Posts

Image
काही माणसांना कामे न करण्यासाठी जसे हजार बहाणे ज्ञात असतात आणि ते त्याचा खुबीने उपयोग करून घेतात; तसेच अनेकांना परिस्थिती प्रतिकूल असतानाही कामे शोधून काढून ती करण्यासाठी हजारो कारणे हजारो पर्याय माहिती असतात. असे असणारे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता कष्ट करत, त्यातून ज्ञानवर्धन करत अनुभवसंपन्न होत पुढे जाणारी माणसे भेटली की फार बरं वाटतं. काम न करणाऱ्यासाठी कामचं सापडत नाहीत आणि काम करणाऱ्यासाठी कामाची वानवा नसते. आमच्या ऑफिसला एक सिनिअर आहेत, त्यांच्या उच्चभ्रू एरियात पहाटे पहाटे एक मुलगा येतो कामाला, त्याच्याकडे त्या एकाच मोहोल्ल्यातली ७-८ घरे आहेत. त्याचं काम त्यांच्या घरातील कुत्र्यांना सकाळी फिरवून आणण्याचं आहे. एका कुत्र्याला फिरवून आणायला १५ मिनिटे लागतात, या हिशोबाने २ तासात तो एका मोहोल्ल्यातले काम संपवतो. पगार आहे प्रत्येकी २००० रुपये महिना. रोजच्या दोन तासांच्या कामात तो १५००० रुपये महिना कमावतो. त्यानंतरच्या वेळेत तो कदाचित दुसऱ्या मोहोल्ल्यात हेच काम करत असावा किंवा दुसरी कामे. असाच आमच्या इमारतीत एक मुलगा येतो. त्याची ना कुठली कंपनी आहे ना कुठला ब्रँड. वन मॅन कंपनी. ...

माझी शाळा

Image
  शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ...

वेड्या माणसांच्या गोष्टी -

Image
  वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत...
रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वातावरणात पसरलेले धुके, हवेत पसरलेला गारवा आणि मनात भरून उरलेला आजवरच्या डिसेंबर आठवणींचा मंद मंद गंध. ''जाडो कि नरम धूप और आंगण में लेटकर....'' वगैरे आठवाचे दिवस. यंदाचे वर्ष मात्र अशा स्वप्नील वातावरणाचे नाही. यंदा ऐन थंडीत थरथरत्या हाताने अग्नी द्यावी लागलेल्या सासऱ्यांच्या स्मृतींचे तर ऐन डिसेंबरमध्ये अचानक झटकन निघून गेलेल्या दोन जिवापासच्या मैत्रिणीना आक्रंदत हाक मारत जाणाऱ्या क्षणाक्षणाच्या हिशोबाचे. गेल्या महिन्याच्या शेवटाला दीर्घ आजारपणाने सासरे सोडून गेले. मागे सोडून गेले भरलेपुरले कुटुंब आणि अनेक छोट्याछोट्या गोष्टी. त्यांची पुस्तके, वेगवेगळ्या रंगाच्या पेनांचे सेट, दैनिक हिशोब लिहिण्याची सवय असल्याने हिशोबाच्या भरलेल्या अगणित डायऱ्या.. त्यांचा पंचा, काही रुमाल, त्यांचे हौसेने शिवलेले सूट आणि पैसे ठेवायची पर्सपेक्षा जराशी मोठी अशी बॅग. सासुआई गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या आठवणीसाठी आम्ही सगळ्या घरातल्या स्त्रियांनी त्यांची ए...

मनातले काही

Image
सासरे जाऊन अर्धा महिना उलटला. खरतर ते गेले हे स्वीकारायला आणि आता ते कधीच दिसणार नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयारच नाही. समस्त कुटुंबाचा आधारवड होते ते. आमच्या कुटुंबातील जुन्या खोडांपैकी हे शेवटचे खोड होते. सासऱ्यांचे सगळे भाऊ, सासूआईंचे सगळे भाऊ याआधीच गेलेत, माझे व माझ्या जाऊचे वडीलही आधीच गेलेत आणि माझ्या नंदांचे सासरेही गेलेत. या सगळ्या घरादारातल्या स्त्रिया मात्र अजून खमक्या आहेत; नातवंडांच्या पतवंडांचा वाढीव संसार सांभाळत जगत आहेत. चाळीशीपार मध्यवयात पोचलेल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एकेक करत निघून जाते आहे; एक पिढी आता संपते आहे. दुसर् ‍ यांसाठी जगत स्वत:चे जीवन संपवणारी पिढी, मान मर्यादा वडीलकीची आब राखणारी, कमी पैशातही तडजोड करून, तरीही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, सोबत घेऊन चालणारी पिढी आता संपते आहे. ते होते.. आहेत तोपर्यंत आपण अजूनही लहान असण्याचे आतून येणारे फीलिंग कायम आहे.. ही डोक्यावर हात ठेवून असणारी माणसे जसजशी जाऊ लागतात तसतशी ही फीलिंग मंदावत जाणार. जबाबदारीची जाणीव वाढत जाणार आणि हळूहळू आपल्याला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे; हे विधिलिखित टळणारे नाही.. पण...

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले. इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला   चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला. मी म्हणाले, अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती बाग बघा कशी ओकीबोकी झाली परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली दादा म्हणाले ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका..   तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे... तशी माझी नजर पारखी आहे बरे निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे हिऱ्यांना पेहेलू   पाडल्याशिवाय चमक येते होय? आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ??   वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो..   आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो. काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते उभे राहून झाड थकले...

चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -

Image
  खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे. या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे. गिफ्ट म्हणजे त...