Posts

'स' संवेदनेचा कि सहानुभूतीचा !

Image
सामाजिक कामाच्या अनुषंगाने वर्ष २००३ मध्ये नागपूर शासकीय मनोरुग्णालयात जाण्याचा योग आला. ओघाने झालेल्या चर्चेत मानसोपचारतज्ञ डॉ. सोनल देशमुख म्हणाल्या होत्या 'मानसिक आजार हि खरतर मुख्य समस्याच नाहीये, मुख्य समस्या आहे ती त्यांच्या पुनर्वसनाची. मानसिक रोग बरा करता येतॊ पण समाजातल्या लोकांच्या मानसिकतेला औषध नाही ' किती खरंय ना… … एखादी विकलांगता किंवा मानसिक आजार हे ज्याचे त्याने स्वीकारले असते. अश्यातही त्यातून बाहेर पडण्याची आणि त्यांच्या परीने जमेल तसे चांगले जीवन जगण्याची धडपड त्यांची चालू असते. त्यांना फक्त  मानाने वागवण्याची आणि खरतर सामान्य वागणूक देण्याची गरज असते. पण असे घडत नाही एखाद्याचे एखाद्या बाबतीत सामान्य नसणं किंवा आपल्यासारखं नसणं हे आपण सहज स्वीकारतच नाही. अमक्याला काहीतरी व्यंग आहे किंवा होते हे आपण विसरूच शकत नाही. २००३ चे डॉ. सोनल यांचे वक्तव्य प्रकर्षाने आठवले त्याला कारण ठरली काल-परवा वाचलेली सोनाली मुखर्जी हिची बातमी आणि तिच्या नवरयाच्या कौतुकाने भरलेल्या आता या क्षणापर्यंत सुरु असलेल्या सोशल मिडिया वरच्या पोस्ट. जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी सोनालीवर ए...

कुठे नेऊन ठेवलंय माणूसपण माझं ….

 थोडा विचार करा ज्योती सिंग वर बलात्कार होतो तिच्या मित्रासोबातही क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या जातात. आणि त्यांना तसेच नग्न, जख्मी रस्त्यावर फेकून दिले जाते. त्यांना तातडीने मदत करावी अशी रस्त्यावरून जाणारया येणाऱ्यांना गरज वाटत नाही… त्या बळी पडलेल्या निर्दोष अबलेचा बळी गेल्यावर हीच लोकं त्याच रस्त्यावरून आंदोलनं करतात. गुन्हेगारांना आम्ही तातडीने शिक्षा देत नाही. विदेशातून त्यांच्यावर सिनेमा बनवायला लोकं येतात ती गुन्हेगारांना हिरो ठरव्ल्यासारखे त्यांना लाखो रुपये देऊन महिनोमहिने त्यांची शुटींग करतात त्यांना हवे ते बोलण्याची मुभा देतात ते सगळं जगासमोर ठेवतात… हे सर्व होतांना आम्ही मुग गिळून गप्प असतो. मिळणारा पैसा खिश्यात कोंबून वाटेल तशी परवानगी देतो. आणि ते जगासमोर आल्यावर 'मोठ्ठा' नियम काढून आमच्या देशापुरती त्यावर बंदी ठोकून मोकळे होतो. बंदी आणण्यासारखा विषय होता तर तो अस्तित्वात येउच का दिला अन अस्तित्वात आलाय तर बघू का देत नाही ? यावर आम्हाला उत्तर द्यायचे नाहीये … आम्ही आमच्या सोयीप्रमाणे वागतो.           ...

अजूनही..

अजूनही श्वास मनाचा खाली अन वर झुलते रोज अजूनही गालामधल्या खळीत हसणे फुलते रोज अजूनही स्वप्नांना ते पंख रुपेरी फुटतांना आकाश गवसणी बाहू मुक्त अन खुलते रोज अजूनही देह देखणा पोकळीत त्या दिसे व्याकूळ अजूनही हर्षित होता नाच नाचतो मनमयूर अजूनही पिवळा चाफा गंध घेउनि फुलतांना गंधामध्ये रंग वेगळा भासत जातो सुमधुर  अजूनही देठावारती सरसरत ते पिवळं पान अजूनही ओल्या धारा हरपून घेतं उन्हकोवळं भान अजूनही स्पर्श तरुचा मोहवतो अन जीव जाळतो हिरवळ होऊन सारे रंग उधळत जातं सोवळं रान 
खरतर आपण काहीतरी लिहितो यात अप्रूप असं काहीच नाही ते तेव्हाच जेव्हा आपण अंतःकरणातून लिहिलेलं काहीतरी, कुणीतरी 'मनापासून' वाचत असेल. आपण जीवओतून  रचलेली कविता मनलावून ऐकत असेल. एखादं आवडत असलेलं पुस्तक एवढं का आवडतं सांगतांना रटाळ होत चाललेलं आपलं बोलणं सुद्धा कंटाळा न करता समजून घेत असेल. एखाद्या पुस्तकातला नेमका परिच्छेद वाचून दाखवतांना आपल्या इतकाच तल्लीन होत असेल. आपल्याला आवडत असलेलं गाणं, गझल आपल्याला का आवडतं हे जाणून घ्यायला म्हणून मुद्दामहून ऐकून बघत असेल मग त्यावर आपण रमून बोलतांना हिरीरीने चर्चेत सहभागी होत असेल. आपल्या समाजसेवेच्या आस्थेपोटी मनाला स्पर्शलेल्या घटना हळव्या होऊन सांगतांना तोही गुंगून जात असेल. आपण खुश असतांना तो सुद्धा खुश होत असेल. फार नको पण असा एखादाच अगदी एखादाच मित्र/मैत्रीण जवळ असेल तर … या जगात येउन भरून पावलो असं समजावं आणि या मैत्रीला जिवापलीकडे जपावं.
कुठेतरी वाचलंय 'सर्वांना काही काळ मूर्ख बनवता येते काहींना सर्व काळ मूर्ख बनवता येते पण सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही' कर्तृत्वाचा आव आणता येत नाही तसा मोठेपणाचा देखील नाही. मोठेपणा आणि सन्मान कर्तृत्वाने आपोआप मिळत असतो कर्तृत्व अंगात असेल तर सन्मान बोलून मागावा लागत नाही तो आपसूक मनातून दिला जातो पुढल्याकडून मोठेपण अन सन्मानासाठी कुणापुढे हात पसरून कष्ट घेऊन प्रयत्न करण्यापेक्षा कर्तृत्व जागवायला लागणारे कष्ट निश्चितच परवडेबल आहेत आणि समाधानकारक देखील.

फुटपाथवर पसरलेली वाचनसंस्कृती !

Image
ग्रंथालयं, बुक शॉप`पहिलीत कि लहानपणी फार हेवा वाटायचा.  वाटायचं आपल्या भोवतालही अशी विविधांगी,  विविधरंगी विविध विषयांची पुस्तकं पसरलेली असावी आणि वाटेल तेव्हा वाटेल ते पुस्तक उचलून वाचता यावे. असे झालेच तर किती सुखी होऊ आपण लहानपणाच्या सुखाच्या कल्पना अश्याच स्वप्नील तरीही वास्तववादी असायच्या.  वाचनाची प्रचंड आवड पण सगळच छान छान वाचायला ते आपल्याजवळ असायला लागतं आणि आपल्या जवळ असायला ते विकत घ्यायला लागतं आणि त्याहून महत्वाचं त्यासाठी पैसा देखील लागतो. पैसा कमवायला कष्ट लागतात आणि जमवायला तडजोड करणे गरजेचेच आहे हे संस्काराने समजायला लागले. पण उमजायला कठीणच गेले… वाचनाची ओढ काही कधी कमी झाली नाही किंबहुना ती वाढतच गेली. इतकं वेड होतं वाचनाचं कि मी मोठी झाले ना कि एखाद्या पुस्तकाच्या दुकानदाराशी लग्न करेन म्हणजे मग पुस्तक वाचायला मला पैसे मोजावे लागणार नाही अश्या बालपणीच्या बाळबोध कल्पना देखील तेव्हा तेव्हा करून झाल्या. मला आठवतं सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्व सख्या एका मैत्रिणीकडे खेळायला जमायचो. भातुकली, घर-घर, ऑफिस- ऑफिस, लपाछापी असे काहीबाही खेळत असायचो. त्या मैत्रिणीकडे म...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!!!

Image
आजच वाचण्यात आलेला एक अप्रतिम लेख... सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या …!!!! मी २००१ च्या ३१ डिसेंबर ला पंडित हृदयनाथ मंगेशकर (बाळासाहेब) यांचा भावसरगम कार्यक्रम बघायला गेलो होतो. तसा मी भावसरगम डोंबिवली, ठाणे, दादर येथे अनेक वेळा पहिला होता (डोम्बिविली वासी मित्र नितीन जोशी याची कृपा!!). पण हा कार्यक्रम विशेष लक्षात राहिला कारण रात्रभर पंडितजी गायले आणि त्यांनी सुरेश भट यांच्या बद्दल एक विशेष आठवण सांगितली !! जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले, तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच लिहिले होते. जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबांना सांगितले की गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले. १-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक ही गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "...