(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) कथा हा एक प्रवास असतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा. मधल्या काळात जे घडते ते कथानक असते. प्रत्येक लेखकाची लेखनशैली वेगळी असते, असावी. कथेची मांडणी कशी करावी, कशी असावी? या बद्धल रूढ नियम नाहित. कथा सहजगत्या उलगडत गेली तर ती वाचकांपर्यंत लवकर पोहचते. काही कथा वेगळ्या धाटणीच्या असतात, त्या पहिल्या वाचनात लवकर कळत नाहीत. त्यामधील ओळीमागचं, न लिहलेलंही समजून घ्यावं लागतं, काही जागा वाचकांसाठी सोडायच्या असतात. वाचकांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यात रंग भरता येतात. एकच कथा अनेक वाचकांना वेगवेगळी अनुभूती देत असते. आकाशातल्या ढगांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसतात, तसंच हे. कथा लेखन हे उस्फुर्त अंत:प्रवाही असावे. शब्दांचा कच्चा माल घेवून कथेची इमारत जरूर उभी राहू शकते पण ती साहित्यकृती होवू शकत नाही. इकडची वीट तिकडे, तिकडचा दगड इकडे करून कथेचा तोल सावरला जाईलही पण ते शब्दांचे बांधकामच ! एका तंद्रीत कविता सुचते. एका तल्लीनतेत चित्रकार रेषांचे फटकारे मारत चित्राला जिवंत करत असतो. समाधी अवस्थेत जावून मुर्तीकार छिन्नी हाथोड्याने मुर्ती घडवत असतो. लेखनाचेही तसेच आ...