा महिलांना लष्करात केवळ सहाय्यक भूमिका, जसे की सैनिकांच्या शस्त्रास्त्रांची तयारी, वैद्यकीय सेवा या क्षेत्रांपुरतीच मर्यादित संधी दिली जात असे. लष्करासारख्या पारंपरिकपणे पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिलांना दीर्घकाळ पूर्णतः वगळण्यात आले होते. मात्र, आता त्या युद्धाच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत, हे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक पाऊल आहे. २०१७ मध्ये भावना कांत ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला ऑपरेशनल फायटर पायलट ठरली. ती युद्धाच्या मोहिमांवर लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक बनली. त्याच वर्षी सब लेफ्टनंट शिवांगी हिने भारतीय नौदलात सर्विलन्स विमान उडवणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला. २०२० पर्यंत महिलांना लष्करात कायमस्वरूपी नियुक्ती (Permanent Commission) देण्यात येत नव्हती. मात्र २०२० मध्ये भारतीय लष्कर आणि त्यानंतर नौदलामध...