नवीन कोरं करकरीत एखादं पुस्तक हातात येणं अत्यानंद आहे पण पुस्तकाबरोबर माणसंही वाचायची हौस असेलतर त्या त्या माणसाने वाचलेलं एखादंतरी पुस्तक वाचायला मागून घ्यावं.. वाचलेल्या पुस्तकातून माणसाच्या स्वभावाच्या अनेक कथा सांडलेल्या सापडतात .. त्या वेचून एकसंध बांधल्या कि बराचसा माणूस कळायला मदत होतेच. म्हणजे पुस्तक वाचतानाच त्यानं त्या पुस्तकाला दिलेली वागणूक, पानापानावर विशिष्ट जागी केलेल्या खाणाखुणा, कुठे कुठे वाचतांना घेतलेले पॉजेस विशिष्ट पान मुडपून ठेवतांना त्या पानावरचा नेमका मजकूर, पानात मध्ये मध्ये ठेवलेल्या काही वस्तू.. पुस्तकावर पानांना लागलेली पडलेले डाग आणि बरेच काही न्याहाळताना माणूस हळू हळू अवगत होतो.. हळू हळू कळलेली माणसे मग दगा देत नाहीत ..
(c)रश्मी मदनकर
No comments:
Post a Comment