Posts

Showing posts from 2021

काळ्या मातीतल्या स्त्रिया !

Image
'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life - Follow your Passion' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) आठवतो का ? एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात हे नुकतच पार पडलेल्या पद्म पुरस्कार प्राप्त सन्मानार्थींची यादी पहिली की लक्षात येते... त्यातही ती स्त्री असेल तर ? ही एक विशेषच बाब ठरते. आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात तसे काहीसे विना रोकटोक करायला मिळणे ह्याला नशीब लागतं.. अनेकदा तर जे करायला आवडतं ते करायला काही माणसं आयुष्याच्या अनेक अग्निपरीक्षा देतात, अनेक दिव्यातून प्रवास करतात, कष्ट उपसतात, अवहेलना सहन करतात, तरी अखंड मार्गक्रमण करीत राहतात आणि म्हणून त्या त्या गोष्टीत कौशल्य प्राप्त करतात. एक दिवस उगवतो कोणीतरी ह्याची दखल घेतो आणि त्यांच्या...
 हल्ली मी लिहित नाही तुझ्यावर काही  उल्लेख तुझा ... हवाय कशाला ??  पूर्वी असायचा कवितेतल्या प्रत्येक ओळीत  शब्दाशब्दा मागे छुप्या भावनेच्या खोलात अलगद हसून केलेला तुझा उल्लेख…  पण तेव्हा त्या ओळीत असूनही कुठे असायचास तू ?   अन आज कुठेच नसतोस … तरीही असतोच ना ?    उर्दू गझलेच्या काही शब्दांचे अर्थ संदर्भकोशातून शोधावे,   नाहीच मिळाले तर जुळवून घ्यावा अर्थ लागतो तसा ..  तसेच काहीसे …  तसेच काहीसे …  तुझ्या असण्याचे अन नसण्याचे संदर्भ  शोधूनही लागत नाही हल्ली…  संवेदना जाणवत राहतात …. फक्त  अन त्या संवेदनांचा न लागलेला अर्थ  शोधत राहते मग मी … प्रत्येक ओळीत  आणि म्हणूनच …  जाणून असणाऱ्या या संवेदनांचा  उल्लेख करायचे सोडून दिलेय मी  कळतंय का ?  हल्ली लिहित नाही मी तुझ्यावर काही … रश्मी पदवाड मदनकर

विस्मृतीचा शाप ...

Image
 विस्मृतीचा शाप ...  अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे  आणि एक एक पाऊल पुढे चालताना  घूप्प अंधार गवसत रहावा ...  आकाश, जमीन, प्रकाश  आणि सजीवांचे भास-आभास  सगळंच दूर-दूर पुसट होत,  ठिपका होत नाहीसे होईपर्यंत येऊन पोचावे ..  नाव, गाव ओळख मिटू लागावी,  भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये  माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या,   घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या कथा,  कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा.. आणि या सर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या निष्ठुर प्रथा ..बाष्प होऊन उडून जाव्यात  ..  रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी वैचारिक, बौद्धिक- मानसिक आंदोलनं गहिवरलेली स्पंदनं ... विरावीत  इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी.   अनोळखी होत जावे सारे, आपण चालत रहावे... अंधाराच्या पटलावर पुढे चमकताना दिसेल काहीतरी धाव घेऊ नये मृगजळ असेल ते .. काळाकभिन्न परिसर, फसव्या दिशा  अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती  अनासक्त प्रवास ... आणि  अनवट भिवतीच्य...

२ विरोधाभासी अनुभव -

Image
आमच्या ऑफिसजवळ म्हणजे दीक्षाभूमीच्या समोरच्या रस्त्याचे काम गेले अनेक महिने चालू आहे. ऑफिसच्या अगदी शेजारी फुटपाथवर याच रस्त्यासाठी लागणाऱ्या मटेरिअलची थप्पी ठेवलेली असायची. त्याचाच वापर करून छोटीशी अगदी एकमाणूस नीट उभेही राहू शकणार नाही इतक्या उंचीलांबीरूंदीची झोपडी बांधून एक महिला तिथे राहत असल्याचे लक्षात आले.. पुढे आणखी काही दिवसात दीक्षाभूमीच्या पुढल्या भागाला थोडं समोर गेल्यावर तशीच रस्त्याला लागणाऱ्या ब्लॉकचा उपयोग करून दुसरी झोपडी बनलेली दिसली. आधी असा समज झाला की यात राहणारे ती बाई आणि हा इसम रस्त्यासाठी काम करणारे कामगार असतील.. कामगार असले तरी इतक्याश्या जागेत हे राहत कसे असतील ही जिज्ञासा होतीच म्हणून रोज दुपारच्या जेवणानंतर आम्ही २-३ सहकारी मैत्रिणींनी तिथून फेरी मारायचा शिरस्ता सुरु केला. शिवाय रोजचाच जाण्यायेण्याचा रस्ता असल्याने नकळत आत डोकावले जाऊ लागले. त्यात असे लक्षात आले की बाई जरा विक्षिप्त आहेत. तिला काहीतरी मानसिक समस्या असावी ती सतत कुणालातरी शिव्या घालत असते.. कुठेतरी पाहत कुणाकुणाची उणीदुणी काढत असते, अगदी सरकारला, प्रशासनाला, कामगारांनाही शिव्या घालते. आंबेड...

म्हणी

सत्यभामा सौंदरमल यांचा संग्रही ठेवावा असा लेख -   #सिंदळकी_करणार्या_महिलांना_म्हणीतुन_नावं_कशी_ठेवली_जातात #बाईने_सिंदळकी_केल्यावर_लोक_काय_म्हणतात महिलांना नावं ठेवताना ज्या (अर्थात लोक काय म्हणतील) म्हणी वापरल्या जातात त्या कदाचित साहित्यिक भाषेत आढळणं तसं दुर्मिळ.या म्हणी मी माझ्या वस्तीत घरात ऐकत लहानाची मोठी झाले.माझ्या आजीच्या तोंडुन आमच्या शेजारी रहाणार्या बाया यांच्या तोंडुन या म्हणी सतत कानावर पडत असत यालाच #ठिवणीतल्या किंवा दलित साहित्यातील शिव्या असं ही म्हणता येईल.कोणत्या स्त्रियांवर कोणत्या म्हणी लागु होतात याबाबतची ही कंसात माहीती देण्याचा हा प्रयत्न.एखादी महीला दुसर्या पुरुषाच्या(नवरा असताना) प्रेमात पार वेडी झालेली असेल तर आणि ती या प्रेमासाठी काही ही करायला तयार असते तेव्हा तिला काय म्हणतात, #फिरली_नार_कोषा_मार_फिरली_नार_भ्रतार_मार म्हणजेच नवरा किंवा भाऊ यांचा खून करणे (प्रियकराच्या मदतीने) ती तिच्या प्रेमाच्या आड जे येतात त्यांना ती आपले दुश्मन समजत असते आणि यात अशा महिलांना विरोध करणारे पुरूष म्हणजे एक तर भाऊ असतो किंवा नवरा असतो यालाच नाकात वारं भरलेली बाई असं ...
Image
  या आहेत त्या चारमधल्या दोघी - स्थळ - शताब्दी चौक, रिंग रोड विषय - #SaveChildBeggars वेळ - ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि हा जो फोटो टाकलाय त्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं एकतर झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या आणखी दोघी मुली आहेत. त्या स्वतःच चिमुकल्या असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्र्न विचारण्याआत भरभर भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग दोन-तीन दिवस गुडूप होतात. प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोकच्या भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ?? एका चौकात इतकी तर शहरात किती .. आणि राज्यात.. देशात ? ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं.. कु...

होऊन जाऊ दे ..

Image
परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली, पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं वाटलं आणि त्यातही स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच तिच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेली पुरणपोळी सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं. मन पुन्हा विचारांच्या हिंदोळ्यावर दोलायमान झाले.. आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्याचं निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे...