Posts

Showing posts with the label चित्रपट

रुबरू रोशनी

Image
"Repay no one evil for evil, but give thought to do what is honourable in the sight of all..'' काही गोष्टी ऐकायला वाचायला फार बऱ्या वाटतात, पण त्या प्रत्यक्षात करण्याची वेळ येते तेव्हा ते असे वागणे कितपत जमते ? जमले पाहिजे...जमवायला हवे ! आयुष्यात एखादी भयंकर धक्कादायक घटना घडते आणि माणूस जवळजवळ उध्दवस्त होतो. इतकं भयंकर दुःख येऊन ठेपलेलं असतं कि त्यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही. या दुःखाची सल इतकी बोचरी असते ती सहनशीलतेच्या सगळ्या मर्यादा लंघून संपूर्ण आयुष्यावरच मळभ पसरते. काळोख काळोख दिसत राहतो सगळीकडे. आपल्याला या परिस्थितीत ज्यानं ढकललं त्याचा द्वेष, राग, सूड अशा अनेक विचारांनी मनाची स्थिती अधिक अधिक बिघडत जाते. शारीरिक मानसिक भावनिक सगळ्या स्तरावर खचलेल्या माणसाला पुन्हा पाहिलेसारखं साधारण जीवन जगणंच कठीण होऊन बसतं. या अशा परिस्थितीतून बाहेर निघायला उपाय काय असतो ? तर सेल्फ हीलिंग ! सेल्फ हीलिंग ! सेल्फ हीलिंग म्हणजे केवळ अंतःप्रेरणेने प्रयत्नपूर्वक स्वतःवर उपचार करून पुनःप्राप्ती करून घेणे. स्वप्रेरणेने स्वतःला एखाद्या विशिष्ट अप्रिय परिस्थितीतून बाहेर काढून झ...

लाॅक-अनलाॅक

Image
दारं खिडक्या पक्क्या बंद केलेल्या खोलीत किंवा खूप गर्दी असणाऱ्या ठिकाणी एक मिनिटही राहता न येणं, जीव गुदमरणं हा एक प्रकारचा फोबीया आहे. क्लाॅस्ट्रोफोबीया (Claustrophobia) असं त्यांचं नाव आहे. माझ्या आईला ही समस्या असल्याचे आम्हाला लहानपणापासून माहीत आहे. तिच्या लहानपणी एकदा कोणीतरी गमतीने तिला बाथरूममध्ये लाॅक केले होते आणि त्याच अवस्थेत अनेक तास अडकल्यानं नंतर तिला हे विचित्र भीती वाटायचं प्रकरण सुरू झालं. ती claustrophobic असं कळलं. घरात सगळे दारं खिडक्या बंद असणं किंवा बंद एसी कारमधून प्रवास केल्यानं तिचा श्र्वास कोंडल्यासारखा होतो. ती आमच्यासोबत कोणत्याही थिएटरलादेखील सिनेमा पाहायला येऊ शकत नाही. एकदोनदा आम्ही प्रयत्न केला पण अर्ध्या तासातच तिचा जीव गुदमरू लागल्याने आम्हाला चित्रपट अर्धवट सोडून निघून यावं लागलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेले अनेक दिवस आम्ही राहतोय त्या एरीयात घराच्या चारही बाजूंनी कोरोना पेशंट वाढलेले, भारतीय म्हणून आपल्या जगण्यात मुरलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक नियमांनुसार अजूनही आम्हाला विलगीकरणाचं महत्त्व न समजल्याने, पटत नसल्याने किंवा शेजारी पॉझिटीव्ह पेशंट...

'शिप ऑफ थिसीस - विरोधाभासाचा कॅलिडोस्कोप !

Image
'शिप ऑफ थिसीस' बऱ्याच दिवसांपासून पाहायचा होता.. थोडा थोडा तुटक पाहीला होता कधीतरी, पण सलग पाहायची इच्छा मात्र राहूनच जायची ती मागल्या आठवड्यात हट्टाने पूर्ण करून घेतली. ३ वेगवेगळ्या कथांचा बंच असलेला हा अत्यंत सूक्ष्म अश्या एका थेअरीवर बेतलेला सिनेमा आहे. 'शिप ऑफ थिसीस' ह्याच नावाची एक थेअरी आहे. ह्याचा गाभा असा आहे की, एखाद्या जुन्या तुटक्या पडक्या पण कामात असणाऱ्या नावेचे जुने भाग एक एक करत बदलत गेलो आणि एकदिवस एकूण एक भाग बदलले गेलेले असतील तेव्हा ती नाव पूर्वीचीच नाव उरेल का की ती पूर्णतः नव्या रंगाढंगांची जुनी वैशिष्ट्ये संपुष्टात येऊन नव्या विशेषांसह नवीच नाव बनलेली असेल ?? जुनी असेल तर कुठून जुनी असेल .. आणि नवी झालीय तर तो कोणता बिंदू कोणता भाग असेल ज्यामुळे त्याला नवी ओळख प्राप्त होईल? .... हा विरीधाभासी प्रश्न (पैराडॉक्सिकल) आणि हीच थीम ही थेअरी ३ माणसांच्या जीवन कहाणीद्वारा 'शिप ऑफ थिसीस' या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विषय जरा कठीणच आहे.. बुद्धीवर जोर देऊन पहावा आणि समजून घ्यावा लागतो मात्र समजला तर आत्यंतिक समाधान देणारा .. हे असे च...

झूम जब तक धड़कनों में जान है ...

Image
याद रख जीवन के पल हैं चार... सीख ले हर पल में जीना यार.. मरने से पहले जीना सीख ले !! कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली बंदूक लावावी आणि सांगावे मरण जवळ येतंय, दिवस निघत जातायत, 'स्व'च्या पलीकडले जगणे काय असते शिक. आणि जगून घे मनासारखं एकदातरी. असच काहीतरी होतंय ना ... कोरोना नावाच्या बंदुकीच्या टोकावर आहोत आपण सगळे, कुणाची गोळी पहिले चालणार हाच काय तो प्रश्न.. या काळात अनेकांचे अवसान गळून पडले असतील. मुखवटे उतरले असतील. झगमगाटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा जगण्यामरण्याचा प्रश्न महत्वाचा वाटायला लागावा असा काळ उगवून पुढ्यात येऊन ठाकला आहे. आता जमापुंजी साठवत बसण्यापेक्षा गरजवंतांसाठी पुढे येणारे हात दिसतायेत. एरवी स्पर्धेच्या चढाओढीत पायात पाय अडकवणारे पोटावर पाय देऊन पुढे जाणारेही एकमेकांना हात देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत. माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा, नात्यातला की अनोळखी, पापी की पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी मदतीला आलेला कुठलाही हात हा 'देवस्वरूप...

काही गाण्यांचे किस्से बनतात, काही किस्स्यांची गाणी.

Image
काही गाणी किती मनाचा ठाव घेतात... नाही ? इतके आत आत उतरतात की दिवसाच्या-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी ते कितींदाही ऐकता येतात आणि फक्त ऐकता येत नाहीत तर त्यात गुंग होऊन तादात्म्य प्राप्तीच्या स्तरापर्यंत जाता येतं. तुम्हाला आलाय कधी असा अनुभव ?? मला आलाय .. येतो आजही कितीदातरी.  काही गाण्याच्या धून नुसत्या वाजायला लागल्या की आपण वेगळ्याच विश्वात तरंगत पोचतो. अशीच एक धून आहे जॅकी आणि मीनाक्षीच्या हिरो सिनेमातली बासरी (फ्ल्यूट मेलोडी) आठवते ? ह्याच बरोबर त्यातलच 'निंदिया से आई बहार ऐसा मौसम देखा पहेलीबार' या धून लागल्या की आजही मनात काहीतरी कालवाकालव होते. ह्याच्याच उलट काही गाणी आहेत जी ऐकावीच वाटत नाहीत.. ती लागलीत कि तिथून पळून जावंसं वाटतं. अर्थपूर्ण शब्दांची गाणी ही माझी पहिली पसंती, त्यानंतर गायक संगीत किंवा इतर सगळ्या गोष्टी. दिवसभरातला माझा आवडता वेळ कुठला असतो सांगू, ऑफिस संपल्यानंतर ऑफिसमधून निघून घरी पोचेपर्यंतचा ५०-६० मिनिटांचा वेळ. कुठेतरी खूप घाईत पोचायची धावपळ नसते काम संपवून निघाल्याच समाधान असतं म्हणून रिलॅक...

यह कैसी माया है....

Image
दोन दिवसाआधी 'माया मेमसाब' मुद्दाम शोधून काढून अर्ध्या रात्रीपर्यंत पाहत बसले होते. खूप भावभावनांचा विचारांचा कल्लोळ या सिनेमाने पुन्हा एकदा मनात निर्माण केला. मला वाटतं प्रत्येक कलाकाराची ठरली असते तशी प्रत्येक कलाकृतीची देखील एकेक नियती ठरलेली असते. एखाद्या कलाकृतीचा तिच्या चाहत्यांच्या मनातले स्थान-आदर किंवा प्रसिद्धीच्या झोतात कुठवर जाणार कि मग तशीच विरून जाणार, अडगळीत फेकली जाणार हे कुणालाही सांगता येत नाही. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचे उद्देश वेगळे त्याचा आशय वेगळा त्यातून निघणारा अर्थही वेगळा पण रसिकांना गवसलेला किंवा त्यांनी काढलेला अर्थ वेगळा होतो आणि निर्मात्याच्या मनातली कलाकृती लोकांपर्यंत पोचतच नाही. 'माया मेमसाब' बद्दल मला असेच वाटले. फार पूर्वी एकदा ओझरता पाहिला होता कुठे कसा फारसं आठवत नाही. पण त्यातली गाणी गाण्यांचे शब्द खोलवर आत उतरले होते. खयाल चलते है आगे आगे मै उनकी छांव में चल रही हूं… न जाने किस मोमसे बनी हूं जो कतरा कतरा पिघल रही हुं मै सहमी रहती हूं नींद में भी कही कोई ख्वाब डस न जाये….. मेरे सरहाने जलावो सपने मुझे जरासी तो नींद आये...

लेखकांच्या गोष्टी

Image
#लेखकांच्या_गोष्टी ''If a writer loves you, every single moment spent together, good and bad, will be documented, reflected on, glorified, transformed into poetry. They will turn even the ugliest sides of you into something lovable, perfect. Writers are obsessively observant, they feel the rawest form of emotions, they see human behaviour as something to always take note of. You become their favourite character.'' परवा एका मित्राने गंमतीनेच हा कोट फॉरवर्ड केला “If a writer falls in love with you, you can never die.” जवळ जवळ वर्षभरापूर्वी मीही गमतीने अशीच पोस्ट टाकली होती .. “ जर लेखक तुमच्या प्रेमात पडला तर तो तुम्हाला कधीच मरू देणार नाही, पण तुम्ही लेखकाच्या प्रेमात पडलात तर तो जगू देणार नाही '' हा गमतीचा भाग असला तरी लेखकांबद्दल अनेक समज-गैरसमज कायम असतात हे खरे. हे वाक्य वाचले तेव्हा अनेक वर्षांआधी दूरदर्शनवर 'मिट्टी के रंग' मधून की झी च्या 'रिश्ते' मध्ये ते आठवत नाही मात्र एक भन्नाट कथा पाहिल्याचं आणि ती डोक्यात ठासून बसल्याचं आठवतं....
Image
मुळातून येऊन पुन्हा मुळाकडे जाण्याची ओढ संवेदनशील माणसांना खुणावत असली पाहिजे. निव्वळ मुळाकडे परत जाणे हा इतका उथळ विषय नाही. ह्या विषयाची व्याप्तीच अत्यंत खोल आणि गंभीर अशी आहे. सगळ्यांना आकलन होईल असा हा विषयही नाही.. पण तरीही या गोष्टीच आकर्षण मात्र अनंत काळापासून आहे ह्याची अनेक उदाहरणं दिसतात. मुळापर्यंत म्हणजे शुन्याकडे, जेथून निर्मिती झाली तेथवर म्हणजे त्या अनुभवाच्या अवस्थेपर्यंत जाणे असे काहीतरी किंवा त्याहून अधिक गहिरे वगैरे. "कथाकार दि.बा मोकाशी यांची 'जरा जाऊन येतो' नावाची एक कथा आहे. या कथेतील नायक गणेश ओक कुटुंब वत्सल असूनही एकदिवस अचानकपणे नाहीसा होतो. मग सर्व संबंधित मंडळी त्याचा अटीतटीने शोध घेतात. पण त्याचा शोध लागत नाही. खरंतर अवतीभोवतीच्या यंत्रप्रधान-अर्थनिष्ठ, एकसुरी, चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळून त्यातून सुटण्यासाठी, तुटलेपणातून वाचण्यासाठी काही क्षण गणेश 'औदुंबराला' जाउन आला असतो. औदुंबराला गणेशला गर्भाशयातील शांतता लाभते. निर्भर प्रसन्नता, अतीव शांतता, आणि स्वतःतल्या माणसाची ओळख त्याला तिथेच मिळते. चिरंतर प्रसन्नतेच्या शांततेचा ठेवाही...

रात और दिन -दिवानगी अन मदहोशी

Image
वेगळ्या विषयांवरील चित्रपट :- सक्तीची विश्रांती चाललीये सध्या आठवडा पूर्ण विश्रांतीत गेलाय आणि आता बोर व्हायला लागलंय. हालचाल फार करता येत नाहीये त्यामुळे गपगुमान बसून राहायचंय.. ऑप्शन नाहीये पुस्तकं वाचतेय आणि जमेल तसे बघायची इच्छा राहून गेलेले चित्रपटही हुडकून काढते आहे.   काल असंच टीव्ही समोर बसले असतांना 'मदहोशी' सिनेमा लागलेला बिपाशा बासूचा. तसा बिपाशाचा सिनेमा म्हंटलं कि फार काही बोलण्यासारखं असेल असं वाटत नाही पण मदहोशी चित्रपट वेगळा आहे. ११सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या आतंकवादी हल्ल्यात तिने बहिणीला गमावले असते त्याचा तिच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि ती स्क्रिझोफ्रेनियासारख्या भयाण रोगाने ग्रासली जाते. आणि ती तिच्याच मनानं तयार केलेल्या एका वेगळ्याच विश्वात जगू लागते.एका काल्पनिक आतंकवादी विरोधी दस्त्याच्या सैनिकाच्या प्रेमात पडते. तो, त्याचं घर, त्याच्या सवयी सगळ्यावर जीव ओवाळून टाकू लागते. ती जे बघत असते ते इतर कुणालाही दिसत नाही .. हे सगळं लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो तोवर ती उपचारापलीकडे, पुरती वेडी होते. पुढे सिनेमाला चांगले वळण द्यायचे म्हण...

उजेडाचा मिलन 'स्पर्श' !

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं ) एखादा भावनाप्रधान चित्रपट पाहायला आवडतंच त्यात तो जुना आवडत्या अभिनेत्यांचा असेल तर क्या बात .. पण एखाद्या अत्यंत संवेदनशील नजरेने टीपलेले चित्रपटाचे सिन आणि त्याचा उलगडा इतका हळुवार इतका विलोभनीय की चित्रपट पाहील्यावर इतका कळला नसता तो वाचनातून झिरपतोय आपण त्या विश्वात तन्मयतेनं रमतोय असं वाटत राहतं ... एक अत्यंत आवडलेला लेख. ................................................. उजेडाचा मिलन 'स्पर्श'! संजय आर्वीकर उजेड हा मुक्तीचा भावसंकेत असतो. आत्मज्ञान आणि आत्मशोधाच्या प्रवासातला हा एक वाटाड्या असतो. उजेडाच्या प्रकाशात अहंगंडात रूपांतरित झालेला न्यूनगंड वितळवून टाकण्याची शक्ती असते. त्यागाच्या आवरणाखाली लपलेले प्रेम सूर्यफुलासारखे उमलण्याची असते. सई परांजपेंचा ‘स्पर्श’ हा सिनेमा उजेडाच्या जादूई मिलनाची गोष्ट सांगतो... नवजीवन अंध विद्यालयाचा प्रमुख असलेल्या अनिरुद्धचं घर. तो स्वतः दृष्टिहीन, पण विलक्षण स्वाभिमानी. घरात अनिरुद्ध आणि त्याच्याच विनंतीवरून शाळेत येऊ लागलेली कविता. कविताच्या पतीचं तीन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालेलं...
Image
काय चक्रावून टाकणारे योगायोग असतात बघा.. काल रात्रभर झोप लागली नाही म्हणून पहाटे 3.30 च्या सुमारास टीव्ही लावून बसले. झी सिनेमावर खुदा गवाह लागला होता... बर्याच वर्षाआधी पाहीलेला हा सिनेमा पाहूया जरावेळ म्हणून तोच लावून बसले. आई आणि मुलगी अश्या दुहेरी भुमिकाही काय खुबीने निभावल्या आहेत श्रीदेवीने हीच्यासारखी अभीनेत्री पुन्हा होणे नाही हा विचार करतच शेवटाला सिनेमा पोचला..काबूलवरून हिंदूस्थानला वेड लागलेल्या श्रीदेवीला आणलं जाईल आणि ती खलनायकांच्या तावडीत सापडेल...तीच्यावर होण ारे अत्याचार सकाळी सकाळी बघू नये उगाच मूड जाईल म्हणून तीचा सिनेमातला अब्बूजान- बादशाह खान म्हणजे अमिताभबरोबरचा एक सुंदर सिन तीची प्रगल्भ देखणी छबी डोळ्यात साठवून काहीतरी वेगळे बघायला चानल बदलले ...न्युजचानल लावलं, जनरल बातम्या चालू होत्या.. 5 एक मिनीटातच तीच्या मरणाची बातमी येऊ लागली..आधी धस्सकन झालं.मग वाटलं शक्यच नाही आतातर आपण हीला पाहत होतो. कालच तीचा मुलीबरोबर रॅम्पवर चालताना.. मुलीला दटावताना वायरल झालेला व्हीडीओ पाहण्यात आला होता तेव्हा किती ग्रेसफुल दिसत होती. मुलीपेक्षाही तीचंच आकर्षण ...

हम में है दम !

Image
बॉ लिवूड अभिनेत्रींचे सौन्दर्य नेहेमीच जगात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळेच त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरही चाहत्यांबरोबरच समीक्षकांचीही करडी नजर असते. हॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या आणि तिथेही 'ब्युटी विद ब्रेन'ची प्रचिती घडवून आणणाऱ्या तीन बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवास दिपवणारा दिसत असला तरी त्यामागे किती संघर्ष आहे हे देखील जगजाहीर आहे. अश्‍याच गाजलेल्या या तीन घटना, याच वर्षी कान फिल्म फेस्टिवलला 'लॉरिएल' ची प्रतिनिधी म्हणून रेड कार्पेटवर आलेल्या ऐश्वर्याचे पर्पल लिपस्टिक नेटिझन्सच्या टीकेचा विषय ठरला होता. प्रियंकाने व्हाइट हाऊसमध्ये बराक ओबामांबरोबर घेतलेले डिनर आणि हल्लीच हि सर्व चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याचे कारण म्हणजे 'एमटीव्ही एमा' अवॉर्डसाठी आलेल्या दीपिकाच्या ड्रेससिंग स्टाइलवरून पुन्हा एकदा जगभर तिच्यावर टीकेची लाट उठली आहे. असं म्हणतात कलेला कोणतेही गाव नसते, देश, जाती धर्म, पंथ अशी कुठलीही चौकट त्यांना अडकवू शकत नाही. 'कला' हा कलाकाराचा एकच धर्म असतो, तीच त्याची जात आणि तो त्यात किती माहीर आहे त्यावरच त्याची श्रीमंतीही गणल...

स्मिताच्या स्मृतीने दरवळणारा पुरस्कार

Image
उत्कृष्ट अभिनयाचं कौशल्य हे नुसतेच सुंदर दिसण्यावर कसे भारी पडू शकते ह्याचे सर्वात जिवंत उदाहरण कायम केले ते स्मिता पाटील हिने. हिरोईन व्हायचं असेल तर गोरं चामडं आणि रूपवती असलंच पाहिजे हे भारतीय चित्रपटांचं शतकात चोख बसलेलं सूत्रच बदलवून टाकणारी मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणारी हि गुणी लाडकी अभिनेत्री स्मिता पाटील.  या अभिनेत्रीने हिंदी- मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले. स्मिता पाटील यांना जाऊन आज 30 वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, चित्रपटसृष्‍टीतील सर्वोत्‍तम अभिनेत्री कोण असा प्रश्‍न उपस्‍ि‍थत झाल्‍यास आजही स्मिता पाटील यांचे नाव अग्रगण्य ठरते. तिच्या नंतरही कित्तेक हिरोईन आल्या अन गेल्या पण भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवलेली स्मिता कधीच सिनेरसिकांच्या विस्मरणात जाऊ शकली नाही. दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या स्मिता पाटीलची आत्ता इतकी ठळक आठवण येण्याचे कारण म्हणजे हल्लीच बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिला 'स्मिता पाटील स्मृती' पुरस्कार सोहळ्याने सन्म...