#बाप गेला कि मुलांना बाप खूप खूप आठवू लागतो ..
तो खरा बापमाणूस असेल तर आठवतोच ... पण
आयुष्यभर स्वतःच्याच विश्वात जगलेला बाप असला कि जास्तच आठवतो.
बापानं आयुष्यभर न देऊ केलेलं प्रेम
बालपणात बापानं घ्यावयाची.. न घेतलेली काळजी
गरजेच्या वेळी भासलेली बापाची उणीव
संकटात न मिळालेला बापाचा सहारा ...
एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ
आणि बाप म्हणून डोक्यावर कधीच न ठेवलेला हात
बाप गेला कि हे अधिकच गडद होत जातं...खूप आठवतो न मिळालेला हक्काचा बाप
प्रेम आधार सगळं बाहेर शोधता येतं.. ..बाहेर मिळत नाही तो ..'बाप'
बापाला ऑप्शन नसतं... बाप असला तरी आणि गेला तरी बाप मिळत नाही दुसरा.
अख्या जन्मात बापाचं प्रेम न मिळणं आयुष्यभऱ्याचं मोठं दुःख होऊन बसतं
बाप गेल्यावर ते अधिकच सलत राहतं....जन्मभर
बाप्पांनो आपल्या विश्वात हरवू नका ... मुलांचा बाप हिरावू नका
मुलांना वेळ द्या, प्रेम द्या.... त्यांना त्यांच्या हक्काचा बाप द्या.
#बाबांचीआठवण :(
No comments:
Post a Comment