Posts

Showing posts from July, 2026

सभ्यतेचा मुखवटा आणि सोशल मीडियावरील विद्रूप चेहरे...

Image
  आपण स्वतःला प्रगत, सुशिक्षित आणि आधुनिक समाजाचा भाग समजतो. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि विकासाच्या गप्पा मारतो. पण सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावर, शरीरयष्टीवर, त्वचेच्या रंगावर किंवा तिच्या लैंगिक ओळखीवर होणाऱ्या टिप्पण्या वाचल्या की या सभ्यतेचा मुखवटा किती पातळ आहे, याची जाणीव होते. मतभेद असणे स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीच्या विचारांशी, भूमिकेशी किंवा कृतीशी असहमती व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र असहमती व्यक्त करताना व्यक्तीचा अपमान करणे, तिच्या शरीराची टिंगल करणे किंवा तिच्या अस्तित्वालाच कमी लेखणे ही विकृती आहे. दुर्दैवाने सोशल मीडियाने अशा विकृत विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विशेषतः एलजीबीटी समुदायातील व्यक्तींविषयी अनेकांच्या मनात आजही गैरसमज आणि पूर्वग्रह आहेत. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत जे बसत नाहीत, त्यांना हिणवण्याचा जणू काही परवाना मिळाल्यासारखे अनेक जण वागतात. पण "सामान्य" कोण आणि "असामान्य" कोण, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? एखाद्या व्यक्तीचा पोशाख, तिची ओळख किंवा तिची जीवनशैली हे तिच्या माणूसपणाचे मोज...

कायांतर - तिसऱ्या अस्तित्वाची संघर्षकहाणी !

Image
सुप्रसिद्ध लेखिका रश्मी पदवाड मदनकर यांची ''कायांतर'' ही तृतीयपंथीय नायिकेच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. समाजात अनेकदा जाणीवपूर्वक दुर्लक्षित राहणाऱ्या, दुभंगलेल्या आणि वेदनांनी भरलेल्या अशा एका जीवविश्वाचं तपशीलवार आणि हृदयस्पर्शी चित्रण लेखिकेने चरित्रात्मक कादंबरीच्या आकृतिबंधातून अत्यंत कुशलतेने केलं आहे. मिताक्षरी, संयमी आणि नेमक्या शैलीत त्यांनी हा चौकटीबाहेरचा विषय मोठ्या संवेदनशीलतेने हाताळला आहे. विशेष म्हणजे, अशा नाजूक आणि गुंतागुंतीच्या वास्तवाचं चित्रण करताना बीभत्सता किंवा अश्लीलतेचा स्पर्शही होऊ न देता त्यांनी अनुभवविश्वाचं सशक्त आणि प्रभावी दर्शन घडवलं आहे. त्यामुळे ही कादंबरी केवळ एका व्यक्तीची कथा राहत नाही, तर उपेक्षित अस्तित्वाच्या संघर्षाची आणि आत्मशोधाची व्यापक कहाणी बनते. या संदर्भात ज्योत्स्ना देवधर यांची ''कुँवरनी'' (१९७१) ही कादंबरी आठवते. तसेच विदुषी दुर्गा भागवत यांच्या ''पैस'' (१९८८) या संग्रहातील ''जोगवा'' हा लेखही स्मरणात येतो. तृतीयपंथीयांच्या उपेक्षित, समाजाच्या कडेला फेकल्या गेलेल्या आणि ...

एका जिव्हाळ्याच्या लेखिकेबद्दल…

Image
माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या ‘प्रेमातून प्रेमाकडे’ या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर आधारित पुस्तकात लिहिलेली अर्पणपत्रिका मला खूप भावली होती. त्यात त्या लिहितात.. “मैत्र जे होतं आणि आता नाही त्याला स्मरून आणि जे आहे, असण्याचं आश्वासन आहे त्याचा हात धरून...” बस्स... इतकंच. पण एवढ्याशा तीन-साडेतीन ओळी आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगून जातात. काही माणसं काळाच्या ओघात मागे पडतात, काही नाती विरून जातात; पण त्यांची आठवण मनात कायम राहते. आणि त्याचवेळी, अजूनही सोबत असणाऱ्या, “आहोत” असं शांत ठामपणे सांगणाऱ्या हातांची किंमतही या ओळी शिकवतात. त्यांचं “काळोख आणि पाणी” हे आणखी एक अंतर्मुख करणारं पुस्तक; हे माझ्या अतिशय आवडत्या पुस्तकांपैकी एक. महाभारतातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भावना, त्यांच्या निर्णयांमागचे कारण आणि त्यातून निर्माण झालेल्या अनेक अपरिचित कथा या पुस्तकात अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. “जे महाभारतात नाही ते जगात नाही” असे म्हणतात, त्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. गंगा, भीष्म, गांधारी, कुंती, द्रौपदी अशा अनेक व्यक्तिरेखा नव्या दृष्टीने समोर येतात...