Posts

Showing posts from March, 2020

तिची सागर भरारी -

Image
स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी हे सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी अन अपरिहार्य अशी उदाहरण आहेत. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वत्सलतेचा उपजतच वारसा मिळाला असला तरी ती तिच्या कर्तृत्वात कधी कसूर करीत नाही ह्याचे वरकरणी तोंडी कौतुक करणारे तिच्या याच गुणांना तिच्या कर्तव्याआड येणाऱ्या अडचणी सांगून तिचे अधिकार नाकारत असतील तर? 'स्त्री' हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कधी आकर्षणाचा तर कधी वादाचा. स्त्रीचं विश्वच वेगळं असतं किंवा ''women itself a different world '' असे म्हणाले तरी वावगं ठरणार नाही. पुरातन काळापासून ते आजतागायत तिच्या जगण्याशी संबंधित तिढा सुटायचे नाव घेत नाही. कुठे स्त्री उच्च शिक्षण घेऊन दर्जेदार नौकरी करतांनाही तिचे स्त्री असणे हा तिच्या गुणवत्तेपेक्षा मोठा विषय ठरतो तर कुठे अजूनही ती अठराव्या शतकातले अठरा विश्वे वैचारिक दारिद्र्याच्या लक्ष्मण रेषेत अडकून पडली आहे. तिने कितीही मोठी झेप घेतली किंवा कितीही मोठ्ठी उडी घेतली तरी परतीची उडी काटेरी कुंपणाच्या आतच येऊन पडावी हे दुर्दैव आहे. स्त्री-पुरुष सम...

कहता ये पल-खुद से निकल-जीते हैं चल ....

Image
आताशा चित्रपटातील नवऱ्याच्या प्रेमासाठी झुरणाऱ्या सासुरवाशीणी 'झुबेदा' आठवत नाही. परित्यक्ता होऊन 'अस्तित्व' शोधत फिरणाऱ्या नात्यांचा ' अर्थ' हरवलेल्या, त्यागमूर्ती अन्यायग्रस्त 'बंदिनी', नवऱ्याचा 'अभिमान' जपत स्वतःच्या आकांक्षा गमावून बसलेल्या, बलात्कार पीडित 'इन्साफ का तराजू' साठी संघर्ष करणाऱ्या, माजघराचा कोंडमारा सहन करणाऱ्या, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या, विधवेचा 'प्रेमरोग' अमान्य म्हणून समाजाने छळलेल्या, आयुष्य रडत घालवणाऱ्या ' कटी पतंग' सारख्या, 'सखाराम बाईंडर' पुढे असहाय, शोशिक, परीस्थितीने पिचलेल्या ' साहेब, बीबी और गुलाम' आणि कोण कोण.... सिनेमा नाटकातली ही पात्रे फार गाजली, ह्यातल्या अभिनेत्रींनीं सशक्त अभिनय केला असला तरी त्यांनी साकारलेल्या प्रतिमा आजच्या पिढीला प्रेरित करीत नाही हल्ली .. उलट ते समाजाचं रूप ठरू नये असं वाटत राहतं... आता परित्यक्ता होण्यापेक्षा स्वखुशीने स्वबळावर 'उंबरठा' ओलांडणारी सुमित्रा (स्मिता पाटील) उगाचच आठवत राहते रात्र रात्र.. 'इंग्लिश-विंग्लिश'...

सरिता कौशिक -

Image
#महिलादिन #WomensDay #भेटलेलीमाणसे सरिता कौशिक मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होते. एका रिक्षाचालकाच्या मुलीला (वैशाली वानखेडे) वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मला आठवतं..तेव्हा मी पोलीस आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पाठवले होते. एका अत्यंत हुशार आणि होतकरू मुलीचे भावी डॉक्टर होण्याचे स्वप्न केवळ गरिबीमुळे,पैशांअभावी दुर्लक्षित राहू नये असे मनापासून वाटत होते...वैशालीबद्दल का कुणास ठाऊक खूप जिव्हाळा निर्माण झाला होता, तिला कुठून काही मदत मिळू शकेल का आपला काही हातभार लागू शकेल का म्हणून मी धडपडत होते. तेव्हा सरिता कौशिक ह्यांचा ह्याच विषयाला घेऊन वृत्तपत्रातून चाललेला पाठपुरावा मी वाचत होते...आपल्यासारखंच कुणीतरी या विषयाला गांभीर्याने घेताय म्हणून न पाहता न भेटता सरिता कौशिकबद्दल आपसूक एक ऋणानुबंध वाटू लागले होते. दारोदार भटकणाऱ्या वैशालीची स्टोरी सरिताने ज्या ताकदीने लिहिली त्यानंतर देशभरातून हजारो मदतीचे हात वैशालीसाठी पुढे आले. लिखाणात केवढी ताकद असते हे अश्याच अनेक उदाहरणांमुळे मग मनावर कोरत गेले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्या टीव्हीव...