Posts

Showing posts with the label बातमी

सावध हरिणी, सावध गं !

Image
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमजाळ्यात अडकवून विश्वासात घेऊन तिच्याकडून हेतुपुरस्सर काही आक्षेपार्ह कृत्य करून घेण्यात आले होते आणि नंतर त्याचे व्हिडीओ सार्वजनिक रीतीने प्रसारित करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैशांची मागणी केली गेली. ही मागणी पूर्ण करणे जसजसे कठीण होऊ लागले त्या मुलीने इतरांची आर्थिक फसवणूक करणे सुरु केले आणि दुष्टचक्रात खोलवर अडकत गेली. नागपूर जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीच्या, सुशिक्षित-प्रतिष्ठित कुटुंबातल्या महिला. व्यस्त कुटुंब आणि एकांताला कंटाळून सोशल माध्यमावर हेतुपुरस्सर फुसलावणाऱ्या टोळीतील वेगवेगळ्या इसमाच्या प्रेमात पडल्या आणि भावनेच्या आहारी जाऊन आक्षेपार्ह चॅटींग, फोटो पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग या माध्यमातून नको त्या चुका करून बसल्या, आणि मग सुरु झाला जीवनमरणाचा खेळ. हे व्हिडीओ-फोटो कुटुंबाला पाठवावे किंवा सार्वजनिक करावे असे वाटत नसेल तर 'त्या' ...
Image
  या आहेत त्या चारमधल्या दोघी - स्थळ - शताब्दी चौक, रिंग रोड विषय - #SaveChildBeggars वेळ - ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि हा जो फोटो टाकलाय त्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं एकतर झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या आणखी दोघी मुली आहेत. त्या स्वतःच चिमुकल्या असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्र्न विचारण्याआत भरभर भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग दोन-तीन दिवस गुडूप होतात. प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोकच्या भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ?? एका चौकात इतकी तर शहरात किती .. आणि राज्यात.. देशात ? ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं.. कु...
Image
#बच्चेबचाओ #SaveChildBeggars #StreetChildrens हे दोघे भाऊ आहेत. नागपूरच्या सुभाष नगरला आजीसोबत झोपडपट्टीत राहतात. आई-वडील नाहीत. आज्जी खूप म्हातारी आहे. मुलांना २ वेळ पोट भरायला भीक मागावी लागते, दुसरा पर्याय नाही. भीक मागायचे ठिकाण : सीताबर्डी मार्केट. वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३० पर्यंत. प्रवास : सुभाष नगर ते सीताबर्डी येणे जाणे. साधन : #नागपूरमेट्रो . प्रवास खर्च - प्रत्येकी १० रुपये (५ रुपये येणे ५ रु जाणे). एकूण - २० रु. कमाई - प्रत्येकी १००-१५० रु. मग बाळांनो या आधी काय करायचे ?? उत्तर - पैदल यायचो पैदल ... ८-१० किमी पैदल सहज मनात आले - मेट्रोने गरिबांचे आयुष्य जरा सुखकर केलंय हे मात्र नक्की. म्हणून तर तिला #माझीमेट्रो म्हणतात. दिवसभर रखरखत्या उन्हात रापल्यानंतर १५ मिनीटांचं एसीत बसण्याचं सुख अनुभवलंय कधी ? भीक मागायचे अजिबात समर्थन करत नाहीये मी .. उलट अत्यंत विरोधात आहे. परंतु त्यांनी भीक मागू नये यासाठी दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. #बालमजुरी बंदी कायदा असल्याने कुठल्या तोंडाने त्यांना काम करा हे सांगायचे ?? कामही नाही करायचे भीकही नाही मागायची मग खायचे काय आणि कसे ?...

तिची सागर भरारी -

Image
स्त्री निर्मिती करते, संरक्षण करते आणि संवर्धनही करते. माता, सृष्टी आणि पृथ्वी हे सृजनशीलतेची शाश्वत, अपर्यायी अन अपरिहार्य अशी उदाहरण आहेत. स्त्रीला मातृत्वाचा आणि कुटुंब वत्सलतेचा उपजतच वारसा मिळाला असला तरी ती तिच्या कर्तृत्वात कधी कसूर करीत नाही ह्याचे वरकरणी तोंडी कौतुक करणारे तिच्या याच गुणांना तिच्या कर्तव्याआड येणाऱ्या अडचणी सांगून तिचे अधिकार नाकारत असतील तर? 'स्त्री' हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कधी आकर्षणाचा तर कधी वादाचा. स्त्रीचं विश्वच वेगळं असतं किंवा ''women itself a different world '' असे म्हणाले तरी वावगं ठरणार नाही. पुरातन काळापासून ते आजतागायत तिच्या जगण्याशी संबंधित तिढा सुटायचे नाव घेत नाही. कुठे स्त्री उच्च शिक्षण घेऊन दर्जेदार नौकरी करतांनाही तिचे स्त्री असणे हा तिच्या गुणवत्तेपेक्षा मोठा विषय ठरतो तर कुठे अजूनही ती अठराव्या शतकातले अठरा विश्वे वैचारिक दारिद्र्याच्या लक्ष्मण रेषेत अडकून पडली आहे. तिने कितीही मोठी झेप घेतली किंवा कितीही मोठ्ठी उडी घेतली तरी परतीची उडी काटेरी कुंपणाच्या आतच येऊन पडावी हे दुर्दैव आहे. स्त्री-पुरुष सम...

मरणाची ''पाळी'' ..

Image
पापी पोटाचा प्रश्न फार मोठा असतो, इतका मोठा कि जन्मभर पाठ सोडत नाही. टीचभर पोट भरायला माणूस आयुष्यभर खस्ता खातो पोट भरत राहावं म्हणून अक्ख्या शरीराचीच हेळसांड करीत राहतो. त्यात ती स्त्री असेल आणि कुटुंबातल्या चार माणसांची, लेकराबाळांची पोटं भरण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल तर जीवाचे हाल विचारूच नका. घरातल्या चिल्यापिल्यांचे पोट भरायला कधी ती उपाशी राहते, एका कापडावर महिने काढते, हाताला येईल ती कामं करते आणि वेळ आलीच तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोटच्या गोळ्याला पोसायला पोटचा एखादा हिस्साच कापून फेकून देते. योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या आठवड्यात देशभर साजरी केली गेली. स्वतः हाल-अपेष्टा साहून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून रीती-परंपरेच्या पार प्रस्थापित सामाजिक अन्यायी रूढींना नाकारत स्वयंसिद्ध होण्याचा धडा त्या माउलीने दिला होता.. दुसरीकडे त्याच आठवड्यात मराठवाड्यातील ३००० ऊस कामगार स्त्रियांनी पाळीच्या दिवसात रोजगार मिळत राहावा म्हणून अल्पवयात गर्भाशयच काढून टाकले या खळबळजनक बातमीने पुन्हा उचल खाल्ली.... ही काय अवस्था आहे ना, भारत जगात महासत्ता बनायला निघा...

चंद्रयान-२ च्या यशाच्या मानकरी महिलाशक्ती -

Image
प्र त्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं आजवर ऐकलंय, पण स्त्री केवळ कुणाच्यातरी मागे असते असे नव्हे तर अनेक यशासाठी प्रत्यक्ष कारणीभूतही ठरते. हे लक्षात यायचे कारण म्हणजे भारताचे महत्वाकांक्षी चंद्रयान-२ या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण २३ जुलै रोजी दुपारी २:४३ वा. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून (एसडीएससी) पार पडले ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, आणि त्यात या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले ही त्यातही प्रत्येकासाठीच अभिमानास्पद असलेली बाब आहे. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. बा भ बोरकर म्हणतात ''देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे !'' या प्रमाणेच निर्मितीच्या डोहाळ्यांचे रूपांतर सुंदर सोहळ्यात करणाऱ्या या वैज्ञानिक महिलांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कोण आहेत या दोघी, तर मुथय्या वनिथा आणि रितू करिधल अश्या चंद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला वैज्ञानिक, ज्यांनी या मिशनमध्ये अत्यंत महत्वप...

चर्चा सेलिब्रेटी मॅरेजेसची ...

Image
जगातल्या सर्व बातम्या देण्यासारख्या घटना संपुष्टात येऊन केवळ डोळ्यांचे पारणे फेडणा-या दिमाखदार विवाह लग्नसोहळ्याच्या बातम्या येऊ लागल्या तर ?? जिकडे तिकडे हि एकमेव चर्चा सुरु असली तर ? सकाळपासून टीव्ही चॅनेल्सवरून छोट्या छोट्या गोष्टींचे लाइव्ह प्रक्षेपण.. गेल्या वर्षभर प्रसारमाध्यमात जेकाही सुरु आहे ते पाहून हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. जणूकाही जगातील सर्व घटना संपल्या आहेत, राजकारण बंद पडलंय, समाजकारण संपुष्टात आलंय, अपघात, चोऱ्या चपाट्या, मृत्यू, गरिबी, भ्रष्टाचार हे सगळं सगळं व्हायचं थांबलंय आणि घडतंय फक्त नं फक्त सेलिब्रेटींचे विवाह असे वाटायला लागावं इथवर या लग्नाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून फिरताहेत.. नुसतं फिरत नाहीयेत तर गल्ली-बोळात, कट्ट्यावर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर ह्याचे चर्वित चर्वण वायरल होतंय. यंदाचं वर्ष म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय इंडस्ट्रीयालिस्ट आणि बॉलिवूडमधील ख्यातनाम व्यक्तींच्या लग्नसराईचं वर्ष म्हणून गाजलं. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश आणि नीता अंबानींच्या मुलाचे लग्न आटोपले आता सुरु आहे लगीनघाई मुलीच्या लग्ना...

आकांक्षांपुढती गगन ठेंगणे!

Image
म हिलांनी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरु करून आता बराच काळ लोटला. दरम्यानच्या काळात  समाजागणिक, व्यक्तीगणिक स्त्रियांच्या व स्त्रियांसाठीच्या ह्या अव्याहत लढ्याची वेगवेगळी रूपे पाहावयास मिळाली.  एक दुर्लक्षित, असहाय जिणे, परिस्थितीचे चटके खात जगणे तिला मान्य नव्हते.. हा लढा देत असतांनाच तिला अनेक संघर्षाला, आव्हानांना सामोरे जावे लागले. स्त्रियांना जगण्याची - जन्म घेण्याची संधी, पदोपदी संघर्ष न करता समान शिक्षण व अर्थार्जनाची संधी, समान वागणूक, श्रमांचे समान मूल्य व असुरक्षिततेची भावना न बाळगता समाजात सन्मानाने वावरता येणे हे सहज साध्य करणे शक्य नव्हते. सुरुवातीचा काळ कठीण होता खरा पण आता महिलांच्या तंबूतले वारे बदलू लागले आहेत. तीन तिच्या कष्टाने निगुतीने प्रयत्न करून स्वतःसाठी स्वतःच असं अस्तित्व निर्माण करून घेतलं आहे. तिला शिक्षणामुळे व आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे एक अनुभव-समृद्ध आयुष्य जगता येऊ लागलं आहे. तिचे स्वतःचेच नव्हे तर सर्व घराचे आर्थिक निर्णय घेणे, गुंतवणूक - आर्थिक नियोजन करणे यासारख्या गोष्टींबरोबरच नोकरी - करियरमध्येही तिला भरपूर वाव मिळायला ल...

दुसरा अँगल ..

बरेचदा जे कानावर येतंय, जे दाखवलं जातंय तेच सत्य असतं असं नाही काही गोष्टींचा अँगल जरा चेंज करून पाहावा. अनेकदा जी हवा पसरते, जो धुरवडा उडवला जातो, ज्याचा कांगावा होतो तेच खरं असतं असं नाही. किंबहुना मी तर म्हणेन धूर दिसतोय तिथे आग असतेच पण ती लागलीय कि लावली गेलीय हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते. जातीपातीच्या, धर्म-पंथाच्या चक्रव्युहात फसतोय आपण आणि फसवू बघणारे त्यावर त्यांची भाकरी भाजून घेत खुश आहेत. जसे एखादे शेजारी मुस्लिम राष्ट्र 'हितराष्ट्र' नाही म्हणून आपल्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम मित्राकडे शंकेच्या दृष्टीनं पाहणं योग्य नाही तसेच कुठेतरी कुणाची हत्या झाली म्हणून मरणारा एखाद्या विशिष्ट निम्न जातीचा होता फक्त आणि फक्त म्हणूनच मारला गेला असे समजणे सुद्धा योग्य नाही. एखाद्या धर्माकडे जातीकडे सतत शंकेच्या नजरेने पाहणे जसे योग्य नाही तसेच एखाद्या विशिष्ट जातीकडे धर्माकडे सतत बिचारे म्हणून दयाभावनेने पाहणे किती योग्य आहे ?? ज्या समाजाकडे शंकेने पाहिलं जातंय त्यांचा राजकारणासाठी फायदा घेतला जातो आणि ज्यांच्याकडे दयेच्या नजरेने सतत पहिले जाते त्याचाही फायदा घेत...

इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं..!

Image
दुपारचे १२.. . सगळे आपापल्या कामात व्यस्त. कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो हल्ली. आम्ही चहा घेऊन जरा पाय मोकळे करायला पुढे आलो आणि काहीसे स्तंभित करणारे चित्र नजरेस पडले. एक पंचविशीतला तरुण रस्त्याच्या वळणावर एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच; कोपऱ्यात झाडाखाली बसलेला दिसला. त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केलेली.. तिथं तो दिवसभर बसून असतो. राजासारखा.... नव्हे, एखाद्या कलावंतासारखा! त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या चपला, काही किरकोळ सामान. जमिनीवर पडलेला कागदांचा खच, फाटक्या बॅनरचे, पॅम्पलेटचे एकत्र जोडून ठेवलेले कागदी चिटोरे. त्या चिटोऱ्यांवर त्यानं चितारलेली अनाकलनीय चित्रे. बरीच चित्रं त्यानं झाडांच्या फ़ांदीला अडकवलेली . जणू चित्रांचे प्रदर्शन मांडलेले. तो नेमकं काय करतोय याचा अदमास येईना, पण हे काहीतरी वेगळं आहे हे ध्यानात यायला वेळ लागला नाही. तो वेडा असावा . सगळे तसंच सांगत होते..वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले. फाटलेले सुद्धा असतील. त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब-राठ. आंघोळ नसणारच करत कधी. शहाणी माणसं असं थोडीच कर...

२०१६ वर महिलांची मोहोर

Image
चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा, बघता बघता हे वर्षही सरले. दरवर्षी नेमाने येणारा क्षण पुन्हा जवळ आलाय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. सरत्या वर्षात काय गमावले, काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. नव्या वर्षात पदार्पण करताना भूतकाळाची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते. सरते वर्ष अनेक घडामोडींनी भरलेले राहिले अनेक मार्गाने उल्लेखनीय ठरले. कुठे सामाजिक बदलांची नांदी कानी आली तर कुठे भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं वाचनात आलीत. जातीय आरक्षणासाठी पुकारले गेलेले आंदोलन, नोटा बंदीने पिडला गेलेला सामान्य नागरिक, सत्तापक्ष-विरोधी पक्षाचे अटीतटीचे राजकारण आणि त्यात ढवळून निघालेला देश. अश्या अनेक घटनांच्या खुणा गोंदल्या जात असतांना वर्षभर महिलांच्या संबंधित देश-विदेशातून चांगल्या वाईट बातम्यांची धूळही उडत राहिली. कुठे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्न झाले. नेतृत्व गुणांना वाव मिळाला, मोठ्या पदांवर ती आरूढ झाली तर कुठे बलात्कार, अत्याचाराच्या घटनाही गाजत राहिल्या. अश्याच काही मुख्य घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटा प्रयत्न. ...