Posts

Showing posts from January, 2018

सख्या रे ...

श्वास तुझा अन पाश मला का सांग सख्या रे प्रीत अशी हि जीवघेणी का सांग सख्या रे कशास देतो नित्य नवी तू जुलमी वचने बंध तोडुनी जातं कुणी का सांग सख्या रे स्मरते तुजला दिवस रात्र अन भिरभिरते मी विरह तुला का बोचत नाही सांग सख्या रे मनात माझ्या व्यापून बसला सगळी जागा नजर शोधते का तुला मग सांग सख्या रे नव्हतेच काही तुझ्यात अन माझ्यात तरीही अश्रुंमधुनी ओघळतोस का सांग सख्या रे किती छळावे, किती रडावे तुझिया वाचून येशील का तू द्याया उत्तर सांग सख्या रे रश्मी मदनकर
Image

नागपूर मेट्रोचा प्रवास

Image
भा रताच्या मध्य भागात स्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे एक प्रमुख शहर म्हणजे 'नागपूर'. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर असले तरी प्राथमिक गरजांपासून ते आवश्यक विकासात्मक कार्यापर्यंतच्या मूलभूत गरजांसाठीही सतत उपेक्षा अनुभवलेल्या संघर्षाचा एक मोठा इतिहास अनुभवलेले हे शहर आहे. १८६७ साली नागपुरात रेल्वे सुरु झाल्यानंतर आठवणीत राहिलेला फार मोठा संरचनात्मक विकास म्हणून १५ जानेवारी १९२५ साली स्थापन झालेले नागपूर रेल्वे स्टेशन होते त्याला देखील आता ९२ वर्ष झाली. त्यानंतर सार्वजनिकक्षेत्रात एवढा मोठा संरचनात्मक बदल घडला नाही. पण 'देर आये दुरुस्त आये' या तत्वावर नागपूर प्रगतीच्या पायवाटेवर मार्गक्रमण करीत आहे. नागपूर मेट्रो या घडणाऱ्या इतिहासाचे जिवंत उदाहरण ठरणार आहे आणि आपण सर्व या इतिहासाचे साक्षी. सध्या शहरात प्रचंड वेगाने आर्थिक वृद्धीच्या माध्यमातून विकासात्मक बदल घडताहेत आणि त्यासोबतच प्राथमिक सुविधा, आरोग्य, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल वाखाणण्यासारखे आहेत. या बदलासोबत आम्हालाही बदलणे क्रमप्राप्त आहे.  शहरातील रहि...
तुझ्या डोळ्यांच्या कडा भिजल्या कि माझ मनही ओलं गच्च होतं तु गाळलेली नुसतीच टिपं … 'मन' पूर होऊन वाहायला लागतं   तू निघून जातेस नंतर … अन तिथेच अंशा अंशाने शिल्लक राहतं तुझं अस्तित्व माझ्या मनातल्या थरथरत्या ओलाव्याचा मग अपारदर्शी आरसा होतो तुझ्या भावनांचा मग तोच वारसा होतो.  तू निघून गेल्यावर झिरपत राहतो आठवणींचा पाउस… न्हाऊन निघतो गारव्यात आणि व्यापून राहतो उरात  शुष्क श्वास, उसासे अन आर्त भाव सांडून सगळे … पसरलेले असतात घरात मी वेचत राहतो हे सारे कणाकणाने  तुझ्या अश्रूंचा ओघ माझ्या नजरेत उतरतो अवकाळी पावसाला जोर आता चढतो रिमझिम रिमझिम झिरपत ठिबकत राहतो रात्रभर भीजल्या मनाचा देह होऊन आखडून बसतो छतावर तू निघून गेल्यावर … मी माझा उरत नाही पापण्यांचा भिजका रंग पाठ माझी सोडत नाही तू येउन पुन्हा एकदा अलगद हसू फुलवून जा घरात पुन्हा तुझ्या आनंदाचे रंग उधळून जा सखे एकदा येउन जा … !!

दुसरा अँगल ..

बरेचदा जे कानावर येतंय, जे दाखवलं जातंय तेच सत्य असतं असं नाही काही गोष्टींचा अँगल जरा चेंज करून पाहावा. अनेकदा जी हवा पसरते, जो धुरवडा उडवला जातो, ज्याचा कांगावा होतो तेच खरं असतं असं नाही. किंबहुना मी तर म्हणेन धूर दिसतोय तिथे आग असतेच पण ती लागलीय कि लावली गेलीय हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते. जातीपातीच्या, धर्म-पंथाच्या चक्रव्युहात फसतोय आपण आणि फसवू बघणारे त्यावर त्यांची भाकरी भाजून घेत खुश आहेत. जसे एखादे शेजारी मुस्लिम राष्ट्र 'हितराष्ट्र' नाही म्हणून आपल्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम मित्राकडे शंकेच्या दृष्टीनं पाहणं योग्य नाही तसेच कुठेतरी कुणाची हत्या झाली म्हणून मरणारा एखाद्या विशिष्ट निम्न जातीचा होता फक्त आणि फक्त म्हणूनच मारला गेला असे समजणे सुद्धा योग्य नाही. एखाद्या धर्माकडे जातीकडे सतत शंकेच्या नजरेने पाहणे जसे योग्य नाही तसेच एखाद्या विशिष्ट जातीकडे धर्माकडे सतत बिचारे म्हणून दयाभावनेने पाहणे किती योग्य आहे ?? ज्या समाजाकडे शंकेने पाहिलं जातंय त्यांचा राजकारणासाठी फायदा घेतला जातो आणि ज्यांच्याकडे दयेच्या नजरेने सतत पहिले जाते त्याचाही फायदा घेत...

एक शख्सियत….. डॉ. राहत इन्दौरी

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) जब से तूने हल्की- हल्की बातें की यार तबीयत भारी -भारी रहती है एक शख्सियत…........ डॉ. राहत इन्दौरी तक़रीबन बीस बरस पहले एक शे'र कहीं पढ़ा :--- हमारे सर की फटी टोपियों पे तन्ज़ न कर हमारे ताज अजायब घरों में रखे है और सुनते ही उत्सुकता हुई कि अपनी कौम का ये दर्द काग़ज़ के सीने पे उतारने वाला ये शाइर कौन है ,मालूम हुआ डॉ.राहत इन्दौरी ने कहा है ये शे'र , बस तब से राहत साहब को पढ़ना शुरू किया और आलम ये है कि आज तक उन्हें पढ़ना और रु-बरु सुनना मेरे नसीब के खाते में है। राहत अरबी ज़ुबान का एक लफ़्ज़ है जिसका एक मआनी आराम भी है। निदा फाज़ली ने सच ही कहा है कि "राहत इन्दौरी ने इस आराम को बे-आराम बनाकर अपनी शाइरी की बुनियाद रखी है"। राहत इन्दौरी का जन्म इंदौर में मरहूम रिफत उल्ला कुरैशी के यहाँ 01 जनवरी1950 में हुआ। बचपन से ही राहत साहब को पढ़ने -लिखने का शौक़ था। एक मुशायरे के सिलसिले में जाँ निसार अख्तर इंदौर आये हुए थे उस वक़्त राहत दसवीं जमात में थे। राहत साहब उनसे मिलने पहुंचे और कहा कि हुजूर, मैं शाइर बनना चाहता हूँ ,मैं क्या करू...