Posts

स्त्री-स्वातंत्र्याचा लढा कि तिढा ..

Image
बाई, बुब्स आणि ब्रा' या आशयाची खळबळ माजवून देणारी, चर्चेला ऊत आणणारी आणि नेटकरांसाठी चर्वित चर्वणाला खाद्य पुरवणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिची एक फेसबुक पोस्ट अत्यंत वायरल झाली आणि पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर येऊन उभा राहिला. तिच्या एका व्हिडीओवरून सुरु झालेला हा वाद आता स्त्रीस्वातंत्र्याच्या विषयापर्यंत येऊन चिघळला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. ''स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,'' असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. सोशल मीडिया हा आ...

कशाकशाला पारखे झालोय आपण..?

अक्खी दुनिया, प्रेम, मैत्री नाती सगळं काही फक्त 'विश्वास' या एका गोष्टीवर टिकून आहे. कुणावर तरी पूर्ण विश्वास असणं, विश्वासाची माणसं आपल्या अवतीभवती असणं, आपल्यावर विश्वास ठेवणारी अनेक माणसं आयुष्यात असणं या गोष्टी आनंददायी जगण्यासाठी खूप खूप आवश्यक असतात. विश्वास गमावणं, विश्वासघात होणं .. कुणावर विश्वास ठेवूच न शकणं अश्या गोष्टी घडायला लागल्या तर जगणं किती कठीण होऊन बसेल ह्याची कल्पनाही न केलेली बरी ... सध्या होतंय मात्र असं ..   किती कशाकशाला पारखे होतोय आपण. कोरोना संक्रमण काळानं जगण्यात अनेक बदल घडवून आणले चांगल्या सवयी भिनवल्या पण काही गोष्टी निष्ठुरपणे हिरावूनही घेतल्या... त्यातली महत्वाची गोष्ट हिरावली गेलीय ती म्हणजे विश्वास - स्पर्शातला विश्वास, एकमेकांवरचा विश्वास .. आपल्याच माणसांवरचा विश्वास... अगदी स्वतःवरचाही विश्वास. लाॅकडाऊनमुळे एकमेकांच्या भेटीगाठी बंद झाल्या होत्या.. व्हिडीओ कॉलवर एकमेकांना पाहता येत असले तरी भेटीतली स्पर्शातली जादूच न्यारी असते. मधे माझ्या ५ वर्षाच्या भाचीची खूप आठवण येत होती. तिला भेटावं जवळ घ्यावं लाड करावे वाटत होते, पण मी बाहेर निघून काम...

राधा-अनय

शिरीन कुलकर्णी यांचा एक आवडलेला लेख - ' त्रिधा राधा ' या पु.शि. रेग्यांच्या कवितेने मनावर घातलेली मोहिनी किती वर्षं कायम आहे. राधा-कृष्णाच्या अधिकाधिक तरल आणि सखोल होत जाणाऱ्या नात्याचे पदर अजूनही हळुवारपणे उलगडावेसे वाटणारे ! राधा - कृष्णाची जादू अजूनही भारतीय साहित्यावर पसरून राहिलेली ! अरुणा ढेरे यांची 'अनय ' ही कविता वाचली आणि सवयीच्या वाड्यातले एक अनोळखी दालन एकदम उघडावे, तसे काहीसे वाटले. राधेचा पती 'अनय ' याचे कायमच धूसर राहिलेले चित्र उजळून निघाले आणि स्त्री-पुरुष नातेसंबंधाच्या या अनोख्या दर्शनाने मन चकित आणि हर्षभरित होऊन गेले . राधेला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श जितका उत्कट, तितकीच तीव्र अनयाची तिला समजून घेण्याची क्षमता ! राधा तर नक्षत्रांच्या गावातून अनयाच्या घरात उतरली होती. तिला तो दिव्य निळा स्पर्श लाभलेलाच होता आणि निळेपणाच्या मूर्त रूपावरून आपल्या जिवाची कुरवंडी करण्यासाठीच ती पृथ्वीतलावर अवतरली होती . देवत्वाचे अधिष्ठान म्हणजे आभाळ असे जर म्हटले, तर कृष्णाचा रंग आभाळासारखा मेघश्याम असणेही ही स्वाभाविकच आणि नक्षत्रांच्या गावातून उतरलेल्या राधेच...

#विविध_भारती

~~~~~~~~~ #विविध_भारती देश की सुरीली धड़कन कहीं जाने वाली भारत का मात्र एक ऐसा चैनल विविध भारती भारत में सर्वाधिक क्षेत्र के आकाशवाणी की एक प्रमुख प्रसारण सेवा है भारत में रेडियो के श्रोताओं के बीच सर्वाधिक सुनी जाने वाली पहला रेडियो चैनल विविध भारती है !! इसकी शुरुआत 3 अक्टूबर 1957 में हुई थी इसके केवल दो केंद्र हैं प्रथम मुंबई दूजा मद्रास प्रसारण दो केंद्रों से दिया जाता था जैसे-जैसे लोकप्रियता बढ़ती गई वैसे वैसे हिंदुस्तान के हर शहर में इसकी ध्वनि सुनाई देने लगी हिंदुस्तान में इतना लोकप्रिय और कोई चैनल नहीं विविध भारती की जब शुरुआत हुई थी और कोई चैनल नहीं था #विविध_भारती_की_विशेषताएं विविध भारती की खास विशेषताएं हिंदी गाने नाटक विज्ञापन ज्ञान स्पोर्ट रेसिपी आदि #लोकप्रिय सबसे ज्यादा लोकप्रिय बिनाका गीतमाला जिसकी प्रस्तुति आवाज के जादूगर #अमीन_सयानी करते थे भाइयों और बहनों इनका खास डायलॉग था इसके बाद सबसे खूबसूरत अल्फाज कहे जाने वाले #यूनुस_खान भी पीछे नहीं #मनोज #छिब्बर #शैलजा #सिंह #शाइस्ता #नाआज #ममतासिंह #कमलशर्मा #रेनू #बंसल #राजेंद्र #त्रिपाठी #शहनाज #अख्तर #अम...

प्रगल्भ जाणिवांचा अविष्कारी संग्रह 'उन्हात घर माझे'

Image
नितीन भट यांना मी प्रत्यक्ष व्यासपिठावरून ऐकलंय. त्यांच्या गझलांतील आशय अर्थात गझलियत, त्यातील अंतर्भाव आणि त्यांचे आकर्षक सादरीकरण सगळंच प्रगल्भ जाणिवांतून अवगत झालेले असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. एकाच माध्यमांचे प्रवासी असल्याने पुढे वाढत गेलेल्या ओळखीतून त्यांचे संवेदनशील असलेले माणुसपण देखील पुढ्यात येत राहीले. अश्या जाणून असलेल्या कवीमित्राचा अत्यंत देखणा आणि वाचनीय असा 'उन्हात घर माझे' नावाचा गझल-कविता संग्रह हातात आला तेव्हा आनंद होणं सहाजीकच होतं. पुस्तकाचे ओढ लावणारे आकर्षक शिर्षक, साधेच पण देखणे मुखपृष्ठ, त्यावर लिहिलेली कोरीव सुंदर शब्दरचना आणि कवीची आत्ममग्न छबी. बघताक्षणीच एक सुंदर वाचनमेजवानी आपल्याला मिळणार आहे हे लक्षात आले. हातात आॅलरेडी दोन पुस्तकं वाचायची असल्याने 'उन्हात घर माझे' वाचायला जरा उशीर झाला पण वाचायला हातात घेतला तेव्हा अधाशासारखे एका बैठकीत वाचून काढला. त्यानंतर आजारपण आल्यानं लिहायचं मात्र राहीलंच, पण हा संग्रह स्वस्थ बसू देत नव्हता यावर लिहायचंय ही अस्वस्थता सतत छळत राहीली.   पुस्तकातल्या लक्ष वेधून घेणाऱ्या बाबी म्हणजे पुस्तक...

लाॅक-अनलाॅक

Image
दारं खिडक्या पक्क्या बंद केलेल्या खोलीत किंवा खूप गर्दी असणाऱ्या ठिकाणी एक मिनिटही राहता न येणं, जीव गुदमरणं हा एक प्रकारचा फोबीया आहे. क्लाॅस्ट्रोफोबीया (Claustrophobia) असं त्यांचं नाव आहे. माझ्या आईला ही समस्या असल्याचे आम्हाला लहानपणापासून माहीत आहे. तिच्या लहानपणी एकदा कोणीतरी गमतीने तिला बाथरूममध्ये लाॅक केले होते आणि त्याच अवस्थेत अनेक तास अडकल्यानं नंतर तिला हे विचित्र भीती वाटायचं प्रकरण सुरू झालं. ती claustrophobic असं कळलं. घरात सगळे दारं खिडक्या बंद असणं किंवा बंद एसी कारमधून प्रवास केल्यानं तिचा श्र्वास कोंडल्यासारखा होतो. ती आमच्यासोबत कोणत्याही थिएटरलादेखील सिनेमा पाहायला येऊ शकत नाही. एकदोनदा आम्ही प्रयत्न केला पण अर्ध्या तासातच तिचा जीव गुदमरू लागल्याने आम्हाला चित्रपट अर्धवट सोडून निघून यावं लागलं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेले अनेक दिवस आम्ही राहतोय त्या एरीयात घराच्या चारही बाजूंनी कोरोना पेशंट वाढलेले, भारतीय म्हणून आपल्या जगण्यात मुरलेल्या सार्वजनिक, सांस्कृतिक नियमांनुसार अजूनही आम्हाला विलगीकरणाचं महत्त्व न समजल्याने, पटत नसल्याने किंवा शेजारी पॉझिटीव्ह पेशंट...

हृदयाचे पुस्तक

 *पादाकुलक वृत्त* कधी वाटते या ह्रदयाचे  हळवे कोरे पुस्तक व्हावे त्याने अलगद सारे काही  पुढ्यात डोळ्यांच्या ठेवावे चुरगाळल्या जुन्या क्षणांचे पान पुन्हा पालटता यावे घडी पाडल्या पानांना मग सावकाश मी सरळ करावे भिजल्या ओल्या शब्दांवरती हळुच कवडसा सोडुन द्यावा गर्द जांभळ्या शब्दांनाही नवस्वप्नांचा रंग चढावा !  कडक बोचऱ्या शब्दांना मी तळहातावर उचलुन घ्यावे,  स्पर्श कोवळा देउन त्यांना  मायेने रेशमी करावे ! आनंदाचे गंध हवेसे  पानांवर अलगद शिंपावे  आयुष्याचे हळवे पुस्तक  सृजनाने गंधाळुन जावे … !!! ©रश्मी पदवाड मदनकर