Posts

खुणा

सख्या तू येतोस ... तुझे सळसळणारे चैतन्य शिंपत फिरतोस उत्साहाच्या चंदेरी सुमनांची पखरण करतोस मनमोकळे हसतो ... जीव गुंतवत रमतो अन मन भरण्या आत निघून जातो जातांना तुझ्या येण्याच्या सगळ्या खुणा वेचून नेतोस तुझ्या असण्याच्या खुणा मात्र तिथेच सांडून जातोस तुझ्या असण्यात माझ्या गुंतण्याच्या खुणा लपत नाहीत आणि ... तू येऊन गेल्याचा अंदाजही लोकांचा मग चुकत नाही. 

कुंपण

माझ्या क्षितिजात चंद्राची शीतल काया तेवत असते अंगणात चंदनफुलांचा शिंपावा  गार गंधित वाऱ्याची झुळूक तुला स्पर्शाला हवी असते म्हणून तू  दुपारचे उन्ह अंगभर लपेटून रात्री भेटायला येतोस मला तू पौर्णिमा म्हणतोस उन्हात कोरड्या करपून गेलेल्या तुझ्या भावनांना माझ्या ओलाव्याची उब हवी असते तुझा हात हाती घेते पदराची सावली तुझ्या डोक्यावर धरते तू शांत होत हळव्या कुशीत विसावतो मला तू माया म्हणतोस... तुझे बाळबोध उमाळे कुशीत रिचवताना माझ्या मातृत्वाचा पान्हा फूटतो तू तुझे उदरभरण करून घेतोस तृप्तीची ढेकर देऊन कुशीतच गाढ झोपी जातो..... तू मला पूर्णा संबोधतो... पुन्हा उजाडतं... तुला उडायचं असतं दूर गगनात तुझ्या स्वप्नांचं क्षितिज गाठायचं असतं तुझ्या पंखांवर मी माझं आभाळ धरते झेप घेऊन थकलास कि तुला विश्रांतीला पंखांखाली ओंजळही सरकवते तू मला धारिणी म्हणतोस.... जगणं-जागवणं, रुजवणं - निभावणं. तुला देत राहते अखंड  ... तुझे तप्त उन्ह मनभर गोंदून रापल्या जीवाचा दाह सोसून कोंडून घेते आत वरवरच्या कायेवर चंदनाचा लेप देते... शृंगार करते रात्री तुझ्या गरजेची शीतलता दिवसभर पेरत जाते.  मला तू स्वरू...

प्रजासत्ताक आणि स्त्रीस्वातंत्र्य

Image
प्रजासत्ताक दिन जवळ आलाय. १९५० पासून देशात अधिकार आणि कर्तव्य याशिवाय स्वातंत्र्य या विषयांवर प्रचंड उहापोह होत आलाय. अनेक आंदोलनं, संघर्ष उलथापालथी याच काही कारणास्तव घडत गेले.. संपूर्ण स्वातंत्र्य हि अजूनही एक कल्पनाच वाटते. स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट झाली तर इतर अनेक प्रश्नांना आपोआप वाचा फुटू शकेल पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर कधीच स्पष्ट देता आलेले नाही. आपलं आत-बाहेर असलेलं अमर्याद अस्तित्व आणि ते मुक्तपणे स्वीकारण्याची अन तसेच वागण्याची आपली ताकद म्हणजे खरे स्वातंत्र्य असे माझे स्पष्टच मत आहे.  व्यक्तिस्वातंत्र्याचा विषय पुढे आला म्हणून स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला. सहज शब्दकोश उचलून बघितला. स्वतंत्रता, स्वयंशासन, स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, मुक्तता, सोडवणूक, खुलेपणा, स्वैरता, मुभा, सूट... बाप रे बाप! एकूण २५-३० शब्द ह्या एकाच शब्दाला ‘पर्यायी’ म्हणून दिलेले आहेत. स्त्रियांच्या दृष्टीने पाहायला गेले कि यातला कुठला शब्द तिच्या अनुषंगाने चपखल बसतो हे व्यक्तिसापेक्ष असू शकेल कदाचित प्रतिनिधिकहि असू शकेल. सामाजिक चौकटीच्या...

विसर्जन

Image
सगळे हिशेब संपवायला जरा उशीरच झाला रात्र पालथी पडून ... जरा उजेडायला आले होते किर्र्र्र अंधार चिरत बारीकशी किरणे डोकावू पाहत होती ... पण अजून अंधार कायम होता. अंगावरच्या सगळ्या चिघळट खाणाखुणा, भळभळणाऱ्या जखमा, खदखदणारी व्रण, ठसठसणारे स्पर्श   तिनं पदरानं रगडून पुसून काढलीत. त्या पदराची झोळी केली न खोचली कंबरेत दोन्ही हाताच्या तळव्याने वाहते डोळे पुसले अन साठवून घेतले ते अश्रू ओंजळीतच. उंबरठा ओलांडला .... चालत राहिली रस्ता नेईल तिकडे आकाशात मेघ दाटून यायला लागले होते. तिच्या मनातले मेघ आज धो धो बरसून साठले होते .. तिच्या तळव्यात. रिमझिम रिमझिम सुरु झाली तशी ओंजळ अधिक पुढे केली तिनं पावलागणिक पाऊस ओंजळीत साठत होता... ती मात्र, ... ती मात्र ओंजळ ओसंडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेत, ठार कोरडी होत चालली होती.  ओलाव्याच्या सगळ्या खुणा पुसून टाकायच्या होत्या तिला... शरीराच्या अन मनाच्याही चालता चालता ध्यानात येणाऱ्या .. उरात उचंबळणाऱ्या लाटा, आयुष्यातल्या उभ्या आडव्या सरी,  डोळ्यातला पूर, मनातला पाऊस भावनांचा ओघळ, नात्यांची ओल, आठवणीतला पाझर सगळं सा...

इसलिए तमाम पागल अपने अद्वितीय तरीके से पागल होते हैं..!

Image
दुपारचे १२.. . सगळे आपापल्या कामात व्यस्त. कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो हल्ली. आम्ही चहा घेऊन जरा पाय मोकळे करायला पुढे आलो आणि काहीसे स्तंभित करणारे चित्र नजरेस पडले. एक पंचविशीतला तरुण रस्त्याच्या वळणावर एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच; कोपऱ्यात झाडाखाली बसलेला दिसला. त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केलेली.. तिथं तो दिवसभर बसून असतो. राजासारखा.... नव्हे, एखाद्या कलावंतासारखा! त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या चपला, काही किरकोळ सामान. जमिनीवर पडलेला कागदांचा खच, फाटक्या बॅनरचे, पॅम्पलेटचे एकत्र जोडून ठेवलेले कागदी चिटोरे. त्या चिटोऱ्यांवर त्यानं चितारलेली अनाकलनीय चित्रे. बरीच चित्रं त्यानं झाडांच्या फ़ांदीला अडकवलेली . जणू चित्रांचे प्रदर्शन मांडलेले. तो नेमकं काय करतोय याचा अदमास येईना, पण हे काहीतरी वेगळं आहे हे ध्यानात यायला वेळ लागला नाही. तो वेडा असावा . सगळे तसंच सांगत होते..वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले. फाटलेले सुद्धा असतील. त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब-राठ. आंघोळ नसणारच करत कधी. शहाणी माणसं असं थोडीच कर...

२०१६ वर महिलांची मोहोर

Image
चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा, बघता बघता हे वर्षही सरले. दरवर्षी नेमाने येणारा क्षण पुन्हा जवळ आलाय या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण. सरत्या वर्षात काय गमावले, काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो. नव्या वर्षात पदार्पण करताना भूतकाळाची उजळणी करणे क्रमप्राप्त ठरते. सरते वर्ष अनेक घडामोडींनी भरलेले राहिले अनेक मार्गाने उल्लेखनीय ठरले. कुठे सामाजिक बदलांची नांदी कानी आली तर कुठे भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणं वाचनात आलीत. जातीय आरक्षणासाठी पुकारले गेलेले आंदोलन, नोटा बंदीने पिडला गेलेला सामान्य नागरिक, सत्तापक्ष-विरोधी पक्षाचे अटीतटीचे राजकारण आणि त्यात ढवळून निघालेला देश. अश्या अनेक घटनांच्या खुणा गोंदल्या जात असतांना वर्षभर महिलांच्या संबंधित देश-विदेशातून चांगल्या वाईट बातम्यांची धूळही उडत राहिली. कुठे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्न झाले. नेतृत्व गुणांना वाव मिळाला, मोठ्या पदांवर ती आरूढ झाली तर कुठे बलात्कार, अत्याचाराच्या घटनाही गाजत राहिल्या. अश्याच काही मुख्य घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा हा छोटा प्रयत्न. ...

शब्द

शब्द सुचत नाहीत सुचावे तेव्हा अन पंक्तीतही बसत नाही बसवावे तेव्हा  मनमानी करून घेतात  वाटेल तिथे जाउन येतात  हळूच जागल्या रात्री मग  उशाशी येउन विसावतात    शब्द येत  नाहीत बोलवावे तेव्हा  स्वरातही खुलत नाही खुलवावे तेव्हा भावूक होऊन हिरमुसतात मुसमुसतात धुस्फुसतात हळूच ओल्या रात्री मग कंठाशी येउन गुणगुणतात शब्द शब्दाला जागतातही शहाण्यासारखे वागतातही शब्दांचा तोरा बदलला तर मग मौनात  जाऊन बसतातही शब्दांचे ऐकावे, शब्दांना सांगावे शब्दांचे चित्र शब्दांनीच रंगावे शब्दांशी भांडावे, शब्दांनीच मनवावे शब्द शब्द गोंजारून कवितेत मांडावे .... रश्मी मदनकर ११/१२/२०१६