Sunday, 18 February 2018

#मराठीगझल

शब्दासाठी शब्द उमटले, भाव कुठे हे दिसेल का मग
मौनामध्ये भाव उमटता, वाचून तुजला कळेल का मग !

हुंदक्यामध्ये दडून बसले, दुःख निनावी आतच विरता
गालामधल्या हसूत ओझर, डोकवतांना दिसेल का मग !

स्वप्नांमध्ये स्वप्न पेरूनी, उगवेल काही आर्जव करता
पहाट प्रहरी स्वप्नच भंगता, नविन काही रूजेल का मग !

रूप देखणे वरवरचे ते, अंतरातला डोह उपसता
शुभ्र मनाचे सुरेख कोंदण, मनात तुझीया भरेल का मग !

हातामध्ये हात घेऊनी, नजरेलाही नजर भिडवूनी
प्रित तुझ्यावर जडली वेडे, हळूच तो हे म्हणेल का मग !


(C)रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...