Posts

Showing posts from 2023

टाइम बँक

Image
  एक सुंदर संकल्पना वाचनात आली, अतिशय आवडली आणि पटली देखील.  असं म्हणतात आपला देश हा सध्या सगळ्यात तरुण असणारा देश आहे. दुसरे आजही कुटुंबव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याने टोकाची वाईट परिस्थिती आपल्या देशात उद्भवली नाहीये आणि निकटच्या काळात उद्भवणाराही नाही, तरीही मी वाचलेली ही व्यवस्था एक चांगली संकल्पना आहे. इतर देशांची  स्थिती याबाबत जरा वाईट आहे. बहुतांश देशात कुटुंबसंस्थाच ढासळलेली असल्याने अमाप पैसे असूनही तिथे एकाकी राहणाऱ्या माणसांची त्यात वृद्धावस्थेत किंवा आजारी असल्यावर त्यांची सुश्रुषा करणारी माणसे त्यांना मिळणं दुरापास्त झाले आहे. त्यामुळे तिथे सुरु झालेली ही व्यवस्था अनेक दृष्टीने आपल्या देशातही करता येण्यासारखी आहे. आपण काय चांगले ते घेत जावे... तर,  स्विझर्लंडमध्ये तिथल्या सरकारच्या माध्यमातून 'टाइम बँक' ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. त्यात तुम्हाला तुमचे ''वेळ खाते'' (Time Account) सुरु करावे लागते. या खात्यात तुमच्या वेळेचा लेखाजोखा जमा राहतो.  स्विझर्लंडमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने या संकल्पनेबाबत तिचा अनुभव सांगितला...   स्वि...

माँ भारती

 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता.. वेदमंत्रों की ध्वनि में हूँ। उपनिषदों की वाणी में हूँ।। गीता का विश्वरूप मेरा तन है। पतंजलि का योग मेरा मन है।। भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ। षड् दर्शनों  के अमर श्रवण में हूँ।। पुराणों की मोहक कथाओं में हूँ। दुखी मानव की व्यथाओं में हूँ।। राम के धनुष का अमोघ वाण हूँ। कृष्ण का सुदर्शन चक्र महान हूँ।। लिच्छवी का गणतंत्र हूँ। राजा पौरुष यथा स्वतंत्र हूँ।। बुद्ध की करुणा हूँ। महावीर की धारणा हूँ।। नानक का संदेश हूँ। सूफ़ियों का देश हूँ।। गिरिजाघर की प्रार्थना हूँ। पारसियों की अग्नि याचना हूँ।। सर्वे भवन्तु सुखिनः का घोष हूँ। मानव सभ्यता का प्रदोष हूँ।। चरक का आयुर्वेद हूँ। कालिदास का रस संवेद हूँ।। भरत के नाट्य शास्त्र का संवाद हूँ। शंकर मंडन मिश्र का विवाद हूँ।। पाणिनि का व्याकरण हूँ। आर्यभट्ट का खगोल जागरण  हूँ।। शिवलिंग अनंत हूँ। माँ दुर्गा दिगंत हूँ।। शंकर के त्रिशूल का दुर्धर प्रहार हूँ। दुष्ट दानव राक्षसों का संहार हूँ।। उत्तर में हिम का अखंड विस्तार हूँ। दक्षिण में जलधि का संचार हूँ। अर्जुन का निष्काम कर्म हूँ...

सक्तीची ''पाळी''

Image
आमच्या लहानपणी आईच्या काळात, म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांआधी मासिक पाळी आलेल्या महिलेला तू मंदिरात यायचे नाही किंवा कोणत्याच शुभकार्यात उपस्थित राहायचे नाही असे सांगितले जायचे, अश्या कार्यातून ''सक्तीची रजा'' तिला मिळालेली असायची. तोवर तिचा घरात वावर, किंवा घरकामात सूट वगैरे कुटुंबीयांनी मान्य केलेली होती. त्याही पूर्वी म्हणजे आजीच्या वगैरे काळात तर तिला कुठेच जाण्याची परवानगी नव्हती. अगदी परसात, पडवीत, अंगणात, तिनेच सावरलेल्या तिच्या हक्काच्या स्वयंपाक घरात देखील नाही. तिच्या हाताने केलेला स्वयंपाक देखील ग्रहण करायचे नाकारले जायचे. तिला एखाद्या कोपऱ्यात गुपचूप बसून राहावे लागायचे. ही ''सक्तीची विश्रांती'' होती. महाराष्ट्राच्या मराठवाड्यात उसतोडणीला जाणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काम करू दिले जात नाही म्हणून तेथील कामगार महिलांनी गर्भाशयच काढून टाकण्याचा 'सक्तीचा' मार्ग निवडला आता त्याला अनेक वर्ष होतायेत. अशा महिलांचा वाढता आकडा आता चिंताजनक झाला आहे, त्याचे प्रतिकूल परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले.. पण अजूनही त्यावर ठोस तोडगा काही...

इन्स्युलिनच्या जन्माची कथा -

Image
१९२२ च्या पूर्वी मधुमेहाने मरणाऱ्यांची संख्या टोकाला गेली होती. लहान मुलांना देखील मधुमेहाने ग्रासले होते. पहिल्यांदा इन्सुलिनचा शोध लागला तेव्हा अश्याच मरणासन्न मुलांवर हा प्रयोग करायचे ठरले. 1922 मध्ये, शास्त्रज्ञांचा एक गट टोरंटो जनरल हॉस्पिटलमध्ये गेला जिथे मधुमेही मुलांना एका वेळी 50 किंवा त्याहून अधिक वॉर्डांमध्ये ठेवले जात होते. त्यापैकी बहुतेक कोमॅटोज (बेशुद्धावस्थेत) होते आणि डायबेटिक केटोआसिडोसिसमुळे मरणाच्या सीमारेषेवर पोचले होते. मधुमेहामुळे शरीरातील इतर अवयवांचे निकामी होणे सुरु झाले की मृत्यूच ह्यांना सोडवेल अशी धारणा असे, त्यामुळे मृत्यूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मधुमेहाच्या पहिल्या स्तराच्या रुग्णावर प्रयोग करण्यापेक्षा मरणासन्न मुलांवर उपचार करणे योग्य होते, कारण तशीही त्यांच्या परतण्याची आशा कमी होती त्यामुळे प्रयोग फसला तरी त्याने जास्त नुकसान होणार नव्हते. पण प्रयोग यशस्वी झाला तर ह्या लहान मुलांचे आयुष्य सत्कर्मी लागणार होते. त्यांनाही जीवनदान मिळणार होते. शास्त्रज्ञांनी झपाट्याने हालचाली सुरु केल्या आणि इन्सुलिनच्या नवीन शुद्ध अर्कासह मुलांना इंजेक्शन देण...

मनाचा थांग लागेना

 मनाची ढवळली खोली मनाचा थांग लागेना   मना समजावले थोडे मनाला भाव पोचेना  उन्हाला आर्जवा कोणी उन्हा रे हो जरा सौम्य   फुलांना बाधते ऊन्ह, फुलाला आग सोसेना  प्रिया मी बावरा होतो तुझे का नाव आल्यावर  प्रियाशी जोडले नाते प्रियाची साथ सोडेना  नभावर रंगली नक्षी रवीचा कुंचला होता   अचानक ढग भरू आले नभाला मेघ शोभेना सख्याने भार्गवी गावी सख्याला सूर गवसावा  सुरांना ताल जोडावा, लयी बेताल चालेना

संस्कृती संरक्षणाची अफगाणी धडपड

Image
गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर अचानक अफगाण महिलांचे अतिशय सुंदर सुंदर पोशाखात फोटो झळकू लागले. काही जुन्या काळचे गटागटाने काढलेले फोटो, काही सणावरांचे तर काही आत्ता वर्तमानातील महिलांचे. हे सगळे फोटो त्यांच्या आजवरच्या संस्कृतीची ओळख सांगणारे, पारंपरिक पोशाख परिधान केलेले आहेत. हे रंगीबेरंगी हसरे फोटो पाहून आनंद व्यक्त करावा वाटला पण या हसऱ्या फोटोंमागे कुठलीशी वेदना डोकावते आहे हे त्यावरील आठवडाभर trending होत गेलेल्या हॅशटॅगवरून लक्षात आले. हा hashtag होता #DontTouchMyCloths.  अशा विचित्र अर्थाचा hashtag का? त्याच्या कारणांचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा.. माझ्याचसारख्या, माझ्याच युगात ह्याचं धर्तीवर एकाच काळात जन्म घेऊनही वेगवेगळ्या प्रांताचा आणि संस्कृतीचा भाग असल्याने आम्हाला जगाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या विरोधाभासी आयुष्याचे अप्रूप वाटत गेले..आणि तेथील 'ति'च्यासाठी अनुकंपा दाटून आली.  तीन वर्षांपूर्वी पुन्हा सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर - शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत, तर त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या दैनंदिन हालचाली...
डोळ्यात हरवल्या माझ्या पेंगुळल्या साऱ्या रात्री  स्पर्शातुन उठते काहूर पोचण्यास गात्री गात्री  श्वासात कोरल्या गेल्या व्याकूळ मनाच्या गाठी  आठवता गहिवर येतो त्या धुंद क्षणांच्या भेटी  ही ओढ अनामिक दाटे मोहरून येते काया  देहात असा दरवळतो तू मोहक अत्तर फाया  का नाव तुझे घेताना ओथंबुन श्रावण येतो  सावळा मेघ भिरभिरतो देहावरती कोसळतो  हे सौख्य असे नात्याचे की नुसते आभासाचे  मी भान हरपुनी आहे की बघते स्वप्न सुखाचे  पोचल्या कश्या ना हाका का साद न पडली कानी  मी व्याकुळ आहे इकडे का तुझ्या न आले ध्यानी  ©रश्मी पदवाड मदनकर विधाता वृत्त

जरा हासून घेते..

 गालगागा*4 मी व्यथांचे गीत गाते अन जरा हासून घेते काळजाची जखम शिवते अन जरा हासून घेते ज्या उन्हाने जाळले ते घेतले झोळीत माझ्या लपवते दररोज चटके अन जरा हासून घेते भेटलेल्या माणसांचे चेहरे खोटे निघाले मुखवटा बघते जगाचा अन् जरा हासून घेते सारखे आरोप करतो हा जमाना का कळेना वागते निर्ढावलेली अन जरा हासून घेते नाचते, ना लाजते मी बाळगत नाही तमा ही वागते स्वच्छंदी ऐसी अन् जरा हासून घेते या जगाशी भांडते अन जिंकते काही हवे‌ ते चिडवते मी प्राक्तनाला  अन् जरा हासून घेते

पिसे लागले ..

  फुलाच्या तनाशी धुके दाटले   कशी पाकळी ही दिसे साजरी  पिसे लागले सावळ्याचे तिला  जडाली अशी प्रीत भुंग्यावरी  सुगंधी असा स्पर्श देहावरी  नव्याने पुन्हा वेचते, लाजते अश्या स्निग्ध वेळी नसे भानही  तिचे अंग धुंदीत नादावते  कहरतो जरा श्र्वास गंंधाळतो तमोधुंद काया तशी थरथरे चढे कैफ सारा नशा लाघवी  तिच्या तप्त देही भरे कापरे सरी पावसाच्या उरी झेलते झिरपते मनाशी जरा ओलही तसा डळमळे देठही साजरा  फुलाला पडे लाजरे स्वप्नही  बिलगतो जसा चुंबतो देह तो तिची पाकळी दरवळे मोहवे नव्या यौवनाची नशा आगळी निसटत्या क्षणा ओंजळी साठवे तिला साहवेना पिडा वैभवी निरंतर छळे वेड ते लावते  पुन्हा भेटण्याला किती आसुसे तिचा रंग कोमेजुनी सांगते ©रश्मी पदवाड मदनकर

नैतिकतेची कँडी'क्रश'

Image
  महेंद्रसिंग धोनीचा 'कॅण्डी क्रश' खेळतानाचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला आणि तासाभरात कॅण्डी क्रशचे ऍप्लिकेशन 30 लाख लोकांनी डाउनलोड केल्याची बातमी पसरली. बघता बघता बातमीचीही बातमी झाली आणि सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म धोनीच्या फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांनी ओसंडून वाहू लागले. त्यानंतर उलट सुलट चर्चाही रंगल्या. काहींच्या मते धोनी विमान सफरीच्या फावल्या वेळेत कँडी क्रश खेळताना कॅमेरात कैद होणं हा निव्वळ योगायोग होता आणि त्याची ही नैसर्गिक आवड लोकांना आवडली; तर काहींच्या मते ही हेतुपुरस्सर केलेली कँडी क्रश ॲपची जाहिरात होती आणि त्यासाठी सगळं वातावरण प्लॅन केलं गेलं होतं. विषय धोनीचं कँडी क्रश खेळणं हे सहज होतं की हेतुपुरस्सर हा नाहीच आहे, विषय खरंतर त्या पलीकडचा आणि जरा गंभीर असा आहे. धोनी त्याच्या फावल्या वेळात खेळतो म्हणून तासाभरात ३० लाख लोकांनी एखादा गेम डाऊनलोड करून घेणं हा आकडाच जरा अचंबित करणारा आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्या वागण्याचा, आवडीनिवडीचा संपूर्ण समाजावर केवढा मोठा प्रभाव असतो ह्याचे हे जिवंत उदाहरण. ह्याची जाणीव आणि त्याबाबतची आवश्यक संवेदनशीलता किती सेलिब...

रात्र झाल्यावर... !

Image
  उन्हाचा दाह शांतवते, जराशी रात्र झाल्यावर जिवाची काहिली होते, सुखाची रात्र झाल्यावर सुन्या रानात पेटवले, उगवत्या आठवांचे तृण तनाला भार सोसेना, मनाची रात्र झाल्यावर शहारा आजही येतो, तुझे का, नाव आल्यावर क्षणाचा गंधही छळतो उराशी, रात्र झाल्यावर मुक्याने का सहावे रे, तुझ्या कढ वेदनेचे मी बळे मग कंठही फुटतो, मलाही रात्र झाल्यावर जगाची का करू चिंता, असे काळीज जखमी हे घराला आग लावी ते, दिसाची रात्र झाल्यावर रश्मी पदवाड मदनकर

न्यायाधीशांची अनोखी शिक्षा

Image
अमेरिकेत एक पंधरा वर्षाचा मुलगा होता, एका दुकानातून चोरी करताना पकडला गेला. त्याला पकडल्यावर त्याने रक्षकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुकानातील एक कपाटही तुटले. न्यायाधीशांनी गुन्हा ऐकला आणि मुलाला विचारले, "तू खरोखरच ब्रेड आणि चीजचे पॅकेट चोरले आहेस का?" मुलाने खाली पाहिले आणि उत्तर दिले - होय. न्यायाधीश :- का? मुलगा :- मला गरज होती. न्यायाधीश :- विकत घेतले असते. मुलगा :- पैसे नव्हते. न्यायाधीश :- घरच्यांकडून घ्यायला हवे होते. मुलगा :- घरात फक्त आई आहे. आजारी आणि बेरोजगार, तिच्यासाठीच ब्रेड आणि चीज चोरले होते. न्यायाधीश :- तू काही काम करत नाहीस? मुलगा :- कारवॉश मध्ये करायचो. मी माझ्या आईची काळजी घेण्यासाठी एक दिवस सुट्टी घेतली होती, म्हणून मला काढून टाकण्यात आले. न्यायाधीश :-  कोणाकडे मदत मागितली का? मुलगा :- सकाळपासून घर सोडले होते, जवळपास पन्नास लोकांकडे गेलो, शेवटी हे पाऊल उचलले. युक्तिवाद संपला, न्यायाधीश निर्णय सुनावू लागतात, चोरी आणि विशेषत: भाकरीची चोरी हा अत्यंत लज्जास्पद गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला आपण सगळेच जबाबदार आहोत. "कोर्टातील प्रत्येकजण... ...

रुबरू रोशनी

Image
"Repay no one evil for evil, but give thought to do what is honourable in the sight of all..'' काही गोष्टी ऐकायला वाचायला फार बऱ्या वाटतात, पण त्या प्रत्यक्षात करण्याची वेळ येते तेव्हा ते असे वागणे कितपत जमते ? जमले पाहिजे...जमवायला हवे ! आयुष्यात एखादी भयंकर धक्कादायक घटना घडते आणि माणूस जवळजवळ उध्दवस्त होतो. इतकं भयंकर दुःख येऊन ठेपलेलं असतं कि त्यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही. या दुःखाची सल इतकी बोचरी असते ती सहनशीलतेच्या सगळ्या मर्यादा लंघून संपूर्ण आयुष्यावरच मळभ पसरते. काळोख काळोख दिसत राहतो सगळीकडे. आपल्याला या परिस्थितीत ज्यानं ढकललं त्याचा द्वेष, राग, सूड अशा अनेक विचारांनी मनाची स्थिती अधिक अधिक बिघडत जाते. शारीरिक मानसिक भावनिक सगळ्या स्तरावर खचलेल्या माणसाला पुन्हा पाहिलेसारखं साधारण जीवन जगणंच कठीण होऊन बसतं. या अशा परिस्थितीतून बाहेर निघायला उपाय काय असतो ? तर सेल्फ हीलिंग ! सेल्फ हीलिंग ! सेल्फ हीलिंग म्हणजे केवळ अंतःप्रेरणेने प्रयत्नपूर्वक स्वतःवर उपचार करून पुनःप्राप्ती करून घेणे. स्वप्रेरणेने स्वतःला एखाद्या विशिष्ट अप्रिय परिस्थितीतून बाहेर काढून झ...

दुर्दैवी देशाचे दशावतार -

Image
जि वंत राहण्याची लाचार धडपड आणि तगमगत जगण्याचा प्रवास कधी थांबेल, असा प्रश्न त्यांनी कितीही विचारला तरी आता त्याला उत्तर नाही. जगण्यापेक्षा मरण स्वस्त आहे, त्यातही स्त्रियांचे, गरिबांचे, निराधारांचे, मग लहानग्यांचे..त्यातही साऱ्या जगात स्त्री वर्गाचे आभाळ तर फारच फाटले आहे. कधीकाळी ज्यू महिलांच्या दुर्दैवाच्या दशावतारासारखेच, नंतरच्या सीरियातील महिलांच्या संघर्षाइतकेच आज इतक्या वर्षांनी तालिबान कैदेतल्या अफगाण महिलांची दुरावस्था पहिली तर स्त्रीत्वाच्या दुर्दैवी प्रारब्धाचा एक समान चेतातंतू असा कसा जीवघेणा खेचला जातो...हा प्रश्न संवेदनशील मनाला वारंवार पडल्याशिवाय राहत नाही.  गेल्या वर्षी सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर - शिक्षणापासून ते कपड्यांपर्यंत, त्यांच्या दैनंदिन हालचालींपर्यंत आणि आता काम करण्यावर देखील निर्बंध लादले आहेत. महिलांना स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्याच्या तालिबानच्या निर्णयामुळे अनेक संस्थांनी अफगाणिस्तानमध्ये मदत कार्य स्थगित केले आहे. तालिबान आल्यानंतर, महिला कर्मचाऱ्यांमध्ये थोडी भीती निर्माण झाली होती म्हणूनच त...

'स्वभान' जपणारी ग्रामीण स्त्री

१८ व्या शतकाच्या शेवटी घडून आलेल्या औद्योगिक क्रांती, शहरी विकास आणि पुनर्जागृतीमुळे समाजात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक बदल घडू लागले. त्यानंतरच्या काळात पश्चिमी देशांशी तुलना करत विकसनशील देशामध्ये जे परिवर्तन घडू लागले त्यालाच आधुनिकरण असे म्हंटले जाऊ लागले. हळूहळू तंत्रज्ञानाचा शोध, निर्मिती आणि वापर जसजसे वाढू लागले तसतसे जग अधिक जवळ येऊ लागले. सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या  वापरामुळे जगणे अधिक सुलभ सोप्पे होऊ लागले. भारतासारख्या विकसनशील देशात ह्याचे जास्त महत्व होते कारण एकतर पारतंत्र्याचा काळ भोगल्यानंतर शेकडो वर्षांनी स्वातंत्र्य मिळाले म्हणून शून्यातून सुरुवात करून वैयक्तिक प्रगती आणि देशाचा निदान मूलभूत विकास या दोन्ही गोष्टी कमावणं काही खायचं काम नव्हतं. एका बाजूने हे प्रयत्न सुरु होते तर दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीला भुलून तरुण पिढी भौतिक सुखाकडे आकर्षिले जाण्याकडे कल वाढत होता. भारतीय समाजाच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या एकूण सांस्कृतिक जडणघडणीतच मुळात फरक असल्याने ह्याचे परीणाम वेगवेगळ्या स्तरावर होऊ लागले. एकंदरीत सर्व बाजूने गतीने बदल होत चालल...

दुसऱ्या लग्नाची गोष्ट...

Image
 'ए क नयी आझादी का जश्न मनाओ - Begin again with a Smile'  या टॅगलाईनने सुरु होणारी कोलगेटची एक अत्यंत सुंदर जाहिरात टीव्हीवर येते. एक ज्येष्ठ महिला अत्यंत आनंदात मुलं-सुना, लेकी आणि नातवंडांना हॉटेलमध्ये पार्टीला बोलावते.. सगळे एकत्र आल्यावर जरा वेळात एक समवयीन तिच्याचसारखा  उत्साही आनंदी इसम तिच्या शेजारी येऊन उभा राहतो. 'हा कोण?' असा प्रश्नार्थक भाव घेऊन सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघतात तेव्हा ती बोटात घातलेली अंगठी दाखवते. म्हणजे या ज्येष्ठ महिलेने तिच्यायोग्य वर शोधून स्वतःचेच लग्न जुळवले असते.. आणि या निर्णयानं संपूर्ण कुटुंब आनंदी होताना आपल्याला दिसतं. ही माझी फार आवडती जाहिरात आहे खरंतर, पण एखाद्या ज्येष्ठ महिलेने किंवा पुरुषाने त्यांचा लग्नाचा जोडीदार गेल्या नंतर स्वतः पुन्हा लग्न करणे वगैरे ही संकल्पना अजूनही या जाहिरातीत दिसते तितक्या सहजपणे आपल्या समाजाला स्वीकारार्ह नाही. सामाजिक संस्कारच या पद्धतीचे असतील तर कितीही गरज वाटली तरी घरातील एकल ज्येष्ठासाठी जोडीदार शोधून त्यांचे लग्न लावून देण्यासारखा निर्णय एखाद्या कुटुंबासाठी विचारांच्या पलीकडले, अधिक धारिष्ठ्...

ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ?

Image
ईश्वरीय शक्ती अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला जातो आणि त्याचे एखादे समर्पक उदाहरण द्यायला कोणी सांगतं तेव्हा तेव्हा ब्रिटनच्या जॉन ली ह्यांची कथा स्मृतीपटलावर येते.     15 नोव्हेंबर 1884 रोजी इंग्लंडमध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जॉन ली ला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यावर जॉन ली कोर्टात ओरडून सांगत राहिला की मी निर्दोष आहे, जर खरंच देव अस्तित्वात असेल तर तो मला नक्कीच मदत करेल. 23 फेब्रुवारी 1885 हा दिवस होता जेव्हा जॉनला फाशी दिली जाणार होती.  फाशी देण्यापूर्वी फाशीची दोरी आणि फळी यांची स्थिती आणि ताकद तपासण्यात आली होती, जेणेकरून फाशी देताना कोणताही अडथळा येणार नाही. आता जॉन लीला फाशीसाठी त्या जागेवर आणण्यात आले. जल्लादने जॉन लीचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला आणि त्याच्या गळ्यात फास घातला. ऑर्डर मिळताच जल्लादने हँडल दाबले पण फळी उघडली नाही. हँडल वारंवार दाबले, पण फळी उघडू शकली नाही. फाशी एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली. यानंतर तपास सुरू झाला, आणि चाचणी म्हणून, जॉन ली सारख्याच वजनाच्या पुतळ्याला आणून फाशी देण्यात आली आ...