Posts

सोन्यासारखा जीव !!

भर दुपारची वेळ..अंगाची काहिली उन्ह मी म्हणतांना , .पाणी पाणी जीव होतांना  काळवंडलेली-कृश पारो...  कळकट मळकट परकर पोलकं, डोईवर भोकं पडलेली ठिगळ लागलेली ओढणी. पाठीवर घर घेऊन बिन चपलेची डांबरी काळ्या तापलेल्या रस्त्यावरून फिरतांना खपाटीला लागलेल्या पोटाच्या खाचेतल्या विरलेल्या झोळीत गाढ झोपलेलं पिटुकलं बाळ घेऊन दुकानाच्या दारादारात  पसरलेल्या मातीत चुंबकाच्या साहाय्याने कण कण शोधणारी.... हातातल्या चुंबकाला वाया गेलेले सोन्याचे काही कण लागतील म्हणून सोनाराच्या दुकानासमोरून माती चिवडणाऱ्या पारोला कोण सांगेल झोळीतला चिमुकला सोन्यासारखा लेकरू नकळत चिवडला जातोय ... कणाकणाने माती होऊन वाया जातोय ते.

आमच्या संवेदना न मरो ...

Image
नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्तेक ठिकाणी लहान मुले भिक मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले केस, जखमा जखमा झालेले अंग..वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग त्यापलीकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून आले कुठे गेले ह्याचा कुणाला थांग पत्ता नसतो. त्यातील बरीच मुले हि माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भिक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा परराज्यातून पळवून आणलेली, स्वतः पळून आलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन काही करणार आहे का?? कि रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही? कित्तेक आई-बाबा याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत.. पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना ..  https://www.facebook.com/rashmi.madankar/posts/1618222901531916?pnref=story # बच्चेबचाओ # Save...

#बच्चेबचाओ #SaveChildBeggars

# बच्चेबचाओ # SaveChildBeggars गेल्या १०-१२ दिवसांपासून फेसबुक अकाउंट डिऍक्टिव्हेट केले होते... त्या दिवशी अस्वस्थ होऊन ज्या कारणाने गेले आज त्याच कारणाने परत आले. एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणार काहीतरी नजरेत पडतं आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं....बाराएक दिवसाआधीची गोष्ट असेल रोज ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठ 'मुख्य' पोलीस स्टेशनही आहे. ७ वर्षाच्या मुलीचा खांद्यापासून ढोपरापर्यंत पूर्ण कट झालेला हात दाखवत पंधराएक वर्षाचा मुलगा पुढे आला, हिला औषधाला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती दहा-वीसची एक नोट त्या पोराच्या हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर येत राहिला. काय झालं असेल.. का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच रंगत राहिले. पण झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी पुन्हा ६ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेल...

बाप

#बाप गेला कि मुलांना बाप खूप खूप आठवू लागतो .. तो खरा बापमाणूस असेल तर आठवतोच ... पण आयुष्यभर स्वतःच्याच विश्वात जगलेला बाप असला कि जास्तच आठवतो. बापानं आयुष्यभर न देऊ केलेलं प्रेम बालपणात बापानं घ्यावयाची.. न घेतलेली काळजी गरजेच्या वेळी भासलेली बापाची उणीव संकटात न मिळालेला बापाचा सहारा  ... एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि बाप म्हणून डोक्यावर कधीच न ठेवलेला हात बाप गेला कि हे अधिकच गडद होत जातं...खूप आठवतो न मिळालेला हक्काचा बाप प्रेम आधार सगळं बाहेर शोधता येतं..  ..बाहेर मिळत नाही तो ..'बाप' बापाला ऑप्शन नसतं... बाप असला तरी आणि गेला तरी बाप मिळत नाही दुसरा. अख्या जन्मात बापाचं प्रेम न मिळणं आयुष्यभऱ्याचं मोठं दुःख होऊन बसतं बाप गेल्यावर ते अधिकच सलत राहतं....जन्मभर बाप्पांनो आपल्या विश्वात हरवू नका ... मुलांचा बाप हिरावू नका मुलांना वेळ द्या, प्रेम द्या.... त्यांना त्यांच्या हक्काचा बाप द्या. #बाबांचीआठवण :(

कथांची व्यथा..

तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघता येत नाही  आणि अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा मांडताही येत नाही मनात खूप दाटल्याहेत तुला सांगावयाच्या गोष्टी कोंबल्या गेल्या आहेत..काचताहेत न बोलताच गिळून टाकलेले किती हुंदके .. कित्तेक शब्द पचतही नाही आणि ओकवतही नाही. अडकले आहेत मनात-बुद्धीत, घश्यातही आत आत चर्वण करीत राहिले ... तरी त्यांना कंठ फुटत नाही अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही आपणच जन्म घातलेले त्या कथेतले काही पात्र त्या पात्रांना स्वप्नांचे क्षितिज दाखवून आपणच वाढीस लावले होते त्यांना पंख फुटाण्याआत तू भिरकावून लावलेस अन निघून गेलास ते भटकताहेत अनवाणी - तडफडताहेत तुझ्या येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय त्यांचा त्यांना मुक्ती हवीय रे ... कसं सांगू त्यांचे हाल आताशा बघवत नाही अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही आता मलाही वाटू लागलंय तू यावंसंच एकदा ... फक्त एकदा ये अन स्पर्शाने पुनर्जीवित कर त्यां स्वप्नांना स्वप्नातील विरक्त पात्रांना अन तृप्ततेचा श्वास देऊन पुन्हा समाधानाने मरणाला मार्ग मोकळा करून दे ये अन मोक्ष मिळवून दे त्यांना ...

अंतर

मागे गेलेल्या काळाच्या कुठल्याश्या त्या क्षणी एकाच जागी उभे असूनही वाढत गेले अंतर तुझ्या माझ्यातले कुठल्याश्या एका नात्याने जुळले असूनही पायापासून जमिनीवर पसरत गेलेल्या लांबच लांब होत जाणाऱ्या सावल्यांसारखे लांब होत राहिलो आपण .. वेगवेगळे होत गेलो .. सोबतीने चालत असूनही सोबत नसणारे दोन वेगवेगळ्या समांतर मार्गाने पुढे चालत राहायचं आलेला दिवस ढकलायचा नाते जपतोय कि ओढतोय आपण .. कुठला क्षण होता तो दोघांच्या मध्ये लांब आडवी रेष ओढणारा रेषेइतकेही अंतर निर्माण व्हावे अशी परिस्थिती निर्माण व्हावी हे प्राक्तन का यावे तुला नाही वाटत का खंत कशाचीच ती रेष पुसायलाही किती लांबचा प्रवास करत मागे चालत जायला लागणार आहे हातातला सुटलेला हात धरायला परतीच्या रस्त्यावरही सोबत चालायला लागणार आहे दोघांचीही तयारी हवी पार केलेला प्रवास सोडून द्यायची प्रवास महत्वाचा कि साथ हे दोघांच्याही बाबतीत सारखेही असायला हवे साथ महत्वाची असेल तरच आलो त्या रस्त्याने पुन्हा सोसवत निघण्याची तयारी करता येईल हे सगळं करत आलोच त्या मध्याला तर ... ? सोडला होतास हातातून हात तो क्षण खोडून टाकता येईल का रे पुन्ह...

उदात्तीकरण भाग - २ - सोशल मीडिया आणि असहिष्णुता

Image
का ही दिवसांआधी सोशल नेटवर्किंग वरून फिरणारी एक व्हिडीओक्लिप घरोघरी दारोदारी चर्चेचा विषय ठरली होती. ''अभ्यास घेतांना शुल्लक प्रश्नासाठी मारणारी आई'' ( ती आईच होती का? असा प्रश्न विचारू नये ते गृहीतच  धरायचं आहे ).....तर, फार फार बिचाऱ्या मुलाला ( मूल बिचारं होतं का? :O  अहो काय विचारताय .. हा काय प्रश्न झाला होय ? मूल बिचारच असतं...सरळमार्गी, आईचं सगळं सगळं ऐकणारं, अजिबात बदमाशी न करणारं, खोड्या-बिड्या नावालाही न करणारं अन अजिबात जराही शिक्षा करण्यास पात्र नसलेलं असंच मूल ते होतं असंच गृहीत धरायचंच आहे) मारणारी  हि आई फार फार 'क्रूर' होती ( दोन चापट्यात हे कसं कळालं हे विचारूच नये .. ते पण गृहीत धरायचंच आहे)   तर अश्या बिचाऱ्या मुलाच्या क्रूर आईची कहाणी शिव्यांच्या वाखोलीत गावभर-शहरभर-जगभर पसरली. .. त्या आईचा थाटात शालजोडतला उदो उदो झाला सगळीकडे...त्या एकट्या बिचाऱ्या लेकरासाठी कित्तिजन कळवळले वगैरे ... आणि मला काय काय आठवलं म्हणून सांगू ( हो हो मी पण पाषाणहृदयीच आहे ... हळहळ व्यक्त नाही केली म्हणून ना .. बरं... मानलं ) तर प्रथम कोण आठवली सांगू ... . श्य...