Posts

मनाला मनाचा कुठे थांग आहे जिवाला दिलासा कसा सांग आहे कुणाला असे भान जगण्यास येथे जयाचे तयाच्या पगी टांग आहे नसे भावना आज नाती फुकाची दगड पूजन्या देवळी रांग आहे तुझी प्रीत चढते नशा ही गुलाबी जशी साथ ऐसी जणू भांग आहे कसे सांग विसरू ग आई दिले तू न फेडू शकत मी असे पांग आहे तुझे वागणे मुखवट्याआड वाटे मला वाटते फार नाट्यांग आहे -रश्मी पदवाड मदनकर 
Image
मुळातून येऊन पुन्हा मुळाकडे जाण्याची ओढ संवेदनशील माणसांना खुणावत असली पाहिजे. निव्वळ मुळाकडे परत जाणे हा इतका उथळ विषय नाही. ह्या विषयाची व्याप्तीच अत्यंत खोल आणि गंभीर अशी आहे. सगळ्यांना आकलन होईल असा हा विषयही नाही.. पण तरीही या गोष्टीच आकर्षण मात्र अनंत काळापासून आहे ह्याची अनेक उदाहरणं दिसतात. मुळापर्यंत म्हणजे शुन्याकडे, जेथून निर्मिती झाली तेथवर म्हणजे त्या अनुभवाच्या अवस्थेपर्यंत जाणे असे काहीतरी किंवा त्याहून अधिक गहिरे वगैरे. "कथाकार दि.बा मोकाशी यांची 'जरा जाऊन येतो' नावाची एक कथा आहे. या कथेतील नायक गणेश ओक कुटुंब वत्सल असूनही एकदिवस अचानकपणे नाहीसा होतो. मग सर्व संबंधित मंडळी त्याचा अटीतटीने शोध घेतात. पण त्याचा शोध लागत नाही. खरंतर अवतीभोवतीच्या यंत्रप्रधान-अर्थनिष्ठ, एकसुरी, चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळून त्यातून सुटण्यासाठी, तुटलेपणातून वाचण्यासाठी काही क्षण गणेश 'औदुंबराला' जाउन आला असतो. औदुंबराला गणेशला गर्भाशयातील शांतता लाभते. निर्भर प्रसन्नता, अतीव शांतता, आणि स्वतःतल्या माणसाची ओळख त्याला तिथेच मिळते. चिरंतर प्रसन्नतेच्या शांततेचा ठेवाही...

आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतो तो ...

Image
आजा मै हवाओ में बिठा के ले चलूं .. तू हि तो मेरी दोस्त है .. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर येतोच तो आयुष्यात.. दुरून तुमची तगमग बघत अस्वस्थ होतो नकळत मदतीला धावून येतो. आधाराचा हात देतो, रुसलेले हसू परत खुलवतो, तुम्हाला अलगद त्या तात्पुरत्या आलेल्या कष्टातून संकटातून बाहेर काढतो अन हळूहळू पुन्हा आयुष्यातून नाहीसाही होतो. त्याचं आपल्या आयुष्यात तेवढंच औचित्य असतं. आयुष्यातून निघाला तरी आठवणीतून, मनातून मात्र निघू शकत नाही.. आयुष्य जगण्याचे अनेक धडे शिकवून, आयुष्याला नवे आयाम देऊन गेला असतो..मनात कायमची जागा ठेवून गेला असतो. तो ..'प्रेमरोग'च्या मनोरमाला भेटलेल्या देवधरसारखा असतो..नियतीच्या नाकावर टिच्चून, प्रस्थापितांच्या हुकूमास न जुमानता मनोरमाच्या पाठीशी भक्कम उभा राहणारा.. किंवा 'सदमा'च्या सोमप्रकाशसारखाही  बालिशपणावरही निरपेक्ष निरलस प्रेम करणारा, सुरक्षा देणारा.  'इंग्लिश विंग्लिश'च्या शशीला अनोळख्या नवख्या देशात भेटलेल्या विंसेंट सारखा असतो तो कधी... तिच्या भांबावलेल्या आयुष्याला मार्गावर आणून सोडणारा, तिच्या दुर्गुणांना दुर्लक्षित करून तिच्या गुणां...

कालजयी कुमारगंधर्व

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) कालजयी कुमारगंधर्व रियाज लेखिका - स्वाती हुद्दार इंदुर उज्जैन रस्त्यावर वसलेलं टुमदार देवास. कलेची आराधना करणाऱ्या कलावंतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं आणि म्हणूनच देवाचं वास्तव्य असलेलं देवास. नर्मदेच्या सुजलाम प्रवाहानं माळव्यातल्या भुमीच्या या तुकड्याला सुफलाम केलं. देवासच्या भुमीला संगीताची मोठी परंपरा लाभली आहे. प्रसिद्ध संगीतकार बंदे अली, शेवटचे मोठे बीनकार बाबूखॉं , संगीत सम्राट खॉंसाहेब रजब अली खॉं, पुढे कुमार गंधर्व. आणि असे कितीतरी संगीतज्ज्ञ या भुमीनं दिले. चामुंडा टेकडीकडे जाणाऱ्या उतारावरचं एक सुरेल घर भानुकुल. नित्य संगीत आराधनेत रमलेलं. ऋतूचक्राची जाणीव करून देणारी घराभोवतीची वृक्षराजीही स्वरांच्या घोसांनी लगडलेली. त्या वृक्षांवरच्या पक्ष्यांचा चिवचिवाटही एखाद्या बंदीशीसारखा. भानुकुलमधल्या बंगईच्या पितळी कड्यांची किणकिणही सुरेलच. एखादी रागिणी छेडल्यासारखी. कारण साक्षात सात स्वरांचं वास्तव्य या घरात होतं. 30 जानेवारी 1948 एका गंधर्वाची पावलं देवासच्या भुमीला लागली आणि ही भुमी अधिकच संगीतमय झाली. 8 एप्रिल 1924 रोजी बेळगाव इथं जन्मलेला...

भरजरी कविता ..

ऐक ना... तू तुझ्या आकांक्षाचे सगळे धागेदोरे वापरून सहज कलेने नक्षीदार सौंदर्य विणून तलम आलंकारिक शब्दांना एकात एक गुंफूण भरजरी कविता तयार केली होतीस आठवतं ? ती मला दाखवायला आणलीस आणि गप्पांच्या ओघात माझ्या ड्रेसींगजवळ तशीच विसरून गेलास मी उचलून हातात घेतली तेव्हा मखमली पोताची तुझी कविता ओढ लावू लागली.. सहज अंगावर ओढून पाहीली खुप आवडली, राहवलं नाही म्हणून मग नेसूनच घेतली तुझी कविता चापूनचोपून बसवताना माझ्या तनामनाशी संधान साधत राहीली कवितेच्या सौंदर्याचं प्रतिबिंब अंगोपांगी उतरले होते अंग अंग निखरून आले होते .. आता 'माझ्यावर कविता लिहीना रे' असा हट्ट करणार नाहीये मी... तू केलेली कविताच माझ्यावर लपेटून घेणार आहे. मग 'तुला कोण जास्त आवडतं सांग मी का कविता ?' या माझ्या प्रश्नावर तूला संभ्रमात पडायला होणार नाही.. कारण ती न मी आता एक व्हायचे ठरवले आहे एकमेकीत तल्लीन होऊन तादात्म पावायचे ठरवले आहे. सांग तुझी प्रत्येक कविता भरजरी करशील ? मला नेसायला देशील ? रश्मी पदवाड मदनकर 5 ऑक्टोबर 18

दोन ध्रुवावर दोघे आपण !

Image
तु ला नसेल आठवत .. आपल्या त्या तेव्हाच्या घरासमोर एक छोटी बाग होती. एक छोटासा रस्ता जायचा गेट समोरून तो ओलांडला कि लगेच बाग. बागेच्या प्रवेशालाच शाल्मली होती - सावरीचं झाड. डिसेंबर उलटला कि पूर्ण निष्पर्ण झालेलं झाड हळूहळू बहरायला लागायचं. जानेवारीमध्ये हिला कळ्या यायला सुरुवात व्हायची आणि वसंत ऋतू येण्याआधी संपूर्ण झाड फुलांनी लगडलेलं असायचं आणि तळाशी फुलांची पखरण. संपूर्ण निष्पर्ण झाडावर फुललेली आणि रखरखलेल्या कोरड्या जमिनीवर ही मोठी मोठी गडद गुलाबी फुले निवांत पहुडलेली पाहणे हा एक नयनरम्य सोहळाच तर असायचा. काटेसावरीची गडद गुलाबी ही फुले मोठी, जाड, पाचच पाकळ्यांची, खूप सारे पुंकेसर असलेली केवढी नेत्राकर्षक दिसायची. फुलं खाण्यासाठी खारुताई नि फुलांमधून मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची मांदियाळीच या झाडावर जमा व्हायची. त्यांच्या श्वासांची आणि हालचालींची सूक्ष्म स्वपनदानही मला जाणवायची हा निसर्ग निर्मितीचा सोहळा अनुभवणं म्हणजे आनंदाचं उधाण असायचं रे, हे नांदते विश्व पाहण्याचा नादच लागला होता. तुझ्या व्यस्ततेमुळे मला भासत असलेली तुझी उणीव या ऋतूत जरा मंदवायची. कारण माझं संपूर्...

आतल्या मास्तरीण बाई - पत्र 4

जरा नरव्हस व्हायला झालं ना की आतल्या बाईंचे हे शब्द आठवतात आणि पुन्हा जगण्याची उभारी येते... #आतल्यामास्तरीणबाई पत्र -4 आयुष्याचं सोनं कर सोनं खूप तापलं ना की अधिकच चकाकतं म्हणतात. आयुष्याचही तसंच काहीसं असतं आयुष्यात कधीतरी खूप चटके खावे लागतात होरपळून निघतोय आपण असे वाटत असतांनाच आपण तावून सुलाखून बाहेर पडलेले असतो.…. एकदा दोनदा आणि अनेकदा प्रत्येकवेळी नवे चटके आणि त्याबरोबर आलेली नवी झळाळी. इतकं सगळं पाहून, भोगून, सोसून झाल्यावर एक काळ येतो आयुष्यात जेव्हा आपसूकच स्वतःवरचा अंतर्गत विश्वास इतका प्रगाढ झालेला असतो की पुढे भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही दुःखाच, संकटाच अप्रूप वाटेनासं होतं. कुठलीही भीती आता भीती म्हणून उरतच नाही. दुःखाला दुःखाची किनारच नसते आणि संकट नावालाही हादरवत बिदरवत नाही. आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना निव्वळ संधी वाटू लागते स्वतःला लिफ्ट करायला. तांदळातून खडा काढून सरकवावा किंवा दुधातून माशी काढून फेकावी इतक्या शुल्लक वाटू लागतात आयुष्यातल्या अडचणी. मग रोजचे चाललेले आयुष्य त्यात रोजच्या व्यापासोबत, संसाराच्या रहाटगाड्या सोबत स्वतःला खुश ठेवण्याचं स्किल आपस...