Posts

Showing posts with the label स्वरांगण

वोह ना आयेंगे पलटकर ... अलविदा मुबारक

Image
 काही माणसांच्या आयुष्याची नीट पडलेली घडी विस्कटते अन पुढे सगळी प्रमेयच चुकत जातात. गुणांची मूर्तिमंत प्रतीके असणारी हि माणसे ट्रॅजेडी मध्ये अशीकाही गुरफटली जातात की  गुणांहून अधिक त्यांच्या दुःखाचं पारडं कधी भारी होऊन पडतं कळतही नाही. 'कभी तनहाईयों में यु हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे, और बिजली कोध जायेगी '' हे गीत गायिले तेव्हा या गायिकेला अंदाजही नसावा कधीतरी या दोन ओळींचे बोल तद्वतच आयुष्यात खरे उतरणार आहेत. आयुष्याच्या उतारवयात त्या अश्याच गुमनामींच्या 'अंधारा'त झाकोळल्या गेल्या अन आयुष्याच्या अंतापर्यंत कितीतरी दुःखाच्या 'बिजली' झेलत राहिल्या. त्यांच्या गाण्यांनी त्याकाळात मंत्रमुग्ध होणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना मात्र ह्याचा थांगपत्ताही लागला नाही. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि आपल्या आवडत्या गायिकेचे झालेले हाल ऐकून सारेच संगीत प्रेमी हळहळले. मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानच्या सुजनगढ झुंझुनू इथला. लहानपणापासूनच चित्रपटांचं वेड होतं त्यांना. त्यातल्या त्यात सुरैय्यावर विशेष प्रेम होतं. सुरैय्याला बघणे, दिवसरात...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!!!

Image
आजच वाचण्यात आलेला एक अप्रतिम लेख... सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या …!!!! मी २००१ च्या ३१ डिसेंबर ला पंडित हृदयनाथ मंगेशकर (बाळासाहेब) यांचा भावसरगम कार्यक्रम बघायला गेलो होतो. तसा मी भावसरगम डोंबिवली, ठाणे, दादर येथे अनेक वेळा पहिला होता (डोम्बिविली वासी मित्र नितीन जोशी याची कृपा!!). पण हा कार्यक्रम विशेष लक्षात राहिला कारण रात्रभर पंडितजी गायले आणि त्यांनी सुरेश भट यांच्या बद्दल एक विशेष आठवण सांगितली !! जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले, तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबांना सांगितले की गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक ही गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "...

होऊन जाऊ दे ..

परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली ' अगं पुरणपोळी केलीय, तुला आवडते ना म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला' मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. पण फोन ठेवता ठेवता ती फार निरागसपणे म्हणाली& 'तू चविष्ट अस काहीतरी मिस करतेय हा बघ' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते पण आजच तिला मला बोलवावं का वाटलं किंवा स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच पन्नास वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेले पुरण तिच्यालेखी सर्वोत्कृष्ट असेल का? मागल्या आठवड्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलो होतो. तिथे गाणाऱ्या गायिकेच्या एकएका सुराने आम्ही धुंद होत होतो. तिनं असं काही आम्हाला तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं कि कशा कशाचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वा' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. शेवटच्या संबोधनात मात्र तिनं तिच्याच घ...

मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे !

Image
मेरा कुछ सामान …काही गुलजारमय लम्हे ! स्वतःच्या खऱ्या नावाला सार्थ करून दाखवणारे कमीच असतात, नाही? पण नसतात असे नव्हेच…. सम्पूर्ण सिंह कालरा जन्म १८ ऑगस्ट १९३६ ज्यांना आपण गुलजार नावाने ओळखतो. त्यांचा जन्म अविभाजित भारताच्या पंजाब मधील झेलम जिल्ह्यातील 'दिना' गावचा जे आता पाकिस्तानात आहे. अनेक पुरस्कारांचे, सन्मानांचे मानकरी ….गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले . म्हणूनच म्हणावेसे वाटते, तुम्ही तुमच्या नावाला जागलात गुलझारजी, सार्थ करून दाखवलंत….  तुम्हाला 'दादासाहेब फाळके अवार्ड' जाहीर झाला तो क्षणही किती महत्वाचा होता, प्रत्येकाचंं मन पुन्हा गुलजार गुलजार झालं वातावरण गुलजारमय होऊन ओठ गुणगुणायला लागले होते. तुमचे नाव जरी घेतले तरी प्रत्येकाला त्यांचे त्यांचे ते भारावलेले दिवस आठवतात आणि मन स्वप्नील दुनियेत रममाण होत जातं. एखाद्याची जादू तनामनावर राज्य करतेय 'जाने कीस सदि...