Posts

Showing posts from April, 2021

हृदयाचे पुस्तक

 *पादाकुलक वृत्त* कधी वाटते या ह्रदयाचे  हळवे कोरे पुस्तक व्हावे त्याने अलगद सारे काही  पुढ्यात डोळ्यांच्या ठेवावे चुरगाळल्या जुन्या क्षणांचे पान पुन्हा पालटता यावे घडी पाडल्या पानांना मग सावकाश मी सरळ करावे भिजल्या ओल्या शब्दांवरती हळुच कवडसा सोडुन द्यावा गर्द जांभळ्या शब्दांनाही नवस्वप्नांचा रंग चढावा !  कडक बोचऱ्या शब्दांना मी तळहातावर उचलुन घ्यावे,  स्पर्श कोवळा देउन त्यांना  मायेने रेशमी करावे ! आनंदाचे गंध हवेसे  पानांवर अलगद शिंपावे  आयुष्याचे हळवे पुस्तक  सृजनाने गंधाळुन जावे … !!! ©रश्मी पदवाड मदनकर

मूकबँग -

Image
आ पण काही खात असताना किंवा गिळताना तोंडाचा जो आवाज होतो त्या आवाजाला ASMR (autonomous sensory meridian response) म्हणतात. जगभरात हा आवाज ऐकायला आणि आवाज येताना पहायला नेटकरी झुंबड करतात. अशा व्हिडिओजला ‘सॅटिसफॅक्टरी व्हिडिओ’ म्हणतात; म्हणजे अश्या दृकश्राव्य गोष्टी ज्या तुमच्या मेंदूपर्यंत पोचतात आणि नंतर संपूर्ण शरीरभर समाधान पोचवतात. जे परत परत पाहावे वाटतात आणि ह्याला मेंदूचा मसाजदेखील बोलले जाते. हा अर्थ माझा १४ वर्षांचा मुलगा मला समजावून सांगत होता. हे खरंच काय आहे हे जाणून घेण्यासाठी एक दोन व्हिडिओ मी पण ओपन केले होते आणि त्याचा त्रासच वाढला. गेले काही दिवस फेसबुक किंवा यु-ट्यूब उघडले कि चायनीज किंवा कोरियन सुंदर सुंदर बाला खूप मोठ्या प्रमाणात चपर-चपर आवाज करत अन्न खाताना दिसतायेत. यात खरंच पाहण्यासारखं काय आहे ह्याचा विचार करतानाच लक्षात आले कि या व्हिडिओजचे व्ह्यूज करोडोच्या घरात आहेत. ह्याचाच अर्थ बिंदास व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळे पदार्थ (त्यांच्या भाषेत चांगले अन्‌ माझ्या मते प्रचंड हिडीस) खात, खात नव्हे भकाभक गिळत ही मंडळी अब्जोपती होतायेत. २०१० साली कोरिया या देशात ह्याचा मोठ्...

पुस्तक परीक्षण

Image
दोन पुस्तकं 'शेवटाचा आरंभ' आणि 'हँगमन' लेखिका - ज्योती पुजारी कल्पनेच्या भराऱ्या घेऊन लिहीलेल्या अनेक कथा कादंबऱ्या आपण वाचत असतो. एखादे कथाबीज घेऊन केवळ कल्पनेच्या धाग्यांवर एखादं तलम वस्त्र विणावं तश्या कादंबऱ्या तयार होतात.. पण सामाजिक विषयांवर, परिश्रम पुर्वक, प्रत्यक्ष भेटी घेऊन, संशोधन करून अभ्यासपूर्ण मांडणीतून वास्तववादी लिखाण करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतकी कमी आहे. अश्या पुस्तकांच्या वाचकांची संख्या तुलनेने कमी असली तरी, हे वाचक वेगळ्या आवडी-निवडीचे, बुद्धिवादी किंवा विचारवंत असतात. अश्या वेगळ्या वाचनाची आवड असणाऱ्या मास पेक्षा क्लास वाचकांसाठी अशी मूठभर पुस्तकं म्हणजे पर्वणीच असते. अश्याच वेगळ्या धाटणीतलं लेखन करणाऱ्या लेखिका म्हणजे ज्योती पुजारी. टेबलखुर्चीवर बसून कल्पनेचे घोडे दौडवण्यापेक्षा, भोवतालचा खराखुरा चेहेरा स्पष्ट करणारा, सत्यातला एखादा विषय निवडून, त्यावर अभ्यास करून, प्रत्यक्ष स्थळी जाऊन विषयाची उंची-खोली तपासत, पात्रांची भेट घेऊन त्यांचं आयुष्य समजून घेत.. सगळे बारकावे टिपत, त्यांची कथा-व्यथा साध्या सोप्या शब्दात वाचकांपर्यंत पोचवण्या...

#अष्टाक्षरी

 वाट पाही रखुमाई चंद्रभागेच्या तिराशी  डोई उन्ह पायी माती  हितगुज किनाऱ्याशी किती आठवे विठ्ठला किती अगतिक वेळा व्याकुळले तन मन तिला साहवेना पिडा विठू उभा‌ विटेवरी  मग्न भक्तांच्या भेटीत युगे अठ्ठावीस गेली  अजुनी नाही भानात कुठे घालावे साकडे  कुण्या देवाला पुजावे काय नवस करावा  कसे सांग बोलवावे  आळवावे किती देवा  सारा जन्म जाईल का ? भेटीसाठी जीव तीचा  कासावीस राहील का ?