Posts

राजकन्य़ा मस्तानी !

प्रताप गंगावणे, सौजन्य – लोकसत्ता मस्तानीचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते? ती कायम गैरसमजांच्या झाकोळाखाली का राहिली? बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही. ‘श्रीमंत पेशवे बाजीराव-मस्तानी’ या ‘ई  टी. व्ही. मराठी’ वरील मालिकेतून सध्या तिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला जात आहे. मस्तानीच्या अगम्य व्यक्तिरेखेचे रहस्य उलगडण्यासाठी या मालिकेच्या लेखकाने सखोल संशोधन केले आहे. या लेखकाचा, मस्तानीचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारा लेख- ——————————————————————————————— ‘मस्तानी’ हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. मूर्तिमंत निष्ठेची भाषा ती समस्त मराठी मुलुखाला शिकवून गेली. १७४० साली झालेल्या या घटनेला आज ३०० वर्षे होत आलीत आणि तरीही ती मराठी साहित्यात, मराठी मनात वारंवार...

पळस … रंग माझा वेगळा

Image
फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरु होतो आणि घरोघरी परीक्षेचे वेध लागतात. भरदिवसा वातावरणात एक गूढ गंभीरता भासू लागते,  उष्णता जाणवू लागते. अगदी याच दिवसात पानगळ झाली असते शिशिर संपून नुकतीच वसंताची चाहूल लागलेली असते इतरत्र झाडांची पानं गडद रंगाची झाली असतात काही पिकलेली तर काही गळलेली दिसतात. ऋतू बदलणार असतो आणि निसर्गही नवा रंग नवे सौंदर्य ल्यायला आसुसलेला असतो. इकडे वातावरणाच्या या जरा कोरडेपणाने मन विषन्न होतं आणि गारवा शोधायला भटकू लागतं. मग अलगद पाय बाहेर वळतात. रोजच्या धकाधकीतून दूर रोजच्या परिसरातून वेगळा असा रस्ता शोधत आपली पावले मग शहरापासून दूर जाण्यास प्रवृत्त होतात. शहर सोडले आणि आपली गाडी हायवेला लागली कि रणरणत्या उन्हातले मखमली सौंदर्य दृष्टीपथास पडतं. ऐन ज्वानीच्या भराला आलेली , तारुण्यानं मुसमुसलेली अंगभर केसरी-लाल रंग ल्यायलेली रस्त्याच्या दोन्ही कडेची वाऱ्यावर अलवार झुलणारी आणि त्यावर फुललेली ती अगणित केसरफुलं हिरवेपणात विलीन होणारी तरीही 'रंगात सार्या रंगुनी रंग माझा वेगळा' असे ठळकपणे सिद्ध करणारी 'पळसा'ची फुलं बहरून आलेली एक एक शृंगारलेणी ल...

"उजाडलं आई?" - एक अतिशय आवडलेला लेख

'कारट्या, किती भूक भूक करशील...' घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे करताना बघणे यातून आईवडीलांना खूप खूप समाधान मिळत असते. पण हे झाले सर्वसामान्य, खाऊनपिऊन सुखी घरातले चित्र. जिथे या भुकेमागे भयाण दारिद्र्याचा काळाकुट्ट भेसूर पडदा असतो तिथे ही नैसर्गिक भूक अगदी भयानक, विदारक रूप धारण करते. शाळकरी वयातला कृष्णा हा असाच वाढत्या वयाचा मुलगा. त्याचे पोरपण अजून संपलेले नाही. दारिद्र्य, गरीबी याची त्याला जाणिवही नाही. भूक लागली की खायला हवे इतक्या निरागस त्याच्या भावना. तो शाळेतून घरी येतो तोच भुकेने कलकलून. त्याचे घर म्हणजे तरी काय,एका बाजूला तट्टे आणि दुसऱ्या बाजूला रॉकेलच्या डब्यांचे गंजलेले पत्रे लावून कसाबसा केलेला आडोसा. त्यातच सतत धूर ओकणारी ओलसर चूल. खोकल्याच्या उबळीने प्राण कंठाशी आलेली त्याची आई, खंगत चाललेली त्याची बहीण दुर्गी, जिच्या दवाखान्यातल्या नोकरीच्या तीस रुपये महिना पगारावर कसाबसा संसार ...

संस्कृती पतनाचा महोत्सव !!

भारतीय संस्कृतीचा विचार करायला लागलो कि मनात अनेक भाव निर्माण होतात. अनेकविध संस्कृती तसे अनेक भाव. विविधतेत एकता शोधणारा म्हणून साऱ्या विश्वात आपण ओळखले जात असलो तरी खरच अनेकतेत एकता आहे का हा अभ्यासाचाच विषय आहे. संस्कृती म्हणजे नेमके काय ? संस्कृती हा शब्द एखाद्या समाजाला उद्देशून उद्गारला जातो ती जबाबदारी त्या समाजातील त्या गटातील म्हणजेच देशातील सर्वांची समान आहे कि मग धर्मप्रदाय, जातनिहाय ती ज्याने त्याने आपआपली सांभाळायची असते. हे मला तरी अजून समजलेले नाही. आणि संस्कृती जपणे म्हणजे तरी काय ? पूर्वजांनी सांगून ठेवलेल्या, ग्रंथ-साहित्यात नोंदवून ठेवलेल्या गोष्टींचा नोंदींचा तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीनुरूप विचारही न करता आजच्या आपल्या शिक्षणातून मिळालेल्या दृष्टीला गृहीतही न धरता डोळे झाकून केलेल्या अनुकरणाला धर्म किंवा संस्कृती जपणं म्हणता येईल का ? दिवसेंदिवस आपल्या संस्कृतीचे आपल्या सणांचे बदलत जाणारे रूप पाहिले कि कसनुसंच होतं. धर्मांचे होत चाललेले विघटीकरण किंवा माणसांच्या भावविश्वातून नाहीसं होत चाललेलं संवेदन-माणूसपण कुठेतरी संस्कृती जपण्याऐवजी तिला विकृत रू...

महिला अपमानाची "पाळी"

योगायोगानेच वाचनात आलेला निरेन आपटे यांचा अप्रतिम लेख ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ महिला अपमानाची "पाळी" -निरेन आपटे. एक अतिशय गरीब कुटुंब होतं. घरात खायला दाणा शिल्लक नव्हता. जेव्हा घरावर संकट येतं तेव्हा पहिला फटका घरातल्या स्त्रीला बसतो. चिलापिलाना पोटभर खाता याव म्हणून ती उपाशी राहते. नवर्याला कपडे मिळावेत म्हणून स्वतः एका साडीवर अनेक महिने ढकलते. आणि कधी bulb चे सुट्टे भाग जोडण्याच काम मिळवून दिवसाला ५० रुपये कमावते, कधी भाजी विकते तर कधी जे पडेल ते काम करते. जेव्हा त्यातूनही घर चालत नाही तेव्हा शरीर विकायला सुरुवात करते. ह्या कुटुंबातील महिलेनेही तोच मार्ग स्वीकारला. शरीर विकायला सुरुवात केली... तिला ग्राहक मिळाले सभ्य लोकांच्या वस्तीत. तिथे राहणारे सर्व प्रतिष्ठित होते. एक MBA होता, दुसरा डॉक्टर आणि तिसरा बँक Manager ....अशी शिकवू मंडळी जिथे राहते तिथे नगरसेवक तयार होतोच. त्याला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचायचं असतं. तो समाजकार्याची संधी शोधत असतोच....त्याला ह्या महिलेची माहिती मिळाली. समाजसेवेची संधी चालून आली. एके दिवशी ती भर वस्ती...

कुठेतरी काहीतरी चुकतंय का ?

पकडायला गेलं कि सुटतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? मनात असतं खूप काही बोलायला मात्र शब्दच नाही शब्दांच्या वाटेने अश्रूंच्या लाटेने काहीतरी कुठेतरी भिजतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? हळूच काहीतरी डोकावून जाई स्वप्नात पाहण्याची नुसतीच घाई वाट तुझी पाहून रात्र जागी राहून स्वप्नंच कुठेतरी तुटतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? विचारांना आताशा दिशाच नाही अविरत कुठेतरी भटकत राही सांधायचा प्रयत्न करतेय तरी कुठेतरी काहीतरी हुकतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? अलवार येतो भावनेचा आवेग अश्रूंच्या बांधाला सुटतो वेग कुठेतरी मनात आत आत गाभ्यात कुठेतरी काहीतरी सलतंय का ? सांगायला गेलं कि चुकतंय का ? (c) रश्मी / २०/०५/२०१३

एक क्षण !!

आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला सुटला, आणि पुढ्यात येउन बसला म्हंटला … काय फरक पडतोय एक क्षण चुकल्याने त्याच त्या भावनांना क्षणभर मुकल्याने ?? तुही घे विश्रांती एकाच क्षणाची होऊन दे जरा शांती मनाची क्षण हा क्षणाने वाहून जाईल क्षणभर जरी विसावून जाईल दुसऱ्याच क्षणात शिरशील तू वेडे, मला विसरशील तू नव्याने पुन्हा जगायला शिक विसरून मला जगाला जिंक बघेन तुला याच धर्तीवर यशवान होतांना कीर्तीवर मी हळहळले, मुसमुसले हात धरून क्षणाला... म्हणाले क्षणा आयुष्य क्षणांनी जगतेय मी सारेच क्षण ओंजळीत वेचतेय मी क्षणात सारे विखरून जाईन तू गेलास तर सारेच विस्कटून जाईन क्षणा …. मी क्षण क्षण साठणार आहे जगण्याचं गणित मांडणार आहे. आयुष्याचा क्षणही भागला तरी जगणंच माझं थांबणार आहे . (c) रश्मी / ५ जून २०१४ (प्रस्तुत मुक्तछंदातले काव्य मासिकात प्रकाशित झाले असून कावियीत्रीच्या नावे कॉपीराईट आहे.)