Posts

कॅन्सर पिडीत चिमुकल्यांबरोबर मेट्रो राईड -

Image
प्रत्येकाचं एक दु:ख प्रत्येकाची एक स्टोरी .. अजाणत्या वयापासूनच नियतीनं यांच्या पुढ्यात अगणित दुखणी वाढून ठेवलेली. हसण्याखेळण्याच्या वयात आयुष्याशी दोन दोन हात करावे लागत असताना निरागस चिमुकल्यांची किती दमछाक होत असेल ..जिथे मोठमोठ्यांची हीम्मत हात टेकते, तीथे ह्यांच्याकडून काय अपेक्षा करावी..पण ही लढतात खुप ताकदीने संघर्ष करतात आणि यातले अनेक जिंकतातही. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून मोठमोठ्यांना वैताग येतो त्याचे उपचार अत्यंत कठीण असतात. वर्षानुवर्षे उपचार चालू असल्याने या रोगाचे पेशंट त्रासून जातात. ही मोठ्यांची अवस्था असतांना या छोट्या पाखरांचं काय होत असेल. घोडेले परिवारातील धनुष्य हा ३ वर्षाचा मुलगा आणि त्याचीच सक्खी बहीण जान्हवी ५ वर्षांची दोघांनाही डोळ्यांचा कँसर असल्याचे कळले तेव्हा या परिवारावर दुःखाचा कुठला डोंगर कोसळला असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. अत्यंत साधारण कुटूंबातील हे आई-बाबा दोन्ही मुलांना यातून बाहेर काढायला किती काय सहन करत असतील हे विचारण्याची हिंमतही मी करू शकले नाही. ही दोन्ही चिमुकली आई-बाबांचा हात धरून मेट्रो राईडसाठी आले होते. पूर्वा पराठे या ११ ...
नवीन कोरं करकरीत एखादं पुस्तक हातात येणं अत्यानंद आहे पण पुस्तकाबरोबर माणसंही वाचायची हौस असेलतर त्या त्या माणसाने वाचलेलं एखादंतरी पुस्तक वाचायला मागून घ्यावं.. वाचलेल्या पुस्तकातून माणसाच्या स्वभावाच्या अनेक कथा सांडलेल्या सापडतात .. त्या वेचून एकसंध बांधल्या कि बराचसा माणूस कळायला मदत होतेच. म्हणजे पुस्तक वाचतानाच त्यानं त्या पुस्तकाला दिलेली वागणूक, पानापानावर विशिष्ट जागी केलेल्या खाणाखुणा, कुठे कुठे वाचतांना घेतलेले पॉजेस विशिष्ट पान मुडपून ठेवतांना त्या पानावरचा नेमका मजकूर, पानात मध्ये मध्ये ठेवलेल्या काही वस्तू.. पुस्तकावर पानांना लागलेली पडलेले डाग आणि बरेच काही न्याहाळताना माणूस हळू हळू अवगत होतो.. हळू हळू कळलेली माणसे मग दगा देत नाहीत .. (c)रश्मी मदनकर

*प्रजासत्ताक आणि स्त्रीस्वातंत्र्य* -

Image
आज आपण ७१ वा प्रजासत्ताक म्हणजे गणतंत्र दिवस साजरा करणार आहोत, पण महिलांच्या बाबतीतला  गणतंत्र दिवस अजूनही अस्वस्थतेच्या सावटाखाली जातो ही आपली शोकांतिका. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य, प्रजेचे राज्य म्हणजे आपले राज्य. जेव्हा एखाद्या राजवटीला ‘प्रजासत्ताक’ असे विशेषण लावले जाते, तेव्हा त्याचा अर्थ फार मोठा होत असतो. आपल्या घटनेच्या उद्देशिकेत ‘भारताचे एक सार्वभौम’ असे लिहिले आहे.. यातील सार्वभौम कोण? तर या देशाने सर्वाधिकार म्हणून या देशातील जनतेलाच सर्वोच्च स्थानी ठेवले आहे. आमच्या घटनेचीच सुरुवात ''आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य (प्रजासत्ताक) व त्याच्या सर्व नागरिकांस...'' या उल्लेखाने होतो. लोकांचं लोकांसाठी लोकांनी स्थापन केलेलं सरकार, म्हणून हे आपलं प्रजातंत्र आणि त्यामुळेच या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व.  १९५० पासून देशात अधिकार आणि कर्तव्य याशिवाय स्वातंत्र्य या विषयांवर प्रचंड उहापोह होत आलाय. अनेक आंदोलनं, संघर्ष उलथापालथी याच काही कारणास्तव घडत गेले. संपूर्ण स्वातंत्र्य ही अजूनही एक कल्पनाच वाटते. स्वातंत...

मरणाची ''पाळी'' ..

Image
पापी पोटाचा प्रश्न फार मोठा असतो, इतका मोठा कि जन्मभर पाठ सोडत नाही. टीचभर पोट भरायला माणूस आयुष्यभर खस्ता खातो पोट भरत राहावं म्हणून अक्ख्या शरीराचीच हेळसांड करीत राहतो. त्यात ती स्त्री असेल आणि कुटुंबातल्या चार माणसांची, लेकराबाळांची पोटं भरण्याची जबाबदारीही तिच्यावर असेल तर जीवाचे हाल विचारूच नका. घरातल्या चिल्यापिल्यांचे पोट भरायला कधी ती उपाशी राहते, एका कापडावर महिने काढते, हाताला येईल ती कामं करते आणि वेळ आलीच तर या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोटच्या गोळ्याला पोसायला पोटचा एखादा हिस्साच कापून फेकून देते. योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या आठवड्यात देशभर साजरी केली गेली. स्वतः हाल-अपेष्टा साहून स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडे करून रीती-परंपरेच्या पार प्रस्थापित सामाजिक अन्यायी रूढींना नाकारत स्वयंसिद्ध होण्याचा धडा त्या माउलीने दिला होता.. दुसरीकडे त्याच आठवड्यात मराठवाड्यातील ३००० ऊस कामगार स्त्रियांनी पाळीच्या दिवसात रोजगार मिळत राहावा म्हणून अल्पवयात गर्भाशयच काढून टाकले या खळबळजनक बातमीने पुन्हा उचल खाल्ली.... ही काय अवस्था आहे ना, भारत जगात महासत्ता बनायला निघा...

जीवन गाणे गातच राहावे ..

Image
पुन्हा एक वर्ष सरलं, नवं वर्ष-नवे संवत्सर सुरु झाले. नव्या वर्षाचा जल्लोष वगैरे साजरा होईल नवनवोन्मेषाने भारलेली रात्र उजळून जाईल, नव्या वर्षाच्या पहाटेचा सूर्य अधिक तजेला अधिक उत्साही दिसू लागेल. दिवस पालटेल जुने कॅलेंडर भिंतीवरून उतरेल नवे चढवले जाईल आणि मग पुन्हा 'चल रे माझ्या मागल्या ..' तसं नव्या-जुन्या वर्षानं बदलत काहीच नाही तीच तशीच सकाळ उगवते आणि कामाच्या रहाटगाड्यात कधी रात्र होते कळतही नाही. दिवसामागून दिवस सरतात रात्री मागून रात्र, महिने पालटतात मग वर्षामागून वर्ष येत जातात जात राहतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिनी भिंतीवर चढवलेले नवे कॅलेंडर तयार असते अगदी नव्या कोऱ्या पाटीसारखे नव्या रेघोट्या ओढून घ्यायला. पुढे वर्षभर ते तारखा लक्षात आणून देणार असतं .. आठवणी अंगावर कोरून घेणार असतं, हिशेबांचे आकडे, कुणाकुणाचे जन्मदिन-लग्नदिन, दूध-पेपर न कामवाल्यांच्या उपस्थिती अनुपस्थितीच्या नोंदी, महत्वाच्या कामासाठीचे रिमाइंडर किती किती आणि काय काय.... काल उतरवलेल्या जुन्या कॅलेंडरवरच्या खाणाखुणा मात्र राहतात तश्याच, चोळामोळा होतात, रद्दीत फेकल्याही जातात .. अंह ! पण नेहमीच...

आसमान छुती लडकीया !!

Image
आ पण एक्केविसाव्या शतकात जगतोय असे सांगतांना अनेकदा उर भरून येतो, हे संगणकाचं युग आहे..तंत्रज्ञानाचं युग आहे. विज्ञानानं आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. तरी या युगात अजूनही अनेक क्षेत्र पुरुषी मक्तेदारीचाच भाग असल्याचे दिसणे किंवा कुठल्याही कारणाने का होईना अजूनही स्त्रिया अनेक पैलूंना स्पर्शू शकल्या नाही तिथवर पोचूच शकल्या नाही, हे ऐकून विषन्न व्हायला होतं. खरतर जिथे भारतीय महिलांना अजूनही सामाजिक हक्कांसाठी सतत लढावं लागतं तिथे इतर अपेक्षा अनेकदा कुचकामी ठरतात. पण गेल्या दोन दशकात महिलांचं कर्तृत्व आणि नेतृत्व परिपक्व होत गेलंय. तिच्या अंगी फार काळ ही ऊर्जा दडपून ठेवणे शक्य नव्हतेच तिच्या पंखांनी भरारी घेणे ठरले होतेच ते आता घडू लागले आहे. महिलांच्या गोटात आनंद पेरणाऱ्या अश्याच दोन बातम्या याच वर्षात कानावर आल्या मे महिन्यात भावना कांत ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला ऑपरेशनल फाइटर पायलट बनली. जी युद्धाच्या मोहिमेवर जाण्यासाठी आता लढाऊ विमान उडवणार आहे .. तर मागच्याच आठवड्यात सब लेफ्टनंट शिवांगी नौदलाची पहिली महिला पायलट बनली, शिवांगी पाळत ठेवणारी विमाने म्हणजे...

मामाचं पत्र हरवलं ..

Image
पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आणि लिफाफ्यातून येणारी चिट्ठी..... आठवतंय ना ? आपल्या साऱ्यांचंच लहानपण  कुणाला तरी पत्र लिहिण्यासाठी आसुसलेलं किंवा कुणाच्या तरी पत्राची वाट पाहण्यात अस्वस्थ झालेलं गेलं आहे. या पत्रांना सांभाळून त्या त्या काळच्या सगळ्या आठवणी जपणं किती सहज सुंदर असायचं .. मग कधीतरी जुनी पत्र काढून वाचण्याचा आनंद तर अवर्णनीय आहे.  पत्राचं काय महत्व असतं ते आपल्या पिढीला तरी वेगळं सांगावं लागणार नाही. दारात आलेलं पत्र पाहिलं कि आनंद व्हायचा. आज दारात फक्त बिलं येतात किंवा नोटीस. व्हाट्सॲप किंवा सोशल नेटवर्किंगने जग इतकं जवळ आणलाय की जवळच्या माणसांबद्दल काहीच वाटेनासं करून टाकलंय. आपण एकमेकांशी साधलेला संवाद पुढे कधीतरी ५ वर्षांनी वाचावासा वाटलं तर ? जितके पटापट मेसेज करता येतात तितकेच पटापट ते संपुष्टातही येतात..कुठलेही नामोनिशाण न ठेवता .. म्हणूनच पूर्वी या भावना नात्यांना एकमेकांशी बांधून ठेवायच्या आता बांधून ठेवायला लागणाऱ्या शब्दांचा ओलावा उरतंच नाही आणि म्हणून नात्यांचाही ओलावा हल्ली तात्पुरता झालाय. पूर्वी पत्र कुणी कुणाला लिहायचे तर प्रेयसी प्रियकराल...