ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ?
ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो आणि त्याचे एखादे समर्पक उदाहरण द्यायला कोणी सांगतं तेव्हा तेव्हा ब्रिटनच्या जॉन ली ह्यांची कथा स्मृतीपटलावर येते. 15 नोव्हेंबर 1884 रोजी इंग्लंडमध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जॉन ली ला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यावर जॉन ली कोर्टात ओरडून सांगत राहिला की मी निर्दोष आहे, जर खरंच देव अस्तित्वात असेल तर तो मला नक्कीच मदत करेल. 23 फेब्रुवारी 1885 हा दिवस होता जेव्हा जॉनला फाशी दिली जाणार होती. फाशी देण्यापूर्वी फाशीची दोरी आणि फळी यांची स्थिती आणि ताकद तपासण्यात आली होती, जेणेकरून फाशी देताना कोणताही अडथळा येणार नाही. आता जॉन लीला फाशीसाठी त्या जागेवर आणण्यात आले. जल्लादने जॉन लीचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला आणि त्याच्या गळ्यात फास घातला. ऑर्डर मिळताच जल्लादने हँडल दाबले पण फळी उघडली नाही. हँडल वारंवार दाबले, पण फळी उघडू शकली नाही. फाशी एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली. यानंतर तपास सुरू झाला, आणि चाचणी म्हणून, जॉन ली सारख्याच वजनाच्या पुतळ्याला आणून फाशी देण्यात आली आ...