Posts

Showing posts from February, 2019

आतल्या मास्तरीण बाई - पत्र 4

जरा नरव्हस व्हायला झालं ना की आतल्या बाईंचे हे शब्द आठवतात आणि पुन्हा जगण्याची उभारी येते... #आतल्यामास्तरीणबाई पत्र -4 आयुष्याचं सोनं कर सोनं खूप तापलं ना की अधिकच चकाकतं म्हणतात. आयुष्याचही तसंच काहीसं असतं आयुष्यात कधीतरी खूप चटके खावे लागतात होरपळून निघतोय आपण असे वाटत असतांनाच आपण तावून सुलाखून बाहेर पडलेले असतो.…. एकदा दोनदा आणि अनेकदा प्रत्येकवेळी नवे चटके आणि त्याबरोबर आलेली नवी झळाळी. इतकं सगळं पाहून, भोगून, सोसून झाल्यावर एक काळ येतो आयुष्यात जेव्हा आपसूकच स्वतःवरचा अंतर्गत विश्वास इतका प्रगाढ झालेला असतो की पुढे भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही दुःखाच, संकटाच अप्रूप वाटेनासं होतं. कुठलीही भीती आता भीती म्हणून उरतच नाही. दुःखाला दुःखाची किनारच नसते आणि संकट नावालाही हादरवत बिदरवत नाही. आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना निव्वळ संधी वाटू लागते स्वतःला लिफ्ट करायला. तांदळातून खडा काढून सरकवावा किंवा दुधातून माशी काढून फेकावी इतक्या शुल्लक वाटू लागतात आयुष्यातल्या अडचणी. मग रोजचे चाललेले आयुष्य त्यात रोजच्या व्यापासोबत, संसाराच्या रहाटगाड्या सोबत स्वतःला खुश ठेवण्याचं स्किल आपस...

आतल्या मास्तरीण बाई - 6

पत्र #आतल्यामास्तरीणबाई कधीकधी बोलतांना किती सहज आपण बोलून जातो ना आवाज कसला गोड़य तिचा पण उंच स्वर नाही लागत जरा कनसुरी आहे किंवा चित्र छान काढलय पण रंगसंगती चुकलीच बघ. कथा अत्यंत सुरेख आहे पण काही ठिकाणी शुद्धलेखन गंडलंय. हे साहजिक आहे पण असा विषय असला ना कि आतल्या मास्तरीण बाई आठवतात. त्या एकदा म्हणाल्या होत्या ... प्रिय सखे , कलेचा आस्वाद घ्यायचा असेल ना तर त्या कलेची आवड असायला हवी त्याबद्दलची जाण असायला हवी पण त्याचे ज्ञान मात्र असायला नको बघ. फार ज्ञान असले की कलेतील उणीवा, खाणा-खुणा आणि चुका आधी नजरेला, कानाला अन स्पर्शाला जाणवतात. आस्वाद घ्यायचे दूरच राहते. बघण्या, ऐकण्या अन वाचण्याच्या बाबतीत एक हमखास होतं अगं अधिक चांगल्या गोष्टी बघत वाचत ऐकत गेलो की आपल्या अपेक्षा आपल्या आवडी-निवडीपेक्षाही जास्त वाढतात. दर्जेच्या उद्देशाने नसलेल्या अगदी शुद्ध मनोरंजनात्मक गोष्टी सुद्धा आपण ज्ञान आणि दर्जा अश्या कसोटी वर घासून बघतो. मग आपले ज्ञान आपलीच आवड आपल्यालाच मुक्त गोष्टींचा मुक्तपणे आस्वाद घेऊ देत नाही. पुन्हा पुन्हा असे घडत राहिले की मिळेल तिथून आनंद मिळवण्याच्या स्वभावात कमीपणा येत...
*मन अँप्यूट करता येईल का?* डॉक्टरांनी विचारलं , "काय होतंय?" हताश आवाजात मी उत्तरले, "श्वास कोंडतो.. डोळे वाहत रहातात... खूप भीती वाटते... हातपाय लुळे पडलेत असं वाटत रहातं.." "कधीपासून होतोय हा त्रास?" "सगळ्यात पहिल्यांदा, किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा त्रास जाणवला होता. तेव्हा काय करावं ?कुणाला सांगावं ?कळालं नाही. मग कधीतरी आपोआपच त्रास थांबला. आई म्हणायची खूप विचार नको करत जाऊ बाळा. नंतरही कोलंबिया कोसळलं तेव्हा कितीतरी वेळ देवासमोर रडत बसले होते. होस्टेलच्या रूममेट्स म्हणाल्या 'वेडी आहेस की काय तू? हे सगळं चालणारच. सोडून द्यायचं. त्यात काय?" नंतर वेळोवेळी कारणाकारणानं त्रास होत गेला. काही कारणं लोकांना पटली... काही नाही पटली.. मी रडत राहीले... रात्रीचे प्रहर टक्क डोळ्यांनी पिंजत राहिले.. फिल ह्यूज गेला.. माळीण घडलं... पाकीस्तानात कोवळी पोरं मारली गेली.. शुभम शहीद झाला... सगळेजण जाती,धर्म,सीमा ह्या गोष्टींच्या आड लपत *क्याल्क्युलेटेड* शोक करत राहिले. नवरा म्हणाला, " वेडाबाई कशाचाही त्...

विदेशात महिला राजसत्तेची भरारी ..

Image
गे ल्या महिन्यात तुलसी गॅबार्ड या भारतीय हिंदू अमेरिकन महिला काँग्रेसवर (अमेरिकेतील लोकसभा) निवडून आल्याची बातमी वाचली होती आणि एक स्त्री म्हणून त्यात भारतीय म्हणूनही उर अभिमानानं भरून आला होता. गेल्या आठवड्यात भारतीय त्यातही विशेषतः महाराष्ट्रातल्या असणाऱ्या नीला विखे पाटील यांना स्वीडनच्या पंतप्रधानपदी निवड झालेले सोशल डेमोक्रेटिक पार्टी-ग्रीन पार्टी या आघाडीचे नेते व पंतप्रधान स्टीफन लोफवेन ह्यांनी आपल्या राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची बातमी वाचनात आली. नीला यांच्याकडे अर्थ विभागातील सल्लागार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून करप्रणाली, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घरबांधणी क्षेत्राबाबत त्या पंतप्रधानांना सल्ला देतील. या बातमीनं केवळ आनंद झाला नाही तर भारतीय महिला त्यांच्या नेतृत्वाचे ठसे आता स्थानिक पातळीवर किंवा विधिमंडळ, संसेदेचं सभागृह एवढ्यापुरतं मर्यादित न राहता अंतर्राष्ट्रीय स्तरावर उमटवू लागल्या असल्याची जाणीव अधिक प्रखर होत गेली. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे त्यांच्या राजकीय हक्कांची लढाई त्यासाठीचा संघर्ष सोपा कध...

कुमारीमाता' एक गंभीर समस्या ..

Image
महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाच्या सीमेवर वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, झरीजामणी, मारेगाव, वनीसारखे तालुके आणि त्याच्या भोवताल वसलेली आदिवासी लोकांची वस्ती असलेली छोटी मोठी जवळ जवळ १२७ गावे. आदिवासी लोकांचा चरितार्थ येथे शेतीच्या भरवशावर चालतो. मिरची हे मुख्य पिक असलेला हा परिसर. हि गावे संपूर्ण भारतासाठी मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या आदिवासी भागात जवळ जवळ ९९ टक्के अशिक्षिततेचा रेशो आहे. हि लोकं गावातून बाहेर पडत नाहीत म्हणून चौकटी बाहेरील ज्ञानाने येणारं शहाणपण, हुशारी यांच्या गावीही नाही. अजूनही हि लोकं आपल्यापेक्षा कितीतरी शतकं मागे जगत आहेत असं जाणवत राहतं. इथे भारतभरातून व्यापारी येतात विशेषतः आंध्रमधून. … व्यापारासाठी आलेली लोकं भाव समजून घ्यायला, माल भरायला, पाठवायला आणि बाजारपेठेचे स्वरूप जाणायला म्हणून पंधरा दिवस, महिना महिना येथे मुक्काम करतात. अश्यात त्यांना या आदिवासी लोकांच्या पोड्यावरच (येथील आदिवासी लोकांच्या वस्तीला पोडे असे म्हणतात) राहावे लागते कारण अजूनही मागासलेल्या या भागात हॉटेल वगैरे मिळणे शक्य नाही. हे सुरुवातीच्या काळात आणि आता त्यांना तशी गर...
कोणी साताचे सत्तर करतो कोणी घामाचे अत्तर करतो ! तावुन सुलाखून आयुष्याला नशिब कोणी बलवत्तर करतो ! चुकली असेल अनेकदा ती, पण प्रेम तिच्यावरी निरंतर करतो ! हरतो,पडतो अन पडून उठतो जगणे माझे बेहत्तर करतो ! शंभर मैलाचा दगड गाठण्या प्रवास माझा मी खडतर करतो ! व्यथा मनाच्या झरू लागल्या की मी या दिलाचाच पत्थर करतो ! - रश्मी मदनकर #गझल