Posts

Showing posts from December, 2025

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

Image
  #मुखपृष्ठ #कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची. पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. ही कहाणी आहे एका आयुष्याची....होरपळत, तावून-सुलाखून, वेदनांतून घडत अखेर स्वतःचं अस्तित्व उजळवून टाकणाऱ्या एका ताऱ्यासारख्या जीवनप्रवासाची. आणि तितक्याच ठळकपणे, आपण जगत असलेल्या या काळाची… या एराची. हा असा काळ आहे जिथे काही माणसांची असंवेदनशीलता इतर काही माणसांच्या आयुष्याची वाताहत करतात. ज्या समुदायाचा भारतीय इतिहास सांगतो की ते कधी राजाश्रय प्राप्त होते, आदराने आणि प्रतिष्ठेने.. नवरत्नातील रत्न म्हणून राजमहाली वावरत होते. तोच समुदाय आज उपेक्षित का झाला असेल बरं ? कुठे, कधी आणि कसे आपण समाज म्हणून चुकलो की ज्यांना कधी सन्मान मिळत होता, त्यांना आज दारोदार टाळ्या वाजवत फिरण्याची अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली? आपल्या नाकारण्याची किंमत या समुदायाला कोणकोणत्या यातनांतून मोजावी लागते, हे जर आपण संवेदनशील नजरेने समजून घेतले, तर खूप काही बदलू शकते... आणि हा बदल दोन्ही बाजूंना समाधान देणारा ठरेल याची खात्रीही वाटते. #कायांतर या कादं...

''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने...

Image
  समाजात #तृतीयपंथी व्यक्तींविषयी काळानुसार असंख्य #कथा निर्माण होत गेल्या... काही अफवा, काही अर्धसत्य तर काही पूर्वग्रहांनी ग्रसित. या कथांनी त्यांच्या भोवती एक धूसर, अंधुक वलय निर्माण केलं. परंतु त्या धुक्याच्या पलीकडे, जरा जवळून पाहिलं की कळतं; हा समुदाय अतिशय भावनाशील-संवेदनशील आणि माणुसकीच्या नात्यांना मायेने जपणारा आहे. #नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने भूक भागवण्याचा आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात अनेक तृतीयपंथीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, आयुष्यभर नरकात भोगाव्या इतक्या दुःखयातना भोगाव्या लागतात. हे सगळं फक्त एवढ्यासाठी कारण समाज त्यांना स्वीकारत नाही.. हे किती दुर्दैवी आहे. आज या बाबत दोन्ही बाजूने जागृती होत असली, बदल घडत असला तरी पूर्ण परिवर्तन घडायला अनेक युगे जावी लागणार आहेत. माझं येऊ घातलेलं हे नवं पुस्तक #कायांतर लिहीत असताना, अनेक तृतीयपंथींच्या भेटी घेतल्या आणि मनाला स्पर्शून जाणारे, हृदय पिळवटून टाकतील असे अनुभव ऐकायला मिळाले. ते ऐकताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगाच्या कहाण्या ऐकत आहोत असे वाटू लागते; कारण आपल्या जगात, आपल्या भोवताल सगळं आलबेल अ...

मानवतेचा खरा अर्थ दाखवणारा तृतीयपंथी समुदाय

Image
#नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने २०१४ चा काळ होता… २३ ऑक्टोबर 2014. ती दिवाळीची रात्र होती. दिल्लीच्या त्रिलोकपुरी परिसरात त्या दिवशी हवा काहीतरी वेगळीच जाणवत होती. सकाळपासूनच गल्लीबोळांत कुजबुज वाढत होती, लहानमोठे वाद ऐकू येऊ लागले. रस्त्यांवर तणावपूर्ण चेहरे फिरत होते. जणू काही अदृश्य ठिणगी हवेत पेट घेण्याचीच वाट पाहत होती. संध्याकाळी सूर्य मावळायला लागला आणि शहरावर अंधार पसरू लागला तशी परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. दिल्ली अचानक थरथरली… कुठेतरी दगडफेक झाली, एखाद्या गल्लीत भांडण पेटलं, दुसऱ्या टोकाला जमाव एकत्र येऊ लागला आणि क्षणभरात संपूर्ण परिसरात सांप्रदायिक दंगल उसळली. लोक धावाधाव करू लागले; दुकाने, कार्यालयांचे दरवाजे झटापट करत बंद करू लागली. कुठे हाका, कुठे किंकाळ्या, काही घरांच्या खिडक्यांमधून रडणाऱ्या स्त्रियांचे आवाज ऐकू येत होते. कुणाच्या मोबाईलवर अफवा, कुठे भीतीची लाट… हवा धुराने आणि भयाने भरून गेली होती. पोलीस पुरेसे नव्हते, नेते दिसत नव्हते आणि संपूर्ण परिसर तोडाफोडीच्या, जळायच्या मार्गावर उभा होता. जमाव गटागटाने एकमेकांना मारण्याच्या कापून टाकण्याच्या उद्द...

From wheels to wings ...

Image
  From wheels to wings .... A symbol of freedom beyond limitations; the iconic wheelchair grave in Salt Lake, America. काहीतरी वाचत शोधत राहिलं की काहीतरी सापडत राहतं... कधी मनाला भावणारं, तर कधी बुद्धीला खाद्य देणारं. असच काहीतरी सापडलं आणि शेअर करावं वाटलं. प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते म्हणतात, आणि ते प्रेम अपत्याबद्दल असेल तर ते मर्यादेच्याही पलीकडे कितीतरी व्यापक होऊन बसतं. परवा एका वेगळ्या कारणासाठी काही संदर्भ शोधत होते... तेव्हा एक व्हिडिओ पाहण्यात आला; त्यात अतिशय सुंदर स्मारक शिळा नजरेस पडली. खूप आकर्षित केले त्या मूर्तीने. संपूर्ण स्मशानभूमीत ते एकमेव थडगे किंवा स्मारक (Grave) होते.. जे लक्ष आकर्षित करत होते. आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूनंतर त्या वडिलांनी ज्या भावनेने ते बनवले होते तेही विशेष आहे. ते थडगे आहे मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसन याचे. ते पाहून माहिती काढल्यावाचून राहवले नाही. मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसनचा जन्म २३ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला होता, जन्मतःच गंभीर आणि कधीही बरे न होणारे अपंगत्व घेऊन तो जन्माला आला.. तो जन्मापासूनच अंध आणि पंगु होता. जन्मानंतर तो काही तासच जिवं...

गम्मत

 NBT च्या राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात झालेल्या मुलाखतीत विशाखाने एक प्रश्न विचारला...  “तुम्हाला लिखाणासाठी प्रेरित करणारा एखादा गमतीशीर किस्सा सांगा ना. काहीतरी मजेशीर घडले असेल, ज्यातून काहीतरी लेखणीत उतरले असेल?” असा प्रश्न आला की खरतर मीच गोंधळते. कारण मी लिहिते ते बहुतांश गंभीर, वास्तविकतेत घडलेल्या घटनांमधून, आणि त्या अनुभवांतून मनात निर्माण झालेल्या उद्विग्नतेतून व कोलाहलातून जन्माला आलेलं असतं. माझ्या लिखाणाचा संबंध हा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेल्या कामाशी, अभ्यासाशी आणि संवादांशी आहे. त्यामुळे त्या लिखाणामागे गमतीदार किस्सा असण्याची शक्यता फारच कमी. उलटपक्षी गंभीर घटना अधिक असतात.  गम्मत असेल तर ती लिहिण्यानंतर किंवा लिखाणाच्या प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या प्रसंगांत असते. संवेदनशील विषयांवर लिहिल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यात जी गम्मत असते, किंवा गंभीर मुद्द्यांबाबत लोकांच्या उथळ समजुतींशी सामना झाला की जी विडंबनात्मक मजा जाणवते तीच खरी मजेशीर असते. एकाच व्यक्तीत दिसणारे दोन विरुद्ध चेहरे, दोन विरोधी विचार… हे पाहताना मात्र मला खरी गंमत वाटते. अशा अनेक “गंभी...

वाईब्ज -

Image
एक मराठी चित्रपट येऊन गेलाय ''अगंबाई, अरेच्चा'' या चित्रपटातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला येत असे. बरेचदा हे असे काहीतरी विचित्र माझ्याबाबत घडतं असं मला नेहमी फार स्ट्रॉन्गली वाटतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचे वाईब्ज माझ्यापर्यंत फार थेट आणि  प्रखरपणे पोचतात आणि ते फार स्पष्ट मला जाणवतात. म्हणजे पुढला व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, वरवर काहीही दाखवत असला तरी मनात काय भावना काय विचार बाळगतो.. समोर हसून बोलणारा आपल्या मागे गेल्यावर काय बरळतो ते आपोआप माझ्यापर्यंत पोचतं. याचे अनेक उदाहरण आहेत.. आश्चर्यात पाडणारे, अचंभित करून सोडणारे अनुभव आले आहेत. म्हणतात ना ''Actions can be seen, but vibes are felt; and what is felt stays longer than what is seen.'' म्हणजे एखाद्या नात्यात-मैत्रीत फार चांगलं चाललेलं असतं.. एखाद्या काळात त्या नात्यात काहीतरी जाणवायला लागतं. इथे आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं नाहीये, काहीतरी चुकीचं घडत असल्याचा आभास होतो. पुढला मात्र सगळं आलबेल असल्याचा दिखावा करण्यात अधिक चांगला वागू लागतो.. काळ पुढे सरक...