Posts

जरा हासून घेते..

 गालगागा*4 मी व्यथांचे गीत गाते अन जरा हासून घेते काळजाची जखम शिवते अन जरा हासून घेते ज्या उन्हाने जाळले ते घेतले झोळीत माझ्या लपवते दररोज चटके अन जरा हासून घेते भेटलेल्या माणसांचे चेहरे खोटे निघाले मुखवटा बघते जगाचा अन् जरा हासून घेते सारखे आरोप करतो हा जमाना का कळेना वागते निर्ढावलेली अन जरा हासून घेते नाचते, ना लाजते मी बाळगत नाही तमा ही वागते स्वच्छंदी ऐसी अन् जरा हासून घेते या जगाशी भांडते अन जिंकते काही हवे‌ ते चिडवते मी प्राक्तनाला  अन् जरा हासून घेते

पिसे लागले ..

  फुलाच्या तनाशी धुके दाटले   कशी पाकळी ही दिसे साजरी  पिसे लागले सावळ्याचे तिला  जडाली अशी प्रीत भुंग्यावरी  सुगंधी असा स्पर्श देहावरी  नव्याने पुन्हा वेचते, लाजते अश्या स्निग्ध वेळी नसे भानही  तिचे अंग धुंदीत नादावते  कहरतो जरा श्र्वास गंंधाळतो तमोधुंद काया तशी थरथरे चढे कैफ सारा नशा लाघवी  तिच्या तप्त देही भरे कापरे सरी पावसाच्या उरी झेलते झिरपते मनाशी जरा ओलही तसा डळमळे देठही साजरा  फुलाला पडे लाजरे स्वप्नही  बिलगतो जसा चुंबतो देह तो तिची पाकळी दरवळे मोहवे नव्या यौवनाची नशा आगळी निसटत्या क्षणा ओंजळी साठवे तिला साहवेना पिडा वैभवी निरंतर छळे वेड ते लावते  पुन्हा भेटण्याला किती आसुसे तिचा रंग कोमेजुनी सांगते ©रश्मी पदवाड मदनकर

नैतिकतेची कँडी'क्रश'

Image
  महेंद्रसिंग धोनीचा 'कॅण्डी क्रश' खेळतानाचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला आणि तासाभरात कॅण्डी क्रशचे ऍप्लिकेशन 30 लाख लोकांनी डाउनलोड केल्याची बातमी पसरली. बघता बघता बातमीचीही बातमी झाली आणि सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म धोनीच्या फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांनी ओसंडून वाहू लागले. त्यानंतर उलट सुलट चर्चाही रंगल्या. काहींच्या मते धोनी विमान सफरीच्या फावल्या वेळेत कँडी क्रश खेळताना कॅमेरात कैद होणं हा निव्वळ योगायोग होता आणि त्याची ही नैसर्गिक आवड लोकांना आवडली; तर काहींच्या मते ही हेतुपुरस्सर केलेली कँडी क्रश ॲपची जाहिरात होती आणि त्यासाठी सगळं वातावरण प्लॅन केलं गेलं होतं. विषय धोनीचं कँडी क्रश खेळणं हे सहज होतं की हेतुपुरस्सर हा नाहीच आहे, विषय खरंतर त्या पलीकडचा आणि जरा गंभीर असा आहे. धोनी त्याच्या फावल्या वेळात खेळतो म्हणून तासाभरात ३० लाख लोकांनी एखादा गेम डाऊनलोड करून घेणं हा आकडाच जरा अचंबित करणारा आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्या वागण्याचा, आवडीनिवडीचा संपूर्ण समाजावर केवढा मोठा प्रभाव असतो ह्याचे हे जिवंत उदाहरण. ह्याची जाणीव आणि त्याबाबतची आवश्यक संवेदनशीलता किती सेलिब...

रात्र झाल्यावर... !

Image
  उन्हाचा दाह शांतवते, जराशी रात्र झाल्यावर जिवाची काहिली होते, सुखाची रात्र झाल्यावर सुन्या रानात पेटवले, उगवत्या आठवांचे तृण तनाला भार सोसेना, मनाची रात्र झाल्यावर शहारा आजही येतो, तुझे का, नाव आल्यावर क्षणाचा गंधही छळतो उराशी, रात्र झाल्यावर मुक्याने का सहावे रे, तुझ्या कढ वेदनेचे मी बळे मग कंठही फुटतो, मलाही रात्र झाल्यावर जगाची का करू चिंता, असे काळीज जखमी हे घराला आग लावी ते, दिसाची रात्र झाल्यावर रश्मी पदवाड मदनकर

न्यायाधीशांची अनोखी शिक्षा

Image
अमेरिकेत एक पंधरा वर्षाचा मुलगा होता, एका दुकानातून चोरी करताना पकडला गेला. त्याला पकडल्यावर त्याने रक्षकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुकानातील एक कपाटही तुटले. न्यायाधीशांनी गुन्हा ऐकला आणि मुलाला विचारले, "तू खरोखरच ब्रेड आणि चीजचे पॅकेट चोरले आहेस का?" मुलाने खाली पाहिले आणि उत्तर दिले - होय. न्यायाधीश :- का? मुलगा :- मला गरज होती. न्यायाधीश :- विकत घेतले असते. मुलगा :- पैसे नव्हते. न्यायाधीश :- घरच्यांकडून घ्यायला हवे होते. मुलगा :- घरात फक्त आई आहे. आजारी आणि बेरोजगार, तिच्यासाठीच ब्रेड आणि चीज चोरले होते. न्यायाधीश :- तू काही काम करत नाहीस? मुलगा :- कारवॉश मध्ये करायचो. मी माझ्या आईची काळजी घेण्यासाठी एक दिवस सुट्टी घेतली होती, म्हणून मला काढून टाकण्यात आले. न्यायाधीश :-  कोणाकडे मदत मागितली का? मुलगा :- सकाळपासून घर सोडले होते, जवळपास पन्नास लोकांकडे गेलो, शेवटी हे पाऊल उचलले. युक्तिवाद संपला, न्यायाधीश निर्णय सुनावू लागतात, चोरी आणि विशेषत: भाकरीची चोरी हा अत्यंत लज्जास्पद गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला आपण सगळेच जबाबदार आहोत. "कोर्टातील प्रत्येकजण... ...

रुबरू रोशनी

Image
"Repay no one evil for evil, but give thought to do what is honourable in the sight of all..'' काही गोष्टी ऐकायला वाचायला फार बऱ्या वाटतात, पण त्या प्रत्यक्षात करण्याची वेळ येते तेव्हा ते असे वागणे कितपत जमते ? जमले पाहिजे...जमवायला हवे ! आयुष्यात एखादी भयंकर धक्कादायक घटना घडते आणि माणूस जवळजवळ उध्दवस्त होतो. इतकं भयंकर दुःख येऊन ठेपलेलं असतं कि त्यातून बाहेर पडायचा मार्गच सापडत नाही. या दुःखाची सल इतकी बोचरी असते ती सहनशीलतेच्या सगळ्या मर्यादा लंघून संपूर्ण आयुष्यावरच मळभ पसरते. काळोख काळोख दिसत राहतो सगळीकडे. आपल्याला या परिस्थितीत ज्यानं ढकललं त्याचा द्वेष, राग, सूड अशा अनेक विचारांनी मनाची स्थिती अधिक अधिक बिघडत जाते. शारीरिक मानसिक भावनिक सगळ्या स्तरावर खचलेल्या माणसाला पुन्हा पाहिलेसारखं साधारण जीवन जगणंच कठीण होऊन बसतं. या अशा परिस्थितीतून बाहेर निघायला उपाय काय असतो ? तर सेल्फ हीलिंग ! सेल्फ हीलिंग ! सेल्फ हीलिंग म्हणजे केवळ अंतःप्रेरणेने प्रयत्नपूर्वक स्वतःवर उपचार करून पुनःप्राप्ती करून घेणे. स्वप्रेरणेने स्वतःला एखाद्या विशिष्ट अप्रिय परिस्थितीतून बाहेर काढून झ...

दुर्दैवी देशाचे दशावतार -

Image
जि वंत राहण्याची लाचार धडपड आणि तगमगत जगण्याचा प्रवास कधी थांबेल, असा प्रश्न त्यांनी कितीही विचारला तरी आता त्याला उत्तर नाही. जगण्यापेक्षा मरण स्वस्त आहे, त्यातही स्त्रियांचे, गरिबांचे, निराधारांचे, मग लहानग्यांचे..त्यातही साऱ्या जगात स्त्री वर्गाचे आभाळ तर फारच फाटले आहे. कधीकाळी ज्यू महिलांच्या दुर्दैवाच्या दशावतारासारखेच, नंतरच्या सीरियातील महिलांच्या संघर्षाइतकेच आज इतक्या वर्षांनी तालिबान कैदेतल्या अफगाण महिलांची दुरावस्था पहिली तर स्त्रीत्वाच्या दुर्दैवी प्रारब्धाचा एक समान चेतातंतू असा कसा जीवघेणा खेचला जातो...हा प्रश्न संवेदनशील मनाला वारंवार पडल्याशिवाय राहत नाही.  गेल्या वर्षी सत्ता काबीज केल्यापासून, तालिबानने स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर - शिक्षणापासून ते कपड्यांपर्यंत, त्यांच्या दैनंदिन हालचालींपर्यंत आणि आता काम करण्यावर देखील निर्बंध लादले आहेत. महिलांना स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्याच्या तालिबानच्या निर्णयामुळे अनेक संस्थांनी अफगाणिस्तानमध्ये मदत कार्य स्थगित केले आहे. तालिबान आल्यानंतर, महिला कर्मचाऱ्यांमध्ये थोडी भीती निर्माण झाली होती म्हणूनच त...