Posts

Showing posts from January, 2016
"तुमच्या एव्हाना एक गोष्ट लक्षात आली असेल की, आपण जे जगतो ना, ते आपले मन, आपण कुणीतरी आपल्याला भरून दिलेल्या किंवा आपणावर लादलेल्या ध्येय, महत्वाकांक्षा किंवा आदर्शाच्या काल्पनिक आराखड्यात गुरफटून टाकून जगत असतो. अशा स्थितीत आपले मन स्वतःच्या स्वतः निर्णय घ्यायला स्वतंत्र असत नाही. सारी बौद्धिक शक्ती आपण समोर ठेवलेल्या ध्येयाकडे लागलेली असते. आपल्या जीवनाभोवती आपल्या दुराभिमानी व अहंकारी वृत्तीने विशिष्ट जीवन जगण्याची लक्ष्मणरेषा आपणच आखूनरेखून घेतो. त्या चाकोरीतच राहिल्याने तुमचे मन, तुमच्या र्हदयस्थ भावना, बुद्धीची टोचणी व दुराभिमानाचे नि अहंकाराचे फुत्कार यांच्या जरबेत हालचाल करीत असते. मोठी केविलवाणी स्थिती आहे ही. त्याने मनाचा गोंधळ इतका होतो की काही विचारू नका. अशा गोंधळलेल्या मनःस्थितीत अप्रसन्नता, अशांतता आणि असुख यापेक्षा अन्य कशाची अपेक्षा करता येईल ! जेंव्हा तुमच्या मनावर कसलेही दडपण नसेल किंवा कसल्याही जुनाट परंपरेचे , विशिष्ट जीवनसरणीचे, कौटुंबिक रुढींचे किंवा चालीरीती आखण्याचे, काही गमावण्याचे काल्पनिक किंवा तत्वतः ओझे बुद्धीवर लादलेले नसेल, तेंव्हा म...

अमृता प्रीतम

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर व्यक्ती , प्रत्यक्ष न भेटूनही भेटत राहणारी … ती माझ्या आयुष्यात आली तेव्हा माझ्या आयुष्याची कळी नुकती जीव धरू पहात होती . जाणीवा जागृत होण्याचा काळ तो . पावसा आधी नांगरून ठेवणाऱ्या जमिनिगत … आणि रुजण्याच्या नेमक्या क्षणी जे बीज या मातीत पडले ते इतके घट्ट रुजले कि सारे आयुष्य म्हणजे त्या बीजाची नाजूक थरथरती वेल होऊन बसली . 'अमृता ' हे माझे "माझ्यासाठी" असलेल्या "माझेच" एक नाव झाले , माझ्यातील मी , जी फक्त माझ्यासाठी माझी सखी होती. जिच्याशी मी माझे प्रत्येक उघडे वागडे नग्न सत्य कधीही शेअर करू शकत होते आणि जी मला अगदी पूर्ण पणे त्या सत्यांसकट सामाऊन घेत होती . असे कुणी आपल्या आतच दडलेले असते याची जाणीव या अमृताच्या माझ्यात रुजण्यानेच झाली. ती फारशी कळायची नाही आधी , पण मग म्हणूनच गूढ वाटत गेली आणि तिला जाणून घेण्यासाठी जीवाचा आटापिटा व्ह्याचा , त्यातही एक झिंग होती , तिला पूर्ण वाचून काढायची , तिच्यात घुसायची , इतके कि ती मीच आहे असे वाटावे . इतके मनस्वी , इतके निर्भीड आणि इतके प्रामाणिक मन घेऊन , त्यात बरेच काही सामाऊन जाताना सु...

प्रवास ( स्वगत)

Image
पुन्हा नवे वर्ष सुरु झाले दरवर्षीप्रमाणे. नव्या वर्षात नवे संकल्प सोडतात म्हणे. काहीतरी ध्येय ठरवायचे अन ते गाठायला मग धावत राहायचे वर्षभर. हे ध्येय गाठल्या गेले म्हणजे गंतव्य गाठलं समजायचं Final Destination ...achievement वगैरे. आणि मग त्यात सुख सुख मानायचं. मग पुन्हा नवे वर्ष नवे संकल्प अन नवे ध्येय पण गंतव्य गाठलं ह्यात कसलं आलंय सुख ते म्हणजे निव्वळ ego satisfaction किंवा शक्तीप्रदर्शन वगैरे  ...कदाचित. मी ठरवलं अन मी करून दाखवलं असं काहीसं. पण 'दाखवलं' म्हणजे ? कुणाला दाखवायचं असतं नेमकं ?   एखाद्या पाखराने उडत येउन एखाद्या वृक्षावर बसण्यात नसाव तेवढं उडत येतांना घेतलेल्या अनुभवांचं सुख मोठं असेल …  गंतव्यावर पोचण्यापेक्षा वाटेतल्या प्रवासाचे, प्रवासातल्या अनुभवांचे सुख अधिक. ठरवण्यापासून ते मिळवण्यापर्यंतचं प्रवास. प्रवास दोन बिंदुंच्या मधल्या पोकळीचा प्रवास. ''between the line''  दडलेल्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रवास. .....प्रवास अथ: ते इति पर्यंतचा . कधी सुखद कधी काटेरी प्रवास. उन्ह अन सावल्यांचा प्रवास. कधी खडतर कधी मखमली स्पर्शाचा प्रवास. कधी ओला प...

कॅनवास !

Image
कॅनवासवर पसरलेली अखंड रात्र.. बंद खिडकीच्या आतल्या गडद अंधारासारखी पुसटश्या किरणांची तिरीप आत शिरावी अन चंदेरी कवडसा थेट कॅनवासच्या कोपर्यावर पडून उजळून निघावा तसेच अगदी … छताचा तुटका गळका झरोखा आवस असल्याचे संकेत देत असतांना तो एकच ध्रुवतारा लुकलुकतांना दूर कुठेतरी जाणवतो आणि त्याचा मंद उजेड झरोक्यातून तळव्यात साठलेल्या अश्रूत सांडतो अन खोलीचा अक्ख्खा अंधारा कॅनवास उजळून निघतो गडद काळ्या मध्येच चमकणाऱ्या त्या चंदेरी अंधारात तुझ अस्तित्वही असंच हरवलंय अमावसेच्या चंद्रासारखं एका बारीकश्या किरणोत्सारी आशेच्या कुशीत मी चाचपडतेय अंधाऱ्या कॅनवासवर चित्र काढतेय ...…. एका सुंदर चित्राची कल्पना अशी गडद काळ्या रंगात न्हावून निघते अन तरीही जगाला ती सुंदर दिसते...हीच तर शोकांतिका आहे.