खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे.
या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.
असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे.
गिफ्ट म्हणजे त्यात बायकोला आवडण्यासारखे खरतर काहीही नव्हते.. मात्र पॅडीच्या डोक्यात भविष्यासाठी काही वेगळ्या योजना होत्या. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला खरतर दोन काँक्रीटच्या खांबांवर उभारलेला तुटका-फुटका फोर्ड म्हणजे हिज मॅजेस्टीज फोर्ड (HMF) एक रफ टॉवर होते जे टेम्सचे रक्षण करणारी चौकी म्हणून कार्यरत होती. ५ टॉवरपैकी हाही एक टॉवर होता. हे दोन पोकळ काँक्रिट टॉवर्सच्या वर समुद्रापासून सुमारे 60 फूट उंचीवर असलेल्या दोन टेनिस कोर्टच्या आकाराचे होते. त्यावेळी यावर शंभरहून अधिक ब्रिटिश सैनिक संपूर्ण शस्त्रांसह तैनात असत.
1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात, जर्मनच्या पराभवानंतर ब्रिटिश आर्मीने हा किल्ला सोडला आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांना ह्याचा विसर पडला. हीच संधी साधून पदी रॉयने त्यावर स्वतःचा दावा ठोकला. मुळात रॉय बेट्स हा एक कर्मठ माणूस होता ज्याने प्रथम स्पॅनिश गृहयुद्धात आणि नंतर WWII दरम्यान उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि इटलीमध्ये 15 वर्षांचा असल्यापासून लष्कर सेवा केली होती. तो कुठल्याही संकटांना घाबरत नसे. उलट रॉय बेट्सला नोकरशहांनी काय करावे हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तो जिद्दीला पेटला आणि न घाबरता त्याने या किल्ल्यावर मालकीचा दावा ठोकला पुढेही सरकारच्या इशाऱ्यांकडे धमक्यांकडे दुर्लक्ष करत तो त्याच्या या छोट्याश्या देशासाठी काम करीत राहिला आणि परिणामी सीलँडची प्रतिष्ठा जगभरात वाढत गेली.
या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका रेडिओ स्टेशनच्या अधिकारशाहीने आणि ती मोडून काढण्याच्या पॅडीच्या जिद्दीमुळे. त्या वेळी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) हे एकमेव कायदेशीर रेडिओ स्टेशन होते आणि रॉयल चार्टरमुळे लोक काय ऐकू शकतात आणि काय ऐकू शकत नाहीत यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. त्यांना आव्हान देत बेट्सने या रिकाम्या पडलेल्या, पडीक किल्ल्यावर त्याचे पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केले, लोकांना आवडेल ते संगीत ऐकता याय्ला पाहिजे एवढाच त्याचा हेतू होता. मात्र सरकारने त्याच्या कामात अडथळे आणून त्याचे रेडिओ स्टेशन इतरांपर्यंत पोचू नये अशी सोया केली. त्यानंतर बेट्स ती जागा सोडून निघून जाईल असे ब्रिटिशांना वाटले. मात्र झाले काहीतरी वेगळेच. पॅडीने त्या किल्ल्यावरच स्वतंत्र देशाचा दावा ठोकला.
असे म्हटले जाते की एका रात्री मित्रांसोबत आणि पत्नीसोबत गप्पा मारत असताना बेट्सने निश्चय केला आणि 2 सप्टेंबर 1967 रोजी किल्ल्याला “प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड” असे नाव दिले. तो त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. काही काळानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर या जगातल्या सर्वात लहान देशात राहायला गेले
सफोकच्या किनाऱ्यापासून अवघ्या सात मैलांवर, सागरात असलेल्या या अपरिचित सार्वभौमत्वाच्या स्थापनेने यूके सरकारचे लक्ष वेधून घेतले. देशभर खळबळ माजली. ब्रिटीश पुढारी अधिकारी या घटनेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी सीलँडचे वर्णन "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेट म्हणून मान्यता नसलेल्या संरचनेवर बेकायदेशीर कब्जा" असे केले..आणि त्यांनी उर्वरित चार चौक्या उद्धवस्त केल्या जेणेकरून पुन्हा कोणी असा दावा ठोकू नये. दुसरीकडे, बेट्स सर्व संकटांना सामना करायला तयार आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम होते की सीलँड हा त्याचा स्वतःचा देश आहे तो त्यांनी संघर्षाने जिंकला आहे आणि तो त्याचा योग्य नेता आहे.
1978 मध्ये, अलेक्झांडर गॉटफ्रीड अचेनबॅच नावाच्या एका पश्चिम जर्मन व्यावसायिकाने स्वत: ला सीलँडचे "पंतप्रधान" घोषित केले आणि सत्तापालट केला.
कौटुंबिक आणीबाणीचा सामना टाळण्यासाठी बेट्सने कुटुंबासह सीलँड सोडले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत, अचेनबॅच आणि काही जर्मन आणि डच भाडोत्रींनी हा किल्ला म्हणजे नवा देश ताब्यात घेतला.
त्यांनी बेट्सचा मुलगा प्रिन्स मायकेलला ओलीस ठेवले आणि त्याला चार दिवस कोंडून ठेवले. बेट्सने त्वरीत राज्य परत घेण्यासाठी माणसांना एकत्र आणलं. एक संघ तयार केला. युद्धदरम्यान अचेनबॅचच्या गटातील बरेच लोक पळून गेले, परंतु बेट्सने अचेनबॅचला ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा यूकेच्या राजदूताने बेट्सशी वाटाघाटी केली तेव्हा कुठे त्याने शेवटी अचेनबॅकची सुटका केली.
1980 च्या दशकात, ब्रिटीश सरकारने सीलँडच्या दाव्यांची कोणतीही वैधता काढून टाकण्यासाठी आपल्या प्रादेशिक अधिकारांचा विस्तार केला. तरीसुद्धा, बेट्सने सीलँड हा स्वतंत्र देश असल्याचे ठामपणे सांगत असून राहिला. सीलँडचे चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प जारी करणे ही प्रक्रिया त्याने अधिक प्रखर केली. स्वतःचा ध्वज देखील त्याने तयार केला. दुर्दैवाने, 1990 च्या दशकात, लोकांनी काही गुन्हेगारी क्रियाकलापांसाठी वापरल्यामुळे सीलँडला त्याचे पासपोर्ट मात्र रद्द करावे लागले.
2006 मध्ये प्लॅटफॉर्मवर विध्वंसक आग लागली आणि मुख्य पॉवर जनरेटरचा नाश झाला, अनेकदा अनेक संकटं आलीत. सीलँडवर यूके सरकारकडून भाडोत्री आक्रमण आणि सतत धमक्या आल्या, परंतु ते ठाम राहिले, ही लोकं डगमगली नाहीत. सीलँड आजही तेथे आहे आणि मायकेल बेट्स आणि त्यांचे कुटुंब सीलँडच्या कल्याणात गुंतलेले आहेत आणि ते स्वतंत्र देश म्हणून चालवतात. त्यांनी प्लॅटफॉर्मवर पूर्णवेळ सुरक्षा देखील स्थापित केली आहे.
या स्वतंत्र रियासतची वेबसाइट देखील आहे आणि खर्चाला मदत करण्यासाठी नाणी, पॅचेस आणि टी-शर्ट यांसारखी स्मृतिचिन्हे ते विकतात. आश्चर्यकारकपणे, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा लहान संरचनेने 50 वर्षांहून अधिक काळ त्याचे सार्वभौमत्व टिकवून ठेवले आहे हे आश्चर्य आहे.
दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा रक्षक किल्ला म्हणून सुरू झालेला एक पडीक टॉवर पुढे एक कौटुंबिक प्रकल्प आणि त्याही पुढे जाऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनला. खडतर भूतकाळ असूनही, सीलँड कधीच डगमगला नाही. तो देश अजूनही सुरूच आहे आणि जगभरातील सर्वात लहान देश म्हणून अनौपचारिकरित्या का होईना तो ओळखला जातो; आणि आजही ह्या देशाचा रोमांचक इतिहास जगभरातल्या लोकांना आकर्षित करीत राहतो..
No comments:
Post a Comment