Posts

जाणिवांची रात्र !

आसमंतभर पसरून वाट बघत राहिली, दमली अन अखेर कलली संध्याकाळ दिवसभर मनभर साठलेली उन्हं उतरणीला तळमळत राहिली पश्चिमेला फुटलेल्या तांबड्यात न्हाऊन निघण्याची इच्छा विरली काळोखात दिवेलागणीला तेवत राहण्याचे स्वप्नही भंगत गेले संध्यासमयी. अन अंधारून आले सारे ... दिन दिन रात्र रात्र पालटत राहिले  पुढे चंद्रही कले कलेने आवस होत गेला  नेणिवेचा एक कोपरा उजळावा म्हणून जाणीव झाली अन् कित्तेक भावनांची अशीच रात्र होत गेली ?? रश्मी मदनकर
निरंतर वाचन सुरू असतं..मिळेल तिथे मिळेल तसं, दिवसभरात कितीतरी विषय वाचनात येतात..एखादा प्रगल्भ विषय भावनिक स्पंदनं निर्माण करतो. एखादा संवेदनशील लेख अंतर्बाह्य हलवून जातो. एखाद वाक्यातली कोटीही विचार करायला भाग पाडते... एखादी कथा अंतर्मुख करते. एखादी कविता घोळत राहते मनात. त्यातून अनेक विषय सुचत जातात..आतल्या आत वैचारिक आंदोलनं..लाटांवर लाटा..आवर्तनं.. एकावर एक गाळ साचतो, अख्खा लेख तयार होतो..आतल्या आतच घुसमटत राहतो.. .. काठाशी येतो..बाहेर पडायला तडफडत राहतो...तगमग तळमळ !!!!! वेळ हवा असतो एकांत हवा असतो..उतरवून टाकायचं असतं सारं शब्दात, मोकळं व्हायचं असतं...नाही जमत...दिवसभरात धावधाव धावून दमून भागून शिणलो कि लेखणीशीच हक्कानं प्रतारणा करता येते. लेखणी रूसत नाही ...लेखणी समजून घेते. विचार मात्र हटखोर असतात. आपण हात टेकले की सुचलेले विचार मान टाकतात... मग पुन्हा नवा दिवस उगवतो, नवे वाचन सुरू होते.... नवे मनाचे मांडे मांडले जातात .. पुन्हा खेळ सुरु होतो. काही विषय काही विचार लिखाण होण्याआधीच असे संपुष्टात येतात...कत्तल होतात...गाडले जातात. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक मिथ' आहेय .....

पत्र - १ - आतल्या मास्तरीण बाई

Image
जीवाचा आकांत होतो कधी कधी. नेमकं काय हवंय आपल्याला हेच कळत नाही. सगळं असूनही अस्वस्थता पिच्छा का सोडत नसेल बरं ? प्रश्न आलाच होता डोक्यात कि आतल्या मास्तरीण बाई येऊन ठाकल्या. अलगद हसल्या अन बसल्याच सांगायला, म्हणाल्या  : मने.. प्रश्न जगायचं कसं हा असतो आणि आपण अगदी जन्म झाल्यापासून जिवंत कसं राहायचं हेच शिकत असतो. जगायचं कसं हे शिकलोच नाही तर जिवंत राहण्याला अर्थच काय ?? नुसतच तगत राहायचं ..मरण ढकलत राहायचं पुढे पुढे? ... कि मग समरसून जगायचं मरण येईपर्यंत न धास्तावला न थांबता ... आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात ... अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही आपल्याला नेमकं काय आवडतं, काय आवडत नाही, काय केलं कि आनंद मिळतो हे आधीच स्पष्ट कळलं तर सगळं कसं निवडून घेता येईल ना गं? खर सांगू ते कळतही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाला फार फार काय लागतं? पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं ग कसंही,कुठ...

पत्र - 2 - आतल्या मास्तरीण बाई

Image
आज सहज मोकळीक मिळाली म्हणून माझ्या आवडत्या खिडकीत येऊन बसले..खुश होते पण एकांत हवा होता, तंद्री लागली. चिंतन करता करता अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरु झाली आणि माझ्याच प्रश्नांच्या गुंत्यात मी गुंतत गेले..थोडी असहज होऊ लागले. अस्वस्थता वाढली. असे व्हावे आणि आतल्या मास्तरीण बाई अवतरणार नाही असे होणे नव्हतेच..त्या आल्या अन न लिहिलेले एक पत्र माझ्या हातात ठेवले. **************************************** ए वेडे, एखादा काळ मधून मधून येत असतो आयुष्यात जेव्हा गोतावळा नकोसा होतो. स्व-सहवास आवडायला लागतो. काही गुंते, काही बोचके असतात साठलेले त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ द्यावा असं जाणवायला लागतं. मग आपण सारं या ओढून घेतलेल्या एकांतात उकलून पुढ्यात मांडून बसतो. कधी कधी या गाठोड्यातून किती प्रश्न बाहेर पडतात ना? कधीचे, कुठले-कुठले पत्ता नसतो. गाठोड्यातून पुढ्यात आणि पुढून मनात आलेले हे प्रश्न कुणा कुणाला विचारावे असं वाटत राहतं. पण फक्त विचारावं वाटतं, म्हणजे मला असे प्रश्न पडतात, पडू शकतात ही अशी माहिती म्हणून पुढल्याला द्यावी वाटते. प्रश्नांना अपेक्षित अशी उत्तर नकोच असतात. ...
(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) कथा हा एक प्रवास असतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा. मधल्या काळात जे घडते ते कथानक असते. प्रत्येक लेखकाची लेखनशैली वेगळी असते, असावी. कथेची मांडणी कशी करावी, कशी असावी? या बद्धल रूढ नियम नाहित. कथा सहजगत्या उलगडत गेली तर ती वाचकांपर्यंत लवकर पोहचते. काही कथा वेगळ्या धाटणीच्या असतात, त्या पहिल्या वाचनात लवकर कळत नाहीत. त्यामधील ओळीमागचं, न लिहलेलंही समजून घ्यावं लागतं, काही जागा वाचकांसाठी सोडायच्या असतात. वाचकांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यात रंग भरता येतात. एकच कथा अनेक वाचकांना वेगवेगळी अनुभूती देत असते. आकाशातल्या ढगांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसतात, तसंच हे. कथा लेखन हे उस्फुर्त अंत:प्रवाही असावे. शब्दांचा कच्चा माल घेवून कथेची इमारत जरूर उभी राहू  शकते पण ती साहित्यकृती होवू शकत नाही. इकडची वीट तिकडे, तिकडचा दगड इकडे करून कथेचा तोल सावरला जाईलही पण ते शब्दांचे बांधकामच ! एका तंद्रीत कविता सुचते. एका तल्लीनतेत चित्रकार रेषांचे फटकारे मारत चित्राला जिवंत करत असतो. समाधी अवस्थेत जावून मुर्तीकार छिन्नी हाथोड्याने मुर्ती घडवत असतो. लेखनाचेही तसेच आ...
Image
काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, माग े सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि एक क्लिक.. गाणी सुरु होतात काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. गीतातल्या एखाद्या शब्दाने खपली पडते तर एखाद्या ओळीने विस्मरणात गेलेला माणूस आठवणीत जागा होतो…एखाद्या आलापात आपण भूतकाळाचा प्रवास करून येतो..… गाण्याची एखादी अर्थपूर्ण ओळ कानी पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं... रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. एक एक सूर स्पर्शत जातो, तन्मयतेचा षड्ज लागतो. जुने भास होऊ ल...

तिघींची घोडदौड साकारतेय 'वूमनविश्व'ची वाटचाल

Image
प्रत्येक पिढीत होणारी स्थित्यंतरे ही त्या-त्या जनुकांवर प्रभाव टाकणारी असतात. आजच्या पिढीच्या अपेक्षा अन्‌ आकांक्षा बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. अन्‌ याच अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत असतात. परिस्थिती, बदलत जाणारे वातावरण आणि त्यानुसार घडत जाणारी माणसे उमलत्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आजच्या तरुणाईपुढे अमर्याद संधी, तेवढीच स्पर्धेमुळे निर्माण झालेली आव्हाने आहेत. ती पार पाडायला वेळ मात्र मर्यादित. मग निव्वळ धक्कातंत्र सुरु असतं. एकमेकांशी तुलना करून मार्क्‍स आणि ग्रेडच्या गणिती चक्रव्युव्हात गरगर फिरत राहणं. वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सुद्धा ठाम माहिती नसणारे किशोरवयीन मुलं-मुली पालकांनी बोट दाखवल त्या दिशेने प्रवाहात वाहत राहणं, एवढच पसंत करतात. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्या सांस्कृतिक गरजा काय हे कळेस्तोवर पाणी डोक्‍यावरून गेलेलं असतं. मग काय..? आहे त्यात समाधान मानून केवळ तडजोड करत जगणे इतकंच काय ते हाती उरतं. आपण कोणत्या विषयाचे शिक्षण घेतोय तेवढेच फोकस करून त्यातच करीअर करायचे एवढेच चौकटीतले ध्येय राखून आजच्या त...