Posts

Showing posts from July, 2016

वोह ना आयेंगे पलटकर ... अलविदा मुबारक

Image
 काही माणसांच्या आयुष्याची नीट पडलेली घडी विस्कटते अन पुढे सगळी प्रमेयच चुकत जातात. गुणांची मूर्तिमंत प्रतीके असणारी हि माणसे ट्रॅजेडी मध्ये अशीकाही गुरफटली जातात की  गुणांहून अधिक त्यांच्या दुःखाचं पारडं कधी भारी होऊन पडतं कळतही नाही. 'कभी तनहाईयों में यु हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे, और बिजली कोध जायेगी '' हे गीत गायिले तेव्हा या गायिकेला अंदाजही नसावा कधीतरी या दोन ओळींचे बोल तद्वतच आयुष्यात खरे उतरणार आहेत. आयुष्याच्या उतारवयात त्या अश्याच गुमनामींच्या 'अंधारा'त झाकोळल्या गेल्या अन आयुष्याच्या अंतापर्यंत कितीतरी दुःखाच्या 'बिजली' झेलत राहिल्या. त्यांच्या गाण्यांनी त्याकाळात मंत्रमुग्ध होणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना मात्र ह्याचा थांगपत्ताही लागला नाही. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि आपल्या आवडत्या गायिकेचे झालेले हाल ऐकून सारेच संगीत प्रेमी हळहळले. मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानच्या सुजनगढ झुंझुनू इथला. लहानपणापासूनच चित्रपटांचं वेड होतं त्यांना. त्यातल्या त्यात सुरैय्यावर विशेष प्रेम होतं. सुरैय्याला बघणे, दिवसरात...

संवेदनेच्या सहाणेवर ... (स्वाथी मर्डर केस - चेन्नई )

Image
सकाळी ६ . ३० ची वेळ , चेन्नईचे नूनगंबक्कम रेल्वे स्थानक ... खूप गर्दी झालेली नव्हती अजून पण सामसूमही कुठे होते , निदान शंभरेक माणसे होतीच लोकलची वाट बघत . पुढल्या काहीच मिनिटात एक घटना घडते एका तरुणीवर कुणीतरी चाकूने हल्ला करतो . सर्वांच्या डोळ्यादेखत चाकूने गोंदत जातो . एक निष्पाप जीव सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्थानकावर रक्ताच्या थारोळ्यात पडली असते , बेसुध . ' मला वाचवा ' अशी आरोळीही तिला ठोकता आली नसते . मारेकरी पळून जातो आणि काय आश्चर्य सारीच पांगापांग होते . उपस्थित लोकं थंड डोक्याने आपापली गाडी पकडून गंतव्याला निघून जातात . पुढे अडीच तास ती तिथेच मदतीविना तात्कळत जीव सोडते . ' ती ' आई - वडिलांच्या जगण्याचा प्राण , गुरुजनांच्या अपेक्षा , कष्टानं उच्चशिक्षण घेतलेली , कुणाचा तरी आधार ठरणारी , कुणाचे तरी भविष्य साकारणारी , डोळ्यात अखंड स्वप्न घेऊन महत्त्वाकांक्षेने वावरणारी . पडलीय जमिनीवर , संपतेय ... तडफडत जीव सोडतेय . आपण मात्र chill आहोत . हे सगळं डोळ्याने पाहूनही आपल्याला cool होऊन पुन्हा वेळ मारून नेता येते आहे . कौतुक करावं का ?? की कु ~~ ल म्हणता म्हणता आ...