Posts

Showing posts from December, 2017

सोन्यासारखा जीव !!

भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना , .पाणी पाणी जीव होतांना  काळवंडलेली-कृश पारो...  कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात  पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कण कण शोधणारी.... हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.

आमच्या संवेदना न मरो ...

Image
नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्तेक ठिकाणी लहान मुले भिक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा जखमा झालेले अंग..वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलीकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले हि माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भिक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली, स्वतः पळून आलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?? कि रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही? कित्तेक आई-बाबा याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत.. पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना ..  https://www.facebook.com/rashmi.madankar/posts/1618222901531916?pnref=story # बच्चेबचाओ # Save...

#बच्चेबचाओ #SaveChildBeggars

# बच्चेबचाओ # SaveChildBeggars गेल्या १०-१२ दिवसांपासून फेसबुक अकाउंट डिऍक्टिव्हेट केले होते... त्या दिवशी अस्वस्थ होऊन ज्या कारणाने गेले आज त्याच कारणाने परत आले. एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणार काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं....बाराएक दिवसाआधीची गोष्ट असेल रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठ 'मुख्य' पोलीस स्टेशनही आहे. ७ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत पूर्ण कट झालेला हात दाखवत पंधराएक वर्षाचा मुलगा पुढे आला, हिला औषधाला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती दहा-वीसची एक नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर येत राहिला. काय झालं असेल.. का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ६ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेल...