Posts

Showing posts from July, 2017
Image
काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, माग े सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि एक क्लिक.. गाणी सुरु होतात काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. गीतातल्या एखाद्या शब्दाने खपली पडते तर एखाद्या ओळीने विस्मरणात गेलेला माणूस आठवणीत जागा होतो…एखाद्या आलापात आपण भूतकाळाचा प्रवास करून येतो..… गाण्याची एखादी अर्थपूर्ण ओळ कानी पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं... रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. एक एक सूर स्पर्शत जातो, तन्मयतेचा षड्ज लागतो. जुने भास होऊ ल...

तिघींची घोडदौड साकारतेय 'वूमनविश्व'ची वाटचाल

Image
प्रत्येक पिढीत होणारी स्थित्यंतरे ही त्या-त्या जनुकांवर प्रभाव टाकणारी असतात. आजच्या पिढीच्या अपेक्षा अन्‌ आकांक्षा बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. अन्‌ याच अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत असतात. परिस्थिती, बदलत जाणारे वातावरण आणि त्यानुसार घडत जाणारी माणसे उमलत्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आजच्या तरुणाईपुढे अमर्याद संधी, तेवढीच स्पर्धेमुळे निर्माण झालेली आव्हाने आहेत. ती पार पाडायला वेळ मात्र मर्यादित. मग निव्वळ धक्कातंत्र सुरु असतं. एकमेकांशी तुलना करून मार्क्‍स आणि ग्रेडच्या गणिती चक्रव्युव्हात गरगर फिरत राहणं. वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सुद्धा ठाम माहिती नसणारे किशोरवयीन मुलं-मुली पालकांनी बोट दाखवल त्या दिशेने प्रवाहात वाहत राहणं, एवढच पसंत करतात. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्या सांस्कृतिक गरजा काय हे कळेस्तोवर पाणी डोक्‍यावरून गेलेलं असतं. मग काय..? आहे त्यात समाधान मानून केवळ तडजोड करत जगणे इतकंच काय ते हाती उरतं. आपण कोणत्या विषयाचे शिक्षण घेतोय तेवढेच फोकस करून त्यातच करीअर करायचे एवढेच चौकटीतले ध्येय राखून आजच्या त...