खरतर आपण काहीतरी लिहितो यात अप्रूप असं काहीच नाही ते तेव्हाच जेव्हा आपण अंतःकरणातून लिहिलेलं काहीतरी, कुणीतरी 'मनापासून' वाचत असेल. आपण जीवओतून रचलेली कविता मनलावून ऐकत असेल. एखादं आवडत असलेलं पुस्तक एवढं का आवडतं सांगतांना रटाळ होत चाललेलं आपलं बोलणं सुद्धा कंटाळा न करता समजून घेत असेल. एखाद्या पुस्तकातला नेमका परिच्छेद वाचून दाखवतांना आपल्या इतकाच तल्लीन होत असेल. आपल्याला आवडत असलेलं गाणं, गझल आपल्याला का आवडतं हे जाणून घ्यायला म्हणून मुद्दामहून ऐकून बघत असेल मग त्यावर आपण रमून बोलतांना हिरीरीने चर्चेत सहभागी होत असेल. आपल्या समाजसेवेच्या आस्थेपोटी मनाला स्पर्शलेल्या घटना हळव्या होऊन सांगतांना तोही गुंगून जात असेल. आपण खुश असतांना तो सुद्धा खुश होत असेल. फार नको पण असा एखादाच अगदी एखादाच मित्र/मैत्रीण जवळ असेल तर … या जगात येउन भरून पावलो असं समजावं आणि या मैत्रीला जिवापलीकडे जपावं.
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Thursday, 23 April 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...
-
गे ल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...
No comments:
Post a Comment