'स' संवेदनेचा कि सहानुभूतीचा !
सामाजिक कामाच्या अनुषंगाने वर्ष २००३ मध्ये नागपूर शासकीय मनोरुग्णालयात जाण्याचा योग आला. ओघाने झालेल्या चर्चेत मानसोपचारतज्ञ डॉ. सोनल देशमुख म्हणाल्या होत्या 'मानसिक आजार हि खरतर मुख्य समस्याच नाहीये, मुख्य समस्या आहे ती त्यांच्या पुनर्वसनाची. मानसिक रोग बरा करता येतॊ पण समाजातल्या लोकांच्या मानसिकतेला औषध नाही ' किती खरंय ना… … एखादी विकलांगता किंवा मानसिक आजार हे ज्याचे त्याने स्वीकारले असते. अश्यातही त्यातून बाहेर पडण्याची आणि त्यांच्या परीने जमेल तसे चांगले जीवन जगण्याची धडपड त्यांची चालू असते. त्यांना फक्त मानाने वागवण्याची आणि खरतर सामान्य वागणूक देण्याची गरज असते. पण असे घडत नाही एखाद्याचे एखाद्या बाबतीत सामान्य नसणं किंवा आपल्यासारखं नसणं हे आपण सहज स्वीकारतच नाही. अमक्याला काहीतरी व्यंग आहे किंवा होते हे आपण विसरूच शकत नाही. २००३ चे डॉ. सोनल यांचे वक्तव्य प्रकर्षाने आठवले त्याला कारण ठरली काल-परवा वाचलेली सोनाली मुखर्जी हिची बातमी आणि तिच्या नवरयाच्या कौतुकाने भरलेल्या आता या क्षणापर्यंत सुरु असलेल्या सोशल मिडिया वरच्या पोस्ट. जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी सोनालीवर ए...