Posts

Image
काही फ़ाइल्स काही फोल्डर्स अलबत स्मृतीत सेव झालेले असतात. कधीपासून ..कुठून कुठून त्याचा पत्ता नसतो. अगदी गच्च चिकटून बसलेल्या आठवणी, कधी सांधलेले कधी भंगलेली स्वप्न, कधी अनुभूती देणाऱ्या कधी खोल जखमा खणून गेलेल्या घटना, अस्तित्वाच्या जाणीवा कोरत गेलेली माणसे, आयुष्य ढवळून काढणारे विचार, कधी मांडून कधी कोंडून ठेवणाऱ्या रिती, प्रयत्न करूनही पुसली न जाणारी नावं, गोंगाटातही वाजत राहणारे आवाज, स्मृतीत चलचित्रासारखी दिसत राहणारी काही स्थळं, एकांतातले सुस्कारे, घुस्मटलेले आवंढे, माग े सुटलेले हवेहवेसे क्षण .... निवांत वेळ, एकांत आणि एक क्लिक.. गाणी सुरु होतात काही गोष्टी लगेच कनेक्ट होऊ लागतात. गीतातल्या एखाद्या शब्दाने खपली पडते तर एखाद्या ओळीने विस्मरणात गेलेला माणूस आठवणीत जागा होतो…एखाद्या आलापात आपण भूतकाळाचा प्रवास करून येतो..… गाण्याची एखादी अर्थपूर्ण ओळ कानी पडते अन लगेच मनात काहीतरी हलतं. शब्द आत आत उतरत जातात अन सगळंच विस्कटत जातं... रोजची घातलेली घडी निसटते. आपण वाहवत जातो त्या तेव्हाच्या जगात त्या क्षणात. एक एक सूर स्पर्शत जातो, तन्मयतेचा षड्ज लागतो. जुने भास होऊ ल...

तिघींची घोडदौड साकारतेय 'वूमनविश्व'ची वाटचाल

Image
प्रत्येक पिढीत होणारी स्थित्यंतरे ही त्या-त्या जनुकांवर प्रभाव टाकणारी असतात. आजच्या पिढीच्या अपेक्षा अन्‌ आकांक्षा बदलत्या परिस्थितीवर अवलंबून असतात. अन्‌ याच अनुषंगाने व्यक्तिमत्व घडत असतात. परिस्थिती, बदलत जाणारे वातावरण आणि त्यानुसार घडत जाणारी माणसे उमलत्या पिढीच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असतात. आजच्या तरुणाईपुढे अमर्याद संधी, तेवढीच स्पर्धेमुळे निर्माण झालेली आव्हाने आहेत. ती पार पाडायला वेळ मात्र मर्यादित. मग निव्वळ धक्कातंत्र सुरु असतं. एकमेकांशी तुलना करून मार्क्‍स आणि ग्रेडच्या गणिती चक्रव्युव्हात गरगर फिरत राहणं. वयाच्या एका टप्प्यापर्यंत आपल्याला नेमके काय करायचे आहे, हे सुद्धा ठाम माहिती नसणारे किशोरवयीन मुलं-मुली पालकांनी बोट दाखवल त्या दिशेने प्रवाहात वाहत राहणं, एवढच पसंत करतात. आपल्याला नेमकं काय आवडतं, आपल्या सांस्कृतिक गरजा काय हे कळेस्तोवर पाणी डोक्‍यावरून गेलेलं असतं. मग काय..? आहे त्यात समाधान मानून केवळ तडजोड करत जगणे इतकंच काय ते हाती उरतं. आपण कोणत्या विषयाचे शिक्षण घेतोय तेवढेच फोकस करून त्यातच करीअर करायचे एवढेच चौकटीतले ध्येय राखून आजच्या त...

शब्दांचे पसारे !

Image
एकांतातल्या शब्दांना कंठ असतो त्या शब्दांना डोळे असतात ओघळणारे त्या शब्दांना मन असते. भावनाही असतात  पण मिळत नाहीत ते कान त्यांना ध्येय असते पण गंतव्य नसते... ज्यांना ऐकवायचे त्यांच्या पर्यंत जायचे रस्ते नसतात दारं बंद करून टाकली असतात सगळीच म्हणून तर ते एकांतात फुटतात धुसफुसतात... मुसमुसतात, क्वचित किंचाळतातही कंठातून बाहेर पडले कि त्यांचे प्राक्तन त्यांना कुठवर घेऊन जाईल सांगता येत नाही असं म्हणतात, शब्दांना मरण नाही. ते हवेत विरत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत अवकाशाच्या पोकळीत तरंगत राहतात ... भटकत राहतात एकांतातल्या शब्दांच्या आरोळ्या कुठवर ?? ऐकून घेणारे कान अन समजून घेणारे मन मिळत नाही तोवर ज्या शब्दांना आस मिळते त्यांची वाफ होते ... पाऊस होऊन बरसते, मातीत विरते उरलेल्यांचे दगड होतात.. कुणी ग्रह म्हणतात .. कुणी तारे न काढता न गिळता आलेले आवंढेच तर असतात सारे जिकडे तिकडे शब्दांचेच पसारे  !!! रश्मी पदवाड मदनकर 23.6.17

“SMITA AND I” : Deepti Naval

Image
सतत धावपळीच्या आयुष्यात असणाऱ्या ह्या दोन्ही अभिनेत्री एकदा विमानतळlवर एकमेकींना भेटल्या, दीप्ती स्मिताला म्हणाली हे काय आयुष्य आहे सतत धावपळ , आयुष्य जगण्याची काही दुसरी रीत असली पाहिजे स्मिता थोडा विचार करून ठामपणे म्हणाली "नाही" त्यावर दीप्ती नवल ने केलेली ही इंग्रजी कविता “SMITA AND I” : Deepti Naval Always on the run Chasing our dreams We met each time At baggage claims VIP lounges Check- in counters Stood a while together Among gaping crowds Spoke, unspoken words Yearning to share Yet afraid, afraid Of ourselves All around us People cheering, leering And we, like spectacles Amidst all the madness Trying to live a moment Of truth A glance, a touch A feeling to hold on to And move on… The last time we sat together Waiting for a flight I remember I’d said, ‘There must be another way Of living this life!’ For a long time You remained silent Then, Without blinking Without turning Said, ‘There isn’t’ Today You are gon...

मी आहे ना सांग?’

कुठेतरी  वाचलेली एक सुंदर कविता मी आहे ना सांग?’ मुग्धमानसी | ’आताच दमू नकोस फार जायचं आहे लांब’ म्हण एकदा तरी हात धरून मला ’थोडं थांब’ म्हण... माझं गुर्‍हाळ तक्रारिंचं कुरकुर करु लागलं की जवळ बसवून मला फक्त ’ऐकतो मी तू सांग’ म्हण... कधी चिडेन जगावरती कावून जाईन, त्रासून जाईन हसून माझी धग सोसून ’जगाच्या नानाची टांग’ म्हण... कधी माझ्या डोळ्यांमधून निसटून जाईल काहितरी तेही पकडून शिताफीनं ’याचा पत्ता सांग’ म्हण... मी हसताना उधाणलेले मी रडताना गहिवरलेले अश्रू माझे टिपून ठेव अन् ’जपून ठेवलंय वाण’ म्हण... मोठेपण सोसणार नाही पायांत त्राण उरणार नाही तेंव्हा कुशीत घेऊन मला ’बाळ माझी छान’ म्हण... फार काही मागत नाही माझी तहान भागत नाही हरलेच कधी मी तर हसून ’मी आहे ना सांग?’ म्हण...
Image
आयुष्यच एक कोडं आहे. कधीही न उलगडणारं. किंवा उलगडतांनाच अधिक गुंतत जाणारं.. आयुष्यभर चाललेली सगळी वनवन कशासाठी असते सांगू ...कशाचातरी शोध...कशाचा, कशासाठी..माहीती नाही..अस्वस्थता सतत..रात्रंदिवस.. कुठेतरी आत आत एक भिती समांतर ...जी दोरी पकडून पुढे सरकतोय त्याचं शेवटचं टोक लागलंच नाही तर...सापडलोच नाही आपणच आपल्याला..तर?? प्रश्नाला उत्तर हवंय हे शंभर टक्के माहीती आहे..पण प्रश्न काय आहे हेच कळले नाही तर....उत्तरं शोधता येतात पण प्रश्नच हरवली तर??अंधारात चाचपडतोय आपण...स्वतःल ा शोधतोय...आपण ओळखतो का स्वतःला..जाणतो?? होय..हा उगाचाच confidence   स्वतःला स्वतःचे नेमके चित्र साकारता येत नाही..हे चित्र शोधण्याचा प्रयत्न मग आतबाहेर सुरु होतो... आरश्यातल्या प्रतिमा न्याहाळत स्व चा शोध लागत नाही....आपल्या आवडीतून-निवडीतून आपणच आपल्याला उमगतो काय...कुठेतरी झळकतो काय ..हे बघण्याचा प्रयत्न चालू असतो.... बरेचदा आपल्या अस्तित्वाचे अंश अंश सापडत जातात.....पण आपल्याला हवा असलेला नेमका 'मी' सापडायची कवायत मात्र जन्मभर संपत नाही.....त्याचा कानोसा ऐकायला येतो आणि आभास तेवढे होत रा...

झेंडा...

..(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं) 2004 मध्ये काही महिने योगेशच्या(माझे पती) नोकरीनिमित्त इंग्लडमधील शेफील्डमध्ये राहत होतो तेव्हाची गोष्ट. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. चाळीशीचे विशेष कौतुक पहिल्यांदाच इतके पाहिले.           आम्ही सहा जण ह्या छोट्याश्या पार्टीसाठी एकत्र आलो. पॅटचा पार्टनर एरिक(तिकडे पार्टनर असतो हे नवे ज्ञान) तिच्यासोबत होता.त्याची नव्याने ओळख झाली आणि अजून एक इंग्रज जोडी ...       माझे वय तेव्हा साधारण 26/27 . हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी देऊन गेला..आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात ,काही ना काही देऊन जातात.. पॅटने त्या दिवशी शिकवले..चाळीशीतही कसं मस्त तरुण जगायचं!आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत जगायचं. हि जोडी आवडली मला .     टेबलवर  रंगलेल्या गप्पांच्या ओघात  मी एरिकला विचारले कि -तो काय काम करतो ? ह्या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणले  तो म्हणाला, "मी स्टेशनवर झेंडा दाखवतो".... मी आणि योगेश नि:शब्द, कारण  प...