तू गेल्यावर इथे सांडले गंध तुझ्या श्वासाचे तू गेल्यावर घट्ट जाहले बंध तुझ्या ध्यासाचे कातरवेळी तू स्वप्नांना हळुच जागर देतो अलगद येतो ओढून ऊब घट्ट मिठीची देतो तुझ्या भोवती फेर घालती माझ्या गंधित वेळा तू असण्याने शितल झाल्या तप्त उन्हाच्या ज्वाळा तव स्पर्शाची ओढ अनामिक व्याकुळ करते छळते मखमल शेजेवर दरवळते धुंद अशी तळमळते सहवासाच्या सुरम्यवेळी सांज सुखाची फुलते विरहामधली ओढ घेऊनी रात्र उशाशी झुरते तू गेल्यावर मन बावरते पापण ओले करते आठवणींची वेडी सर मग, श्रावण होत बरसते रश्मी पदवाड मदनकर ३०जुलै २०
Posts
Showing posts from August, 2020
'शिप ऑफ थिसीस - विरोधाभासाचा कॅलिडोस्कोप !
- Get link
- X
- Other Apps
'शिप ऑफ थिसीस' बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता.. थोडा थोडा तुटक पाहीला होता कधीतरी, पण सलग पाहायची इच्छा मात्र राहूनच जायची ती मागल्या आठवड्यात हट्टाने पूर्ण करून घेतली. ३ वेगवेगळ्या कथांचा बंच असलेला हा अत्यंत सूक्ष्म अश्या एका थेअरीवर बेतलेला सिनेमा आहे. 'शिप ऑफ थिसीस' ह्याच नावाची एक थेअरी आहे. ह्याचा गाभा असा आहे की, एखाद्या जुन्या तुटक्या पडक्या पण कामात असणाऱ्या नावेचे जुने भाग एक एक करत बदलत गेलो आणि एकदिवस एकूण एक भाग बदलले गेलेले असतील तेव्हा ती नाव पूर्वीचीच नाव उरेल का की ती पूर्णतः नव्या रंगाढंगांची जुनी वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन नव्या विशेषांसह नवीच नाव बनलेली असेल ?? जुनी असेल तर कुठून जुनी असेल .. आणि नवी झालीय तर तो कोणता बिंदू कोणता भाग असेल ज्यामुळे त्याला नवी ओळख प्राप्त होईल? .... हा विरीधाभासी प्रश्न (पैराडॉक्सिकल) आणि हीच थीम ही थेअरी ३ माणसांच्या जीवन कहाणीद्वारा 'शिप ऑफ थिसीस' या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विषय जरा कठीणच आहे.. बुद्धीवर जोर देऊन पहावा आणि समजून घ्यावा लागतो मात्र समजला तर आत्यंतिक समाधान देणारा .. हे असे च...