Tuesday, 13 March 2018




काय चक्रावून टाकणारे योगायोग असतात बघा.. काल रात्रभर झोप लागली नाही म्हणून पहाटे 3.30 च्या सुमारास टीव्ही लावून बसले. झी सिनेमावर खुदा गवाह लागला होता... बर्याच वर्षाआधी पाहीलेला हा सिनेमा पाहूया जरावेळ म्हणून तोच लावून बसले. आई आणि मुलगी अश्या दुहेरी भुमिकाही काय खुबीने निभावल्या आहेत श्रीदेवीने हीच्यासारखी अभीनेत्री पुन्हा होणे नाही हा विचार करतच शेवटाला सिनेमा पोचला..काबूलवरून हिंदूस्थानला वेड लागलेल्या श्रीदेवीला आणलं जाईल आणि ती खलनायकांच्या तावडीत सापडेल...तीच्यावर होणारे अत्याचार सकाळी सकाळी बघू नये उगाच मूड जाईल म्हणून तीचा सिनेमातला अब्बूजान- बादशाह खान म्हणजे अमिताभबरोबरचा एक सुंदर सिन तीची प्रगल्भ देखणी छबी डोळ्यात साठवून काहीतरी वेगळे बघायला चानल बदलले ...न्युजचानल लावलं, जनरल बातम्या चालू होत्या.. 5 एक मिनीटातच तीच्या मरणाची बातमी येऊ लागली..आधी धस्सकन झालं.मग वाटलं शक्यच नाही आतातर आपण हीला पाहत होतो. कालच तीचा मुलीबरोबर रॅम्पवर चालताना.. मुलीला दटावताना वायरल झालेला व्हीडीओ पाहण्यात आला होता तेव्हा किती ग्रेसफुल दिसत होती. मुलीपेक्षाही तीचंच आकर्षण अजून कायम होतं...
इंग्लिश-विंग्लिश चित्रपटात इतक्या वर्षांनी ती दिसली तेव्हा काहीतरी खटकलं होतं हे नक्की, पुर्वीचा मिश्किल स्वभाव..हसण्यातली सहाजीकता..पुर्वीचा कॅमेरासमोरचा सहज वावर अर्थात काॅन्फिडन्स, पब्लिकबरोबर एका झटक्यात केमिस्ट्री जमवून आणणारी तीची खट्याळ अदा..टपोर डोळ्यातली चमक जरा लोप पावलेलं दिसलं. पण यासगळ्या पलिकडे ती परत आलीय पडद्यावर दिसतीये यातला आनंद अधीक होता.. तीच्या दिसण्याहून तीच्या अभिनयावर आमचं प्रेम अधिक होतं आणि ही अभिनयाची तीला जन्मतःच मिळालेली देणगी त्याचं नवं रूप पुन्हा तीनं इंग्लिश विंग्लिश मधून आणि नंतर माॅम मधूनही दाखवून दिलंच.
एक आश्चर्यकारक घडलं ते असं की बरेचदा जाणारयाला आपण जाणार असल्याची जाणीव आधीच जरा होत असावी का हा संशोधनाचा विषय आहे पण असे योगायोग घडून आले की तसं वाटायला मात्र लागतं .. श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट तीनं तीच्या आग्रहानं तीचा पहीला चित्रपट रिलीज झाला त्या दिवशीच रिलीज करायला लावला म्हणे, म्हणजे स्टार्ट टू एंडचं एक सर्कल माॅमच्या वेळेला पुर्ण झालं होतं. .. नवं सर्कल तीच्या एखाद्या नव्या वेगळ्या चित्रपटानं सुरू झालं असतं कदाचीत पण ते आता तीच्या मुलीच्या फिल्ममध्ये पदार्पणानं सुरू होणार आहे, पण ते पाहायला आता ती नाही... ती त्या चिंतेतही असल्याचं दिसायचं जाणवायचं. तीनं मुलीची सगळी तयारीही करून घेतली आणि या पिरेड मध्येच 'माॅम' सारख्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आणखी एक मिलाचा दगड रोवून..मुलींसाठी आयुष्यभराची शिकवण आठवणीचा ठेवा पेरून.. स्वतःची विकेट उडवून पुढील सुत्र मुलीच्या हातात सोपवणारी 'माॅम' ठरणं देखील तीच्या नियतीचा भाग असणं हा केवढा सुयोग मानायचा.
या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर, जे जसं अन ज्या क्रमात व्हायला हवं तसंच झालंय 'वेळेत घेतली गेलेली एक्झिट' असं समजून तीला मिळालेली मुक्तीही तेवढ्याच ग्रेसफुली एक्सेप्ट करून तीला सन्मानाने श्रद्धांजली वाहायला हवी.. आमच्या मनात मात्र ती सदैव अमर राहणार आहेच.
श्रीदेवीच्या आत्म्यास सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
रश्मी मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...