हे काय हवेत मिसळते
ही कसली धुंदी चढते
मृदगंध हवेत पसरता
मी क्षणात अशी विरघळते

 ही हाक कुणाची येते
अन अंग अंग थरथरते
मी सावरते देहाला
पण वेडे मन तळमळते

ही कसली कुजबूज कानी
हे काय मनी सळसळते
श्वासांत गंध उतरतो
मी अखंड मग भिरभिरते.

का चंदन होते काया
गात्र गात्र मोहरते
कान्हाचा पावा शोधत
मन राधा राधा होते.

हे पापण का ओलवते
का कंठ दाटूनी येते
काठाशी थेंब ओथंबता
क्षणक्षण मन गहीवरते...

रश्मी पदवाड मदनकर
11 feb 18

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय